www.upkarmarathi.com

How to start income source? स्वतःचा पहिला income source कसा बनवायचा?



      Business ideas,जगात अनेक गोष्टींचे सोंग घेता येते परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही अशी एक जुनी म्हण आहे. पैसे नसल्यावर मनाची अवस्था कशी असते हे फक्त ज्याच्याकडे पैसे नाहीत तोच समजून घेऊ शकतो. जगामध्ये श्रीमंताला अनेक मित्र आणि नातेवाईक असतात परंतु गरिबाला मित्र आणि नातेवाईक फारच कमी असतात. आजच्या या लेखांमध्ये पैसे कमावण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे याविषयी मी माझे मत सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आपला इन्कम सोर्स कसा बनवायचा त्यासाठी काय करावे लागेल ? स्वतःच्या व्यक्तीमत्वात कसे बदल करावे लागतील??How to start income source? स्वतःचा पहिला income source कसा बनवायचा?

याविषयी आपण खालील मुद्दे बघूया.
मुद्दा क्रमांक एक

नेहमी सकारात्मक विचार करा (think positive)

बराच वेळ पर्यंत रिकामे बसून राहिल्याने किंवा लोकांचे नकारात्मक बोलणे ऐकत राहिल्याने आपले मन पूर्णपणे नकारात्मक होऊन जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याबरोबर जे काही चांगले किंवा वाईट घडते ते 90% आपले विचारच निश्चित करतात, त्या गोष्टीला आपले विचारच जबाबदार असतात. आपण स्वतः विषयी जसे वारंवार विचार करतो काही कालावधीनंतर आपण तसेच बनुन जातो.
    आपल्याकडे पैसे नसणे किंवा आपल्याकडे एखादी काम नसणे याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आपले हे नकारात्मक विचारच आहे त्यामुळे सर्वप्रथम डोक्यातून हे नकारात्मक विचार काढून टाका. माझ्याकडे चांगली नोकरी नाही, माझे नशिबच चांगले नाही, त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत याऐवजी माझ्याकडे चांगली नोकरी असेल किंवा चांगली काम असेल , तसेच माझे नशीब उत्तम आहे आणि माझ्याकडे एक दिवस भरपूर संपत्ती राहील असे सकारात्मक विचार सतत स्वतःला सांगत रहा.

मुद्दा क्रमांक दोन

पैसे कमावण्याचा पर्याय शोधा(find a way of income)

    तुम्ही जर तुमच्या आजूबाजूचे निरीक्षण केले तर एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणवेल की तुमच्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले तुमच्यापेक्षा कमी ज्ञान असलेले लोक मात्र तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे आणि तुमच्याहूनही अधिक आनंदी व समाधानकारक आयुष्य जगत आहे. म्हणजे जगात काम तर भरपूर आहे परंतु ते करणारे लोक कमी आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की मला माझ्या स्टॅंडर्ड चे काम मिळायला हवे. तुम्ही सकाळी असाच समज करून घेतला असेल तर सर्वप्रथम ते डोक्यातून काढून टाका आणि तुम्हाला पैसे कमवायचे आहेत हे डोक्यात धरा व कोणतेही काम लाज न बाळगता सुरू करा.
    जर तुम्हाला असे करताना अडचण वाटत असेल तर याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा ,,जसे की स्वतःला असा प्रश्न विचारा की ,आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? तुम्हाला खरोखर एका इन्कम सोर्स ची गरज आहे का? जर तुमचे उत्तर हो असे आले तर कोणतेही असे काम सुरू करा की ज्यामुळे तुमचे कोणते ना कोणते इन्कम सुरू होईल. त्यासाठी तुम्ही चहा विका ,भाजी विका ,नाहीतर एखाद्या कॉल सेंटरमध्ये काम करा, तुम्ही सुशिक्षित असाल तर कोणाला तरी शिकवा.

   हे सर्व करत असताना मनात पक्क ठरवा की हे काम तुम्हाला आयुष्यभर करायचे नाही. आणि दुसरी गोष्ट आज तुमचे इन्कम शून्य रुपये आहे पण तुम्ही दररोज महिन्याला हजार ,दोन हजार रुपये जरी कमवू लागले तरी काही दिवसांमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती आपोआप सुधारू लागेल यात अजिबात शंका नाही. ज्यावेळी तुम्ही आत्ताचा तुमचा इन्कम सोर्स सुरू केला होता त्यापेक्षा इन्कम सुरू झाल्यानंतरच्या वेळी तुमची निर्णय क्षमता अधिक विकसित आणि प्रगल्भ झालेली असेल.

मुद्दा क्रमांक तीन

एक पॅसिव्ह इन्कम चा सोर्स बनवा (build one passive income source)


जेव्हा तुम्ही मुद्दा क्रमांक दोन वर काम करत असणार तेव्हा मनात एक गोष्ट पक्की ठेवा की, तुम्हाला आत्ता जगत आहात त्यापेक्षा उत्तम आयुष्य जगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अजून पुढे जावे लागेल म्हणूनच आत्ता करत असलेल्या इन्कम सोर्स बरोबरच तुम्हाला कोणतीही एक असे काम स्टार्ट करायचे आहे की ज्यामुळे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम(passive income) सुरू होईल. म्हणजे तुम्ही कमी कष्ट केले तरीदेखील त्यातून उत्पन्न मिळत राहील असे उत्पन्न. आताच्या काळामध्ये पॅसिव्ह उत्पन्न बनवण्याचे अनेक सोर्स उपलब्ध आहेत फक्त शिकणारा आणि करणारा हवा. हा लेख संपल्यानंतर शेवटी मी तुम्हाला साथ अशा इन्कम सोर्स विषयी माहिती सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही हमखास पॅसिव्ह इन्कम तोही तुमच्या मनासारखा मिळवू शकता. पण पॅसिव्ह इन्कम बनवण्यामध्ये थोडा वेळ जातो हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्यातरी एका स्किलमध्ये स्वतःला परफेक्ट बनवावे लागेल. नवीन काही गोष्टी शिकाव्या लागतील. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधी कोणतेही काम सुरू करा आणि त्यानंतर त्याच्या जोडीने पॅसिव्ह इन्कम बनवण्यासाठी नवीन स्किल शिका.

मुद्दा क्रमांक चार

एकापेक्षा अधिक इनकम सोर्स बनवा (make multiple income sources)

   
    एका संशोधनात असे आढळून आले आहे की जगातील ज्या लोकांनी भरपूर पैसा कमावला त्यांचे कमीत कमी सात प्रकारचे पॅसिव्ह इनकम सोर्सेस आहेत. ज्यावेळी तुम्ही एक पॅसिव्ह इन्कम सुरू करता त्याचवेळी अनेक सोर्सेस बनवण्याचा प्रयत्न करा.

निष्कर्ष

   तर मित्रांनो आजच्या आपल्याHow to start income source? स्वतःचा पहिला income source कसा बनवायचा? या लेखांमध्ये आपण खालील मुद्द्यांचा विचार केला.

1) नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचारांना मनातून सर्वप्रथम काढून टाका. (Always think positive)

2) स्वतःची लाज बाजूला ठेवा आणि कोणत्याही कामाला सुरुवात करा. तुमच्यातील स्किल ओळखा व त्या अनुषंगाने देखील कामाला सुरुवात करू शकता.(find a way of income)

3) एक पॅसिव्ह इन्कम चा सोर्स बनवा (build one passive income source)


4)एकापेक्षा अधिक इनकम सोर्स बनवा (make multiple income sources)


    मित्रांनो तुम्हाला आजचा  How to start income source? स्वतःचा पहिला income source कसा बनवायचा? हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने