1001marathiessay.blogspot.com

सूर्य संपावर गेला तर | sury sampavar gela tar |marathi nibandh
सूर्य संपावर गेला तर | sury sampavar gela tar |marathi nibandh
          

          sury sampavar gela tar ,marathi nibandh ,आजपर्यंत आपण शेतकरी, शिक्षक, कामगार, एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी असेे अनेक प्रकारची माणसेे किंवा कर्मचारी, कामगार संपावर गेले असल्याच्या बातम्या अनेक वेळा ऐकलेल्या आहेत. याउलट निसर्गानेे निर्माण केलेलेे कोणतेही घटक कधीही संपावर गेलेलेे आज पर्यंत आपल्याला ऐकायला मिळाले नाही. पण समजा जर यातील एकाने जरी संपावर जाण्याचे ठरवले तर काय होईल हेेेेे आपण   सूर्य संपावर  गेला तर  या एका छानशा निबंधामध्ये बघूया .
 

       सूर्य संपावर गेला तर
|Surya sampavar gela tar Marathi nibandh|
   
            सूर्य संपावर गेला तर फक्त पृथ्वीवर सगळीकडे अंधार पसरेल असे नाही तर मानवाच्या जीवनातच अंधकार निर्माण होऊन जाईल. खरेतर सूर्याला संप करण्याची काही गरज नाही. संप म्हणजे दुर्बल घटकांनी आपल्या मागण्या  मान्य करून घेण्यासाठी प्रतिष्ठित लोकांविरुद्ध सनदशीर मार्गाने पुकारलेले एक युध्दच होय. सूर्य तर स्वतः इतका बलशाली आहे की त्याने ठरवले तर काही क्षणातच सर्व सजीव सृष्टी ची राखरांगोळी करून टाकेल. मग त्याला संपावर जाण्याची गरजच नाही ना!

      सूर्य संपावर गेला तर सगळीकडे अंधार पसरत जाईल लोकांना उष्णताच मिळणार नाही. आदल्या दिवशी झोपलेली माणसे सकाळी सूर्योदय झालेला नसल्यामुळे लवकर उठणारच नाही. नेहमी प्रमाणे जे उठतील त्यांना बाहेर सगळीकडे अंधार दिसेल म्हणून सगळ्यांचा गोंधळ नक्की उडेल. झोपेतून उठलेले लोक गोंधळून परत झोपून जातील.

       ज्यांच्या घरामध्ये अध्यात्मिक वातावरण आहे ते लोक सकाळी उठल्यानंतर सूर्य देवाचा आशीर्वाद घेतात त्याला नमस्कार करतात. पण सूर्य उगवलाच नाही तर त्यांना सूर्यदेवाला नमस्कार करता येणार नाही.

       दिवस उगवणार नाही त्यामुळे लोकांना कामाला जावेही लागणार नाही. ज्या लोकांना काम करण्याचा कंटाळा येतो त्यांना मात्र फार मोठी मेजवानीच असेल. ते तर अजून म्हणतील की, 'सूर्य उगवला नाही हे फार बरे झाले , म्हणजे आम्हाला आराम करायला अजून वेळ मिळणार.' असे असले तरी आराम कितीवेळ करणार कधी तरी आराम करण्याचा देखील कंटाळा येईलच.

        सूर्य उगवला नाही तर उष्णता मिळणार नाही त्यामुळे हळूहळू पृथ्वीवरील तापमान  कमी होऊ लागेल. सगळीकडे लोकांना थंडीचा खूप मोठा त्रास होईल. सगळी पृथ्वीच गारठून जाईल. पृथ्वीवरचे सगळे पाणी गोठून जाईल आणि पिण्यासाठी पाणी सुद्धा  राहणार नाही. पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तर सजीव कसे जगणार ? सर्व सजीव सृष्टी नष्ट होऊन जाईल.

       सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात त्यामुळे दिवस रात्र आणि ऋतू सुद्धा होतात. सूर्य उगवला नाही तर दिवस-रात्र आणि ऋतू यांचा तर विषय संपून जाईल. सगळीकडे अंधकार आणि अंदाधुंदी माजून जाईल यात तीळमात्रही शंका नाही.
        सूर्य उगवला नाही तर ही कल्पना फक्त बोलण्यासाठी चांगले आहे, असे प्रत्यक्ष कधीही घडू नये. मी देवाकडे प्रार्थना करतो.
       
      
  1. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने