www.upkarmarathi.com

पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध |patrache atmavrutta nibandh in marathi
पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध |patrache atmavrutta nibandh in marathi

 
       ज्यावेळी एखादी सजीव अथवा निर्जीव व्यक्ती किंवा वस्तू आपल्याशी स्वतःच्या भावना सांगून बोलत आहे. अशी कल्पना करावी लागते व निबंध लिहावा लागतो अशा निबंधांना आत्मवृत्तपर निबंध असे म्हटले जाते.
        असे निबंध लिहिणे ही एक प्रकारची कलाच आहे कारण की अशा निबंधांमध्ये आपल्याला स्वतःला याविषयी आपण निबंध लिहितो आहोत त्याविषयी एकरूपता साधून निबंध लिहावा लागतो.असे अनेक निबंध तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.ते निबंध तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला सुचतील तसे निबंध तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. याठिकाणी आम्ही दिलेली निबंध हे तुम्हाला मदतीसाठी दिलेले आहेत. हे जसेच्या तसे वापरू नका. तसे केल्याने तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार तरी कसा?
      असाच एक आत्मवृत्तपर निबंध आपण या ठिकाणी बघुया त्या निबंधाचे नाव आहे पत्राचे आत्मवृत्त.
      पत्राचे आत्मवृत्त या निबंधात पत्रच तुमच्याशी बोलत आहे व आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना सांगत आहे असे समजून निबंध लेखन करूया .चला तर मग बघुया एक छानसा निबंध पत्राचे आत्मवृत्त

 पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध
patrache atmavrutta Marathi nibandh

      बरेच दिवस झाले तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती, परंतु आता आमचे बोलणे ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे तरी कुठे?
मी तर एक साधे पत्र आहे .माझं बोलणं ऐकून घेणे म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार असं तुम्हाला वाटेल. तरीही तुम्हाला विनंती करतो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही.
         सध्याच्या काळामध्ये पत्र पाठवण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पोस्ट ऑफीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फक्त सरकारी कागदपत्रांची देवाण-घेवाणच मोठ्या प्रमाणामध्ये होत  असते.
        पूर्वीच्या काळी एकमेकांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी माझा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जात असे. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांना त्यांच्या मानपानानूसार संबोध वापरण्याची पद्धत होती. म्हणजे बघायला आईवडिलांसाठी तीर्थरूप, इतर वडीलधार्‍या मंडळी साठी तीर्थस्वरूप, आपले भावंड व मित्र असतील तर त्यांना प्रिय अशा पद्धतीने शब्द वापरले जायचे आणि त्यामुळे एकमेकांविषयी असलेले प्रेम या साध्या शब्दांमधून सहज व्यक्त होत असे.
      सध्याच्या काळात मात्र विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे. आपल्याला ज्याच्याशी बोलायचे आहे किंवा आपल्या भावना ज्याच्याकडे व्यक्त करायचे आहे त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकला की लगेच आपल्याला त्याच्याशी बोलता येते. वेळ वाया न जाता लगेच.. त्यामुळे पत्राने वाया जाणारा वेळ वाचतो हे जरी खरे असले, तरीदेखील एखाद्याला पत्र पाठवल्यानंतर वाट पाहण्यातील मजाच मात्र आता हरवत चाललेली आहे.
      ज्यावेळी आपण एखाद्याला पत्र पाठवतो त्या वेळी ते पत्र आपल्या प्रिय व्यक्तीला कधी पोहोचेल पोहोचल्यानंतर त्याच्या मनामध्ये कोणते भाव निर्माण होतीलनाही असे अनेक प्रश्न मनामध्ये घोंगावत असतात. ते पत्र यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीला पोहोचते त्यावेळी तो व्यक्ती देखील आनंदाने गदगद होऊन जातो. नकळतच डोळ्यांचे किनार ओली होते. त्याच भावना आवेगामध्ये पत्राचे उत्तर दिले जाते, मग एखादी बहीण आपल्या भावाला म्हणते प्रिय दादा.. एखादा मुलगा दुरून आईला म्हणतो तीर्थरूप आई.. तर आईचा अंतकरण असलेल्या मामाला एखादी भाची लिहिते तिर्थस्वरूप मामाजी.... खरोखर माझ्या मधून ज्या भावना व्यक्त केल्या जात होत्या त्या अगदी खऱ्या  आणि मनापासुन होत्या.
        अलीकडच्या काळामध्ये माझे स्वरूप आणि माझी जबाबदारी बऱ्याच प्रमाणात बदललेली आहे. पूर्वीच्या काळी फक्त बदामी रंगाचे छोटे आयताकार माझे स्वरूप होते. अंतर्देशीय पत्र म्हणून निळ्या रंगाचे लिफाफे होते. अर्थात अजूनही माझे ही रूपे अस्तित्वात आहेत परंतु आता पत्र पाठवतो तरी कोण? सरळ संवाद साधता येतो ना आता मोबाईलच्या माध्यमातून म्हणून....
       काळाच्या ओघात बदल हा घडतच असतो तो आपण मान्य करू या. असे मी स्वतःलाच बऱ्याच वेळा समजावत असतो . त्यामुळे मनाच्या आतील वेदना थोड्या कमी आणि सुसह्य होतात. आता जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत आपले एका हृदयाच्या भावना दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम असेच अविरत अखंड चालू ठेवायची असा मनाशी निश्चय करून टाकलेला आहे.
    माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच असे गृहीत धरतो आणि तुमचा निरोप घेतो.
....................... समाप्त..................

|पत्रात कुणाला कोणते मायने वापरावे|




प्रिय मित्रांनो या निबंधाचे खालील प्रमाणे नावे हि असू शकतात....
१) |पत्र बोलू लागले तर
२) |मी पत्र बोलत आहे
३) |पत्राची कैफियत
४) |पत्राचे मनोगत

     आणि महत्वाचे सांगायचे तर राहिलेच मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मनातही पत्र बोलू लागले तर या विषयी काही कल्पना असतील तर त्या आम्हाला पाठवा . तुमच्या कल्पना वाचायला आम्हाला फारच छान वाटेल. धन्यवाद

  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.



    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने