www.upkarmarathi.com

सकाळी लवकर उठण्याचे फायदे
|benefits of waking up early 



    Health tips: माणसाची सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे त्याचे आरोग्य होय. भरपूर पैसा आहे परंतु आरोग्य चांगले नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग घेता येणार नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार विहार व्यायाम असे अनेक उपाय आहेत परंतु आज आपण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठणे का गरजेचे आहे सकाळी लवकर उठल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.. या मराठी हेल्थ टिप्स |health tips in Marathi तुम्हाला फार उपयोगी ठरतील.

सकाळी लवकर उठण्याचे फायदे
 | सकाळी लवकर कसे उठावे ?|benefits of waking up early 

  1.  पहाटे लवकर उठणे ही चांगली सवय आहे पहाटे लवकर उठल्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.
  2. सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला व्यायाम करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो यामुळे आरोग्य सुधारते.
  3. पहाटे लवकर उठल्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते .
  4. सकाळी लवकर उठल्यामुळे पेशी मजबूत होतात त्यामुळे आपण सुंदर आणि तरुण दिसू लागतो.
  5. सकाळी लवकर उठल्यामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते व कामे लवकर पूर्ण होतात.
  6. सकाळी लवकर उठल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते त्यामुळे शरीर चांगले व स्वस्थ राहते.
  7. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे आपण स्वतःसाठी जास्त वेळ देऊ शकतो त्यामुळे आपली इच्छा शक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य सुद्धा सुधारते आपल्याला डिप्रेशन ,स्ट्रेस यापासून आराम मिळतो.


सकाळी लवकर कसे उठावे ?


  1.  सकाळी लवकर उठण्यासाठी आधी मनाची तयारी असावी.
  2. पुरेशी आणि चांगली झोप घेतली की सकाळी आपोआप लवकर जाग येते.
  3. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री योग्य वेळेवर झोपणे गरजेचे आहे.
  4. आपले राहणीमान व सवयी आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहतील ते बघावे.
  5. व्यायामाची सवय लावून घेणे फायद्याचे ठरते.
  6. अलार्म लावल्याने आपल्याला जाग येते परंतु झोप व्यवस्थित झालेली नसली तर लवकर उठून देखील कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही, त्यामुळे रात्री योग्य वेळेत झोपणे अत्यंत गरजेचे आहे. रात्री साडेदहा ते अकरा या दरम्यान झोपण्यासाठी योग्य वेळ आहे.
    लोक सकाळी लवकर उठण्यासंबंधी खालील प्रमाणे गुगलबाबांना विचारतात? खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. 

सकाळी लवकर का उठावे ?
सकाळी लवकर उठणे 
सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगा.
सकाळी लवकर जाग येण्यासाठी काय करावे ? सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे ?
सकाळी लवकर कसे उठायचे ?
सकाळी लवकर उठून काय करावे ?
सकाळी लवकर उठणे  महत्त्वाचे का आहे ?

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने