www.upkarmarathi.com

                देवाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. देवाने एवढा  देह  सुंदर तर दे हा आपल्याला तिला ज्यामुळे आपण सर्व प्रकारची कामे करू शकतो या जीवनात खूप आनंद मिळू शकतो. पण देव कुणी पाहिला आहे का से विचारले तर बर्‍याचदा उत्तर नाही असे मिळते. मग असा दुर्मिळ असणारा "देव मला भेटला तर "किती मजा येईल. हे आपण आजच्या मला देव भेटला तर मराठी निबंध मध्ये बघणार आहे. चला तर मग बघुया एक छान मराठी निबंध "मला देव भेटला तर "....

मला देव भेटला तर मराठी निबंध
 mala Dev bhetla tar Marathi nibandh 




| मला देव भेटला तर  निबंध मराठी

|     Mala dev bhetla tar essay in Marathi

       मला देव भेटला तर फारच मजा येईल मी खूप आनंदी होऊन जाईल. देवाचे वर्णन मी आमच्या घरात अभंगांमधून आणि कीर्तन मधून खूप मोठ्या प्रमाणात ऐकलेले आहे. मला देव भेटला तर मी देवाचे ते सुंदर रूप माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेईन.
         देवाशी मी काय बोलेल , हे मात्र मला देव कुठे भेटतो त्याच्यावर अवलंबून आहे. देव मला मैदानात भेटला तर मी देवाला सांगेल माझ्या बरोबर खेळतो का ? आणि मी जेवत असताना जर मला देव भेटला तर मी देवाला विचारल देवा भूक लागली का ? चला मग माझ्या बरोबर थोडसं जेवण करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अभ्यास करताना जर मला देव भेटला तर मी देवाला विनंती करेन देवा माझा एवढा अभ्यास पूर्ण करून द्या .मग मी तुम्हाला नारळ देईन.
         मला देव भेटला तर मी देवाशी खूप खूप गप्पा मारेन देव कुठे राहतो काय खातो सगळ्या लोकांवर लक्ष कसं ठेवतो त्याच्या हाताखाली काम करायला किती माणसे आहेत देवाचे दिनचर्या कशी आहे असे अनेक प्रश्न विचारून मी देवाला भंडावून सोडेन.
        मला कोणता देव भेटतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे. शंकरजी भेटले तर मी त्यांना सांगेल मला तुमच्या नंदीवर बसवून दूर फिरायला घेऊन जा. हिमालय पर्वतात असलेल्या कैलास नावाच्या पर्वतावर तुम्ही राहतात तो पर्वत मला दाखवा .तुमचे घर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पाची आणि माझी भेट घालून द्या . असे मी शंकरजीना सांगेन.
         कृष्ण भगवान जर मला भेटले तर त्यांनी जशी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तसे मला देखील थोडक्यात समजेल अशा भाषेत मध्ये समजून सांगा. अर्जुन तर फारच हुशार होता त्यामुळे त्याला ते समजले परंतु मी इतका हुशार नाही ना म्हणून मला सोप्या शब्दात सांगा अशी मी त्यांना विनंती करेन.
           इतर सर्व गोष्टी विसरलो तरी चालेल परंतु मला जर श्रीकृष्ण भेटले त्यांच्याकडून बासरी वाजवण्याचे कौशल्य मी नक्कीच शिकून घेईन. मला शिकवायला ते नाही म्हणाली तर तर मी त्यांना भरपूर दही सुद्धा खायला देईन. भगवान श्रीकृष्णांना दही तूप लोणी खूप आवडते हे मला माझ्या आजीने सांगितले आहे.
        देव बाप्पा आमच्या घरी किती दिवस राहायला आले तरीदेखील चालेल. आमच्या घरात देव रहायला आल्यानंतर मी त्यांना खूप खूप गोष्टी सांगेन. माझ्या मराठीच्या पुस्तकातील कविता सुद्धा म्हणून दाखवेल. काहीही करेन पण बाप्पाला आमच्या घरामध्ये अजिबात कंटाळा येऊ देणार नाही. देवबाप्पा ने जास्त दिवस आमच्या घरात राहायला म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
         आमच्या घरात दररोज सकाळी आई फारच छान नाश्ता बनवते मला देव भेटला तर मी देवाला आईच्या हातचे बनलेले पोहे आणि शिरा नक्की खाऊ घालेन. आई इतका छान शिरा बनवते की देवाने एकदा जर शिरा खाल्ला तर देवबाप्पाला दही ऐवजी शिराच आवडायला लागेल.
         शाळेत जाताना  मी देवाला छोट रूप घ्यायला सांगेन आणि शाळेत घेऊन जाईल. शाळेत जी मुले मला त्रास देतात त्या मुलांना चांगली अद्दल घडव अशी देव बाप्पाला विनंती करेन.माझ्या अभ्यासात सुद्धा बाप्पा मला मदत करेल. त्यामुळे माझा शाळेत पहिला नंबर आल्याशिवाय अजिबात राहणार नाही.
       माझी आजी जिन्यावरून पडली आणि तिचे कमरेचे हाड मोडले. त्यामुळे तिला हालचाल करता येत नाही व प्रचंड हाल होतात. मला देव भेटला तर मी त्याला विनंती करेन की माझ्या आजीला चांगले करून दे. माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला सुखी आणि आनंदी ठेव.
       देव बाप्पा कधीतरी आमच्या घरातून त्यांच्या घरी जाईलच त्यावेळी मला खूपच वाईट वाटेल. मला खूप रडू येईल. पण मी देवाला माझ्याकडेच ठेवुन घेतली तर मग देवाला सृष्टीचा कारभार कसा काय बघता येईल त्यामुळे माझ्या मनावर मोठा दगड ठेवून मी बाप्पाला त्याच्या कामासाठी मोकळा करेन. पण देवाला एक विनंती करायला मी अजिबात विसरणार नाही की बाप्पाने मला भेटण्यासाठी मला पाहिजे तेव्हा आले पाहिजे.
       

|मला देव भेटला तर, मराठी निबंध

|निबंध क्रमांक 2
   
        मला देव भेटला तर मी देवाला एक आवर्जून करेल की देवा, माझ्या आजूबाजूला माझ्या गावा जात नव्हे तर माझ्या संपूर्ण भारत देशामध्ये माणसामाणसात बंधुभाव नित्य वाढत राहू दे. अनेक वर्षांपासून माझ्या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे आणि संप्रदायाचे लोक  एकत्र राहत आहेत. ते सर्व लोक असेच गुण्यागोविंदाने नांदू दे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होऊ देऊ नकोस.
        गरीब आणि श्रीमंत एकमताने याठिकाणी मिळून मिसळून राहू दे. खूप मोठ्या कष्टाने आणि अनेक देशभक्तांच्या आहुतिने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा आनंद आणि सुख सर्व धर्माच्या  लोकांना उपभोगता यावे. अशी विनंती मी देव मला भेटला  तर नक्की करेन.
      सर्व लोकांमध्ये मानवता निर्माण व्हावी राष्ट्राविषयी प्रेम असावे. अशी बुद्धी सर्वांना दे. कुणीही एकमेकाची निंदा करू नये कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे वर्तन सर्वांकडून घडावे.
               



   प्रिय मित्रांनो तुम्हाला हे निबंध कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला देव भेटला तर तुम्ही काय कराल देवाशी कशा गप्पा मारा देवाकडे काय मागावे या सर्व गोष्टी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग तुमच्या भावना आणि तुमचे विचार जाणून घ्यायला  आम्हाला खूप आवडेल.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने