upkarmarathi.com

HOW TO WRITE AN ESSAY 

      सर्व वाचक मित्रांना आजच्या लेखामध्ये आपण निबंध लेखन कसे करावे?|Marathi nibandh lekhan | nibandh kasa lihava |nibandh Marathi  याबद्दल सविस्तर माहिती बघूया. निबंध लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणजे तुमच्यामधील कल्पनाशक्तीला चालना देणे हा आहे. बऱ्याच वेळेला मात्र ज्यावेळी एखादा निबंध लिहायचा असतो. त्यावेळी आपण एखाद निबंधाचे पुस्तक घेतो आणि सरसकट तसाच निबंध लिहून टाकतो. यामुळे निबंध लेखनाचे खरे उद्दिष्ट बाजूलाच राहून जाते.

      तुम्हाला जर तुमची कल्पनाशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन करणे. तुमच्या वाचनासाठी आवश्यक असणारे अनेक सुंदर निबंध या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील या ब्लॉगवर विविध विषयांवर आधारित भरपूर निबंध आहेत हे निबंध वाचा आणि तुमच्या शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा.

|Marathi nibandh lekhan | nibandh kasa lihava
how to write an essay and types of essay 


    Essay writing,  तुम्हाला निबंध अगदी मुद्देसूदपणे आणि योग्य पद्धतीने लिहिता  यावा म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टीप्स देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया निबंध लेखन कसे करावे यावर आधारित माहिती. How to start a nibandh in Marathi?

निबंध लेखन म्हणजे काय?


    दिलेल्या कोणत्याही विषयावर सुबोध समर्पक आणि सुसंगत मुद्द्यांच्या आधारे विचारांची मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन होय.

   निबंध लेखनाची कला शिकण्यासाठी दिलेल्या विषयाला आवश्यक असणारे मुद्दे  त्या मुद्द्यांचे विवेचन करून पटवून देणे आवश्यक असते.

निबंध लेखनाची पूर्वतयारी(How to start a nibandh in Marathi?)


      चांगला निबंध लिहीण्यासाठी खालील गोष्टींचा काळजीपूर्वक सराव करा.

  •  मासिके आणि बरीच पुस्तके वाचा .
  • वर्तमान पत्र आणि त्यांच्या पुरवणी नियमित वाचा .
  • चारोळ्या, सुभाषिते, सुविचार, श्लोकांची सुंदर वाक्य गोळा करा.
  •  नियमितपणे लिहिण्याचा सराव करा
  •  एकूण प्रक्रियेतून तुम्ही काय शिकलात याची नोंद ठेवा

निबंध लेखनासाठी महत्त्वाच्या सूचना


कोणताही निबंध लिहिण्यापूर्वी खालील बाबींचा नीट विचार करा.

  1. निबंध लेखन विषय काळजीपूर्वक वाचा.
  2. या विषयावर काही काळ चिंतन करा.
  3. शुद्धलेखनाच्या नियमानुसार निबंधाची भाषाशैली आकर्षक व वाचनीय असावी.
  4. निबंधातील मुद्दे सूत्रबद्ध पद्धतीने मांडावेत.
  5. निबंध लेखनासाठी दिलेल्या मर्यादित ओळी लक्षात घेऊन निबंधाची रचना करावी .
  6. निबंध लिहिताना हस्ताक्षर नीटनेटके असावे.
  7. तुम्ही  निबंधाचा विस्तार किती केला किंवा निबंध किती ओळींचा लिहिला यापेक्षा निबंधात मर्यादीत शब्दांत लेखन किती प्रभावी आहे याला अधिक महत्त्व आहे हे लक्षात असू द्या.
  8. दिलेल्या सूचनांनुसार  निबंधाची संकल्पना स्पष्ट करा.

निबंधाचे प्रकार|types of essay


  • सुभाषितपर निबंध
  •  चिंतनात्मक निबंध 
  • चर्चात्मक निबंध 
  • चरित्रात्मक निबंध 
  • कल्पनाविलासात्मक निबंध 
  • कथनात्मक निबंध
  •  वर्णनात्मक निबंध

वर्णनात्मक निबंध म्हणजे काय


    आपण बघितलेल्या एखाद्या प्रसंगाचे, प्राण्याचे, वस्तूचे, माणसाचे ,दृश्याचे किंवा वास्तूचे यथासांग वर्णन करणे ,यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात.

how to write an essay
निबंध लेखन कसे करावे


वर्णनात्मक निबंधाचे लेखन कसे करावे?


   आपण ज्या विषयी लिहितो आहे मग तो प्रसंग ,प्राणी किंवा इतर काहीही असो. त्यामधील सर्व बारकाव्यांचा अगदी सविस्तरपणे तपशील वर्णनात्मक निबंधामध्ये देणे अपेक्षित असते.
  उदा-
     समजा आपण  वाघा विषयी वर्णनात्मक निबंध लिहित आहोत, तर वाघामधील  कौशल्य याबरोबरच त्याचे दोषही आपल्याला निबंधामध्ये सांगणे गरजेचे आहे.

  एखाद्या व्यक्तीचे वर्णन लिहीत असताना त्या व्यक्तीच्या गुणांसह त्यामधील दोष देखील लिहायला हवेत.
  
    निबंधाची भाषा इतकी साधी सोपी व आकर्षक असावी ,की ज्या व्यक्तीचे वर्णन आपण करत आहोत ,त्याचे चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभे राहायला हवे.

चरित्रात्मक निबंध


  संपूर्ण माणूस समाजासाठी किंवा देशासाठी अनेक व्यक्तींनी महान कार्य केले आहे. अशा महान व्यक्तींवर निबंध लिहिणे म्हणजेच चरित्रात्मक निबंध लिहिणे होय. चरित्रात्मक निबंध लिहितांना त्या व्यक्तीने केलेली अनमोल कार्य किंवा मार्गदर्शन यांचा ओझरता उल्लेखही निबंधामध्ये करावा.
उदाहरणार्थ,
  1. स्वामी विवेकानंद
  2. राजा राम मोहन रॉय 
  3. शिवाजी महाराज
  4. स्वामी दयानंद सरस्वती 
  5. झाशीची राणी 
  6. लोकमान्य टिळक 
  7. सावित्रीबाई फुले 
  8. महात्मा ज्योतिबा फुले
  9.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

कथनात्मक निबंध ( |मनोगत  निबंध)


  •      कथनात्मक  निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना, दैनंदिन जीवनातील त्यांचे अनुभव या बद्दल विचार मांडलेले असतात.
  • एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांचे मन किंवा आत्मचरित्र आपल्याला सांगत आहेत या विचाराने लिहिलेल्या निबंधांचा देखील यांच्या मध्ये समावेश केला जातो .
  • यांनाच मनोगत पर निबंध असे देखील म्हटले जाते.
उदाहरणार्थ
  1.  घड्याळ बोलू लागले तर 
  2. घर बोलू लागले तर
  3.  पुस्तक बोलू लागले तर 
  4. डॉक्टरचे मनोगत 
  5. शिक्षकांचे मनोगत
  6.  शिपायाचे मनोगत 
  7. सैनिकाचे मनोगत

कल्पनाविलासात्मक निबंध किंवा कल्पनात्मक निबंध

  ज्या गोष्टी घडणे अशक्य आहे त्याच गोष्टी घडल्या अशी कल्पना करून ज्या वेळी निबंध लिहिले जातात ,त्यांना कल्पनात्मक किंवा  कल्पनाविलासात्मक निबंध असे म्हणतात.

उदाहरणार्थ 
  1. सूर्य संपावर गेला तर
  2.  मला पंख आले तर
|How to write a essay in Marathi?

सुभाषित पर निबंध


   प्रत्येक भाषेमध्ये अनेक प्रसिद्ध सुविचार सुभाषित आणि म्हणी असतात.त्यावर आधारित जे निबंध लिहिले जातात अशा निबंधांना सुभाषित पर निबंध असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ
  1. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 
  2. ग्रंथ हेच गुरु 
  3. गर्वाचे घर खाली
  4. आम्हा  घरी धन

चर्चात्मक आणि चिंतनात्मक 

    
     ज्यावेळी एखाद्या व्यक्ती,प्रसंग,घटना याविषयी  चर्चात्मक लेखन केले जाते अथवा किंवा चिंतन करून त्यावर आपले विचार मांडले जातात अशाप्रकारच्या निबंधांना चर्चात्मक आणि चिंतनात्मक निबंध असे म्हटले जाते.

निबंध लेखन करताना.....


उगाच पाल्हाळीक लिहू नका.
शब्दांची पुनरावृत्ती टाळा.
प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद  बनवा .
प्रत्येक मुद्दा सुटसुटीत मांडा 


MARATHI  ESSAY TOPICS 

  1. गुरु महिमा मराठी निबंध | Guru Mahima essay in Marathi.
  2. मोर मराठी निबंध
  3. माझी आई  मराठी निबंध
  4. माझी आजी मराठी निबंध
  5. माझी मैत्रीण  मराठी निबंध
  6. माझी  शाळा  मराठी निबंध
  7. माझे स्वप्न मराठी निबंध
  8. माझे  वडील  मराठी निबंध
  9. माझे  आजोबा  मराठी निबंध
  10. मी पाहिलेले अभयारण्य 
  11. माझ्या स्वप्नातील भारत
  12. मला पंख आले
  13. मी पाहिलेला अपघात
  14. आमच्या शाळेची सहल 
  15. आमच घर
    प्रिय वाचक मित्रानो तुम्हाला हा निबंध कसा लिहावा याची माहिती देणारा लेख कसा वाटला ? हे मला नक्की सांगा. त्यासाठी एक सुंदर कमेंट द्यायला अजिबात विसरू नका .
 
How many word are there should be in essay in Marathi? 


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने