10 lines on Mahatma Gandhi in Marathi : महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण महात्मा गांधी निबंध 10 ओळीत (10 lines on Mahatma Gandhi in Marathi) जाणून घेणार आहोत. 

10 lines on Mahatma Gandhi in Marathi


महात्मा गांधी निबंध 10 ओळीत (10 lines on Mahatma Gandhi in Marathi)

  1. गांधीजींनी एकूण 1499 दिवस (सुमारे 5 वर्षे) तुरुंगवास भोगला. त्यापैकी 114 दिवस ते दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात होते. 
  2. गांधीजीनी त्यांचे आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग' गुजराती भाषेत लिहिले. त्याचे इंग्रजी भाषांतर त्यांचे सचिव महादेवभाई देसाई यांनी केले.
  3. गांधीजीवर 90000 पुस्तके लिहिली गेली आहेत.
  4. पाकिस्तान, इराण, ब्रिटनसह 100 पेक्षा अधिक देशांत गांधीजींचे पुतळे आहेत. 150 देशातील 800 पोस्टाच्या तिकीटावर गांधीजीचे चित्र आहे. 
  5. गांधीजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात (1969) चलनी नोटेवर प्रथम दिसले. 1996 पासून एक व दोन रुपये वगळता सर्व नोटांवर गांधीजीची प्रतिमा छापण्यात आली आहे. 
  6. गांधीजीवर 45 चित्रपट व 500 डाक्युमेंटरी तयार करण्यात आल्या आहेत. 
  7. mkgandhi.org ही साईट रोज 200 देशांतील 8000 लोक पाहतात.
  8. भारतातील 711 जिल्ह्यात गांधीजींच्या नावाने रस्ते, शाळा व उद्याने आहेत. 
  9. 19 वर्षापर्यंत ते ' मोहन ' म्हणून ओळखले जात. 24 व्या वर्षी द. आफ्रिकेत त्यांना ' मिस्टर गांधी ' ही ओळख प्राप्त झाली. 48 व्या वर्षी चंपारण्यमध्ये प्रथम 'बापू' असे संबोधले. 50 व्या वर्षी रविंद्रनाथ टागोरांनी त्यांचा उल्लेख 'महात्मा' असा केला. गांधीजी जेव्हा 74 वर्षांचे होते तेव्हा नेताजी बोस यांनी रेडिओ संदेशात गांधीजीना 'राष्ट्रपिता' म्हटले.  
  10. जगातील 600 हून अधिक विद्यापीठात गांधी अध्ययन केंद्रे चालविली जातात. 
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 

सारांश (Summary)

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय व सर्वधर्म समभावावर आधारित एक नवीन 'मानवी संस्कृती' निर्माण व्हावी यासाठी हा महात्मा जगला आणि त्यासाठी जाणीवपूर्वक बलिदानही दिले. आजच्या या पोस्टमध्ये आपण महात्मा गांधी निबंध 10 ओळीत (10 lines on Mahatma Gandhi in Marathi) ही माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने