सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध |Surya ugavala nahi tar Marathi nibandh

|Surya ugavala nahi tar Marathi nibandh
|Surya ugavala nahi tar Marathi nibandh

प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण  सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध विषयावर दोन निबंध बघणार आहोत. या निबंधा चा उपयोग तुम्हाला नक्की होईल चला तर मग बघुया सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध .


          आजवर शेतकरी, शिक्षक ,कामगार, एसटी कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी, किंवा अजून इतर कामगार संपावर गेल्याचे अनेक वृत्त आपण ऐकले आहेत .पण निसर्गातील कोणताही घटक संपावर गेल्याचे आपण ऐकले नाही. समजा, त्यापैकी एकाने संपावर जाण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? ते आपण आता सूर्य उगवला नाही तर मराठी निबंधा मध्ये बघूया.

essay no 1
     

 सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
|Surya ugavala nahi tar Marathi nibandh


         जर सूर्य उगवला नाही तर संपूर्ण पृथ्वीवर अंधारच पसरेल असे नाही ,तर मानवी जीवनही अंधारात जाईल. सूर्य रागावून उगवला नाही तर म्हणजेच सूर्य संपावर गेला तर अशी आपण कल्पना करतो.पण सूर्य रोज उगवतो म्हणून सगळे कामावर जातात .सूर्य कधीच उगवला नाही तर मग पहाट होणार नाही. आपण अंधार बघून अजून रात्र आहे म्हणून गादीवरच लोळत बसू. झाडांवरील पक्षांची झोप उडेल परंतु अंधारामुळे त्यांना उडणे शक्य होणार नाही. कोंबडा नेहमीप्रमाणे आरवणार नाही. गुरेढोरे संभ्रमात पडतील. सर्वत्र अंधार होईल आणि सर्वांचे भान हरपून जाईल.

       सूर्य उगवला नाही तर दिवसच उगवणार नाही. कोणतेही काम करण्यासाठी कोणाला प्रेरणा मिळणार नाही उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत बाजारपेठा भरणार नाहीत खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार होणार नाहीत जर सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढेल अवकाशात सूर्यप्रकाश नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांचे उष्णतेमुळे पायही भाजणार नाहीत.

          असे काही फायदे असले तरी सूर्य बराच काळ उगवला नाही तर निसर्गाचे संपूर्ण चक्र कोलमडून पडेल. झाडे फुले पाने फळे भरणार नाहीत शेतातून धान्य उगवणार नाही सूर्य नसेल तर पाण्याचे बाष्पीभवन कसे होईल बाष्पीभवन झाले नाही तर पाऊस कसा पडेल याचा विचार केला तर सूर्याचे महत्त्व आपल्याला जाणवेल.
         
     सूर्य उगवला नाही तर हे कल्पना फार सुंदर आहे आणि गमतीशीर ही आहे. सूर्य उगवला नाही तर फारच मजा येईल सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. सर्वत्र अंधार राहील त्यामुळे शाळेत जाण्याची ही आवश्यकता राहणार नाही बाहेर सगळीकडे अंधार असेल म्हणून बाहेरची कामे आपल्याला करावी लागणार नाहीत. खरंच फारच मजा येईल.
   
     सूर्य उगवला नाही तर मात्र आपल्याला सुंदर सुंदर सकाळ अनुभवता येणार नाही. संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परतणारे पक्षी आपल्याला बघायला मिळणार नाहीत. उष्णता न मिळाल्यामुळे सगळीकडे तापमान कमी होत जाईल व संपूर्ण पृथ्वीच गारठून जाईल. सजीव सृष्टी नष्ट व्हायला लागेल. त्यामुळे सूर्य उगवला नाही तर असा विचार स्वप्नात सुद्धा आपण करायला नको.


   प्रिय मित्रांनो  सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध |Surya ugavala nahi tar Marathi nibandh या विषयावर एक छान निबंध आपण बघितला. हा फक्त एक निबंध असला तरी एका गोष्टीचा विचार करण्याची गरज आली आहे आणि ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीचे तापमान सतत वाढत चाललेले आहे. असेच पृथ्वीचे तापमान वाढत राहिले तर एक दिवस संपूर्ण सजीव सृष्टी जलमय होऊन जाईल. त्या दृष्टीने आपण स्वतःच्या वागण्या मध्ये काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्लोबल वार्मिंग कमी करायचे असेल तर प्रदूषण आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कुठे जवळ जायचे असेल तर वाहनांचा उपयोग न करता चालत जा किंवा सायकलचा वापर करा.

essay no 2


 सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
 |Surya ugavala nahi tar Marathi nibandh

    या संपूर्ण जगासाठी सूर्य खूप महत्त्वाचा आहे सूर्य हा एक तारा आहे जो आगीच्या गोळ्यासारखा आहे सूर्य हा आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा स्त्रोत आहे आणि तो सूर्यच आहे जो आपल्या पृथ्वीवर दररोज प्रकाश करतो त्यामुळे आपण एकमेकांना पाहू शकतो. सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे सूर्य आपल्या पृथ्वीवरील प्रकाशाचा स्रोत आहे सूर्य प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे आणि 17 सेकंद लागतात.

      आपण दररोज सूर्य पाहतो सूर्य उगवतो आणि मावळतो पण सूर्य उगवणार नाही असा कधी विचार किंवा कल्पना केली आहे का मित्रांनो जर सूर्य नसता तर या पृथ्वीवर काहीही नसतं आणि आपण जगलो नसतो जेव्हा पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात जेव्हा आपण पृथ्वीवरून सूर्याकडे पाहतो तेव्हा सूर्य आपल्याला खूप लहान वाटतो कारण सूर्य पृथ्वी पासून खूप दूर आहे पण सूर्य खूप मोठा आहे. सूर्याच्या उष्णतेने आपल्याला विटामिन ड मिळते. आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी हे विटामिन अत्यंत उपयुक्त आहे सूर्य उगवला नाही तर आपल्याला ते मिळणार नाही.
     जर सूर्य उगवला नाही तर आपल्याला खायला अन्न मिळणार नाही कारण वनस्पतिना जगण्यासाठी व अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्य उगवला नाही तर या पृथ्वीवर झाडे किंवा अन्न राहणार नाही सूर्याशिवाय झाडांशिवाय  सजीव जिवंत राहू शकणार नाहीत. त्यामुळे सूर्य उगवला नाही तर अशी कल्पना करणेच योग्य होणार नाही. अन्न न मिळाल्यामुळे सर्व सजीव तडफडून मरून जातील.

    जर सूर्य उगवला नाही तर संपूर्ण पृथ्वी चिरकाल अंधारात निघून जाईल त्यामुळे या संपूर्ण जगासाठी सूर्य खूप महत्त्वाचा आहे. सूर्य मुळेच पृथ्वीवर पाणी देखील आहे पाण्यामुळे पृथ्वीवर मानव प्राणी पक्षी झाडे जिवंत आहेत पाणी आपल्यासाठी अमृत आहे आणि हे अमृत आपल्याला सूर्यामुळे मिळते.

सूर्य उगवला नाही तर थोडक्यात माहिती


            सूर्या शिवाय कोणताही प्राणी जगणार नाही . उष्णतेच्या अनुपस्थितीत वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही. वनस्पती ऑक्सिजन देणार नाही आणि त्याशिवाय जीवन अशक्य आहे.

          या जगात सूर्य उगवला नाही तर जगात किती रोग पसरतील. अनेक रोगांचे जंतू सूर्यप्रकाशात मरतात ज्यामुळे काही रोग नियंत्रणात राहतात आपल्या शरीराला सूर्यप्रकाशापासून विटामिन डी मिळते जे ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.

        जर सूर्य उगवला नाही तर झाडे किंवा पिके राहणार नाही काहीही वाढणार नाही ,कारण सूर्यप्रकाशाच्या मदतीने हिरव्या वनस्पती अन्न तयार करतात .परिणामी ते स्वतःचे अन्न बनवू शकणार नाहीत व सजीवांना खायला मिळणार नाही.

           सूर्य उगवला नाही तर आपल्या पृथ्वीवर ऋतू राहणार नाहीत. हिवाळा ,उन्हाळा ,पावसाळा काही दिसणार नाही. फक्त अंधार दिसेल.


    
        विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध |Surya ugavala nahi tar Marathi nibandh  कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा .अजून एखाद्या विषयावर तुम्हाला निबंध हवा असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा मी माझ्या परीने मला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.

       हा निबंध इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतो. आपल्या या साईटवर असे 200 पेक्षा जास्त निबंध आहेत . या निबंधाचे वाचन करा आणि तुमची निबंध लेखनाची कला विकसित करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
      
      प्रिय मित्रांनो मराठी निबंध लेखन ही एक कला आहे या साईटवरील अनेक निबंध वाचून तुम्हाला निबंध कसे लिहावे? मुद्दे कसे मांडावे ? याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. आमच्या मुळे तुम्हाला काही मदत झाली तर आम्हाला आनंद होईल आणि आमच्या कामाचा काहीतरी उपयोग होतो हा एक सुखद अनुभव आम्हाला घेता येईल . धन्यवाद.
   
    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने