1001marathiessay.blogspot.com





|महात्मा गांधी यांचे प्रेरक विचार | |motivational thought of Mahatma Gandhi|
  1. जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षाही ज्ञान अधिक मौल्यवान आहे सुंदर आहे.
  2. प्रेम आणि सत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
  3. वाईट हस्ताक्षर ही अर्धवट ज्ञानाची निशाणी आहे.
  4. कला अशी हवी की जी एका वेळी लाखो लोकांशी बोलू शकते .
  5. सत्य ही आपली जीवनपद्धती आहे.
  6. आयुष्य आनंदाने जगता येण्यासाठी त्याबाबतची आसक्ती सोडून द्यावी.
  7. शिक्षण हे साध्य नव्हे ,ते एक साधन आहे. ज्या शिक्षणाने चारित्र्यवान बनू तेच खरे शिक्षण.
  8. कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते.
  9. माणसाला कर्तव्याचा मार्ग दाखवण्यास सभ्यता हा चारित्र्यगुण मार्गदर्शन करतो.
  10. सभ्यता हा चारित्र्याचा असा पैलू आहे की जो माणसाला कर्तव्याचा मार्ग दाखवतो.
  11. कितीही काम असले तरी जेवणासाठी जसा आपण वेळ काढतो , तसा व्यायामासाठी काढला पाहिजे.
  12. आपल्या वागणुकीने आपणास परिस्थिती अनुकूल करून घेणे, यातच पुरुषार्थ असतो.
  13. रागाने माणसाचे शरीर जळते व काम बिघडते.
  14. मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते.
  15. स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बना व जगण्याचा आनंद लुटा.
  16. मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो, तेवढा गुपचुप राहिल्याने करीत नाही.
  17. जेव्हा माणसाचा तोल सुटतो, तेव्हा त्याने मौन स्वीकारून मन शांत झाल्यावरच बोलावे.
  18. निर्भयता हे नैतिकतेचे पहिले लक्षण आहे .भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही. 
  19. कोणत्याही माणसाचा बद्दलचे मत त्याच्या कृती वरून तयार केले जावे . त्यामागील हेतूंना महत्त्व देऊ नये , कारण कोणत्याही व्यक्तीच्या हृदयात काय आहे हे केवळ ईश्वरच जाणू शकतो.
  20. सत्य आणि न्याय याहून कोणताच मोठा धर्म नसतो.
  21. ज्याला उत्तम ग्रंथ वाचण्याचा छंद असतो,  तो जगात कुठेही सुखी राहू शकतो.
  22. न्याय नाही तर त्याग हा मैत्रीचा भक्कम पाया असतो.

  1. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.




   मित्रांनो, महात्मा गांधी यांचे प्रेरक विचारmotivational thought of Mahatma Gandhi. तुम्हाला कसे वाटले ते सांगा .तसेच हे विचार तुम्ही विविध भाषण आणि निबंधांमध्ये वापरू शकतात.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने