www.upkarmarathi.com

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ
|Marathi thoughts with meaning part- 2

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|
|मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|



    मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर Google वरती मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning यांचा शोध घेत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी येऊन पोहोचलेला आहात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा शोध संपलेला आहे... आयुष्यात मार्गदर्शक ठरतील व जीवनाला आकार देण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील असे मराठी सुविचार आणि त्यांचा अर्थ, Marathi thoughts with meaning, घेऊन आलो आहोत. चला मग अधिक वेळ वाया न घालवता बघूया, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning

मराठी सुविचार 1

कपडे रंगवल्याने मनाचा रंग बदलत नाही.


   बाहेरून  रूपाची सुंदरता दिसते... ती फक्त डोळ्यांना दिसते ,परंतु मनाचे सुंदरता ही वागण्यातून जाणवते ,म्हणून कितीही सुंदर कपडे घातले परंतु जर मन चांगले नसेल तर त्या सौंदर्याला काहीही किंमत नाही. त्याकरता बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्याला अधिकाधिक महत्त्व देऊन ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.

मराठी सुविचार 2

अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे.


     ज्ञान माणसाला स्वार्थ सोडून त्याग करण्याचे शिकवते जो व्यक्ती त्याग करू शकत नाही तो भरपूर शिकलेला असून देखील अज्ञानीच असतो. संपूर्ण निसर्ग आपल्याला त्याग आणि परोपकार ही वृत्ती शिकवत असतो .स्वार्थाचा त्याग करून परोपकारासाठी झटणे हेच मानवी जीवनाचे खरे तत्त्व आहे. अज्ञानामुळे मानवाला स्वतःची आणि निसर्गाची देखील ओळख पटत नाही अज्ञानी मनुष्य फक्त स्वतःच्याच कोशामध्ये गुरफटून राहतो त्याला फक्त स्वार्थ आणि स्वतःविषयीच मोह असतो म्हणून असे म्हणतात की अज्ञान हे माणसाला स्वार्थ आणि मोह याच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवते.

मराठी सुविचार 3

आळस आणि अति झोप दारिद्र्याला जन्म देतात.


   सतत कृतिशील राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे .कृतिशील मनुष्याकडेच यश चालून येते. जो सतत आळस आणि निद्रा याच्या आहारी असतो त्याच्याकडे यश कधीही चालून येत नाही . यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात व योग्य नियोजन अनुसार त्या दिशेने प्रयत्न करावे लागतात, परंतु जो व्यक्ती आळस आणि निद्रा यांच्या आहारी जातो त्याला कधीही यश मिळत नाही.

 मराठी सुविचार 4

जो कर्तव्याला जागतो तो कौतुकास पात्र होतो.


   काम आणि कर्तव्य यामध्ये फरक आहे. काम हे कोणी आपल्याला सांगू सुद्धा शकते परंतु कर्तव्य हे आपले आपण ठरवावे लागते कर्तव्य पार पाडताना व्यक्तीची सतत विवेक बुद्धी सतत साथ घालत असते जो व्यक्ती योग्य अयोग्य याचा विचार करून आपल्या कर्तव्य निष्ठाशी प्रामाणिक राहतो तो सदैव कौतुकास पात्र ठरतो.


मराठी सुविचार 5

माणुसकी हेच सर्व धर्माचे सार आहे.


माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हाच खरा धर्म आहे . इतरांचे  दुख जाणून त्याला सुख देणे ,अडचणीत त्याला मदत करणे हाच खरा धर्म .सर्व धर्माचे मूळ हेच तत्त्व आहे.


मराठी सुविचार 6

स्वार्थ माणसाला क्रूर बनवतो.


  ज्या व्यक्तीला स्वतःच्या भल्याशिवाय दुसरे काहीही सुचत नाही तो इतरांच्या चांगल्या चा विचार करूच शकत नाही स्वतःचे भले होण्यासाठी तो इतरांचे गळचेपी सुद्धा करू शकतो आणि इतरांच्या दुःखाला शृंग लावू शकतो आणि यातच तो स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.

मराठी सुविचार 7

सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य होय.


   आपण जसे विचार ऐकतो किंवा आत्मसात करतो त्या पद्धतीनेच आपले वर्तन असते आणि आपले व्यक्तिमत्वही तसेच बनून जाते त्यामुळे सतत सुविचार ऐकत रहावे सुविचाराने मनाला योग्य आकार मिळतो आणि मनुष्य प्रगतीपथावर अग्रेसर होत राहतो.

 मराठी सुविचार 8

जे काम करावयाचे असेल ते आवडीने करावे.


   एखादी कृती करताना जर मनापासून केली नाही तर तिच्यामध्ये पूर्णता येणे अशक्य आहे. आणि ते काम सतत अपूर्ण व अयोग्य पद्धतीनेच होते. मनापासून केलेल्या कामात व्यक्ती कष्ट देखील पूर्ण करतो आणि आनंद मिळवण्यासाठी काम करतो त्यामुळे ते काम यशस्वी तयार होतेच परंतु आकर्षक देखील होते आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर परमानंद प्राप्त होतो म्हणून जे काम करावे ते अगदी मनापासूनच करावे.

मराठी सुविचार 9

मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो.


     ज्या ज्या लोकांनी आयुष्यात काहीतरी मोठे कार्य केले आहे त्या सर्व लोकांनी अनेक संकटांचा सामना केला आहे हे आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांसारख्या महान विभूतींनी स्वराज्य स्थापनेचे महान कार्य हाती घेतले त्यावेळी त्यांना सुरुवातीपासूनच मरणप्राय संकटांना सामोरे जावे लागले परंतु न डगमगता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आणि त्यामुळेच ते आज महान राजे म्हणून गणले जातात.

मराठी सुविचार 10

वाचन हे मनाचे अन्न आहे.


    शरीर धष्टपुष्ट होण्यासाठी त्याला योग्य सात्विक आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे .अशा आहारामुळे शरीराचे पोषण होऊन ते निरोगी बनते त्याचप्रमाणे मनाला योग्य वाचनाद्वारे सुविचार आणि योग्य धारणा यांचे खाद्य मिळून मन धष्टपुष्ट होऊन चांगल्या कामासाठी तयार होते.

मराठी सुविचार 11

विद्या विनयेन शोभते.


      ज्ञान भरपूर असेल परंतु दुसऱ्यांशी प्रेमाने नम्रतेने आणि विनयशीलतेने वागता येत नसेल तर अशा ज्ञानाची किंमत काडीमोल होते. विनयशील नसलेला ज्ञानी व्यक्ती देखील लोकांना आवडत नाही. म्हणूनच म्हटले जाते की नम्रता हा ज्ञानी माणसाचा गुण आणि अलंकार आहे.

 मराठी सुविचार 12

गरज ही शोधाची जननी आहे.


   जोपर्यंत एखाद्या गोष्टीची निकड निर्माण होत नाही तोपर्यंत तिच्यासाठी मनुष्य प्रयत्न करत नाही. जितकी गरज तीव्र असेल तितक्या वेगाने मनुष्य ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणूनच असे म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे.

मराठी सुविचार 



             प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हे मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ |Marathi thoughts with meaning - part 2 कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने