www.upkarmarathi.com

           मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर Google वरती  मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning यांचा शोध घेत असाल तर  तुम्ही अगदी योग्य ठिकाणी येऊन पोहोचलेला आहात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा शोध संपलेला आहे... आयुष्यात मार्गदर्शक ठरतील व जीवनाला आकार देण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील असे मराठी सुविचार आणि त्यांचा अर्थ, Marathi thoughts with meaning, घेऊन आलो आहोत. चला मग अधिक वेळ वाया न घालवता बघूया, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning|Marathi suvichar with meaning ||१० छोटे सुविचार मराठी अर्थ


मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning|Marathi suvichar with meaning
मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ
|Marathi thoughts with meaning|Marathi suvichar with meaning 
|१० छोटे सुविचार मराठी अर्थ

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ

|Marathi thoughts with meaning part 1
|Marathi suvichar with meaning 
|१० छोटे सुविचार मराठी अर्थ

सुविचार क्रमांक 1

निंदकाचे घर असावे शेजारी


    निंदक म्हणजे आपली निंदा करणारा. निंजा व्यक्ती सतत आपल्या काहीतरी चुका काढत असतो. आपली निंदा करणाऱ्या माणसाला आपला विकास सहन होत नाही त्यामुळे तो सतत आपल्या चुका दाखवत असतो.
      त्याने दाखवलेल्या चुकांवर विचार करून त्या सुधारणाचा प्रयत्न करण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. व आपल्याला आपल्या मधील चुका शोधण्यासाठी वेळ वाया घालवावा लागत नाही ,कारण त्या आयत्याच आपल्याला शोधून मिळतात. त्यामुळेच म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी.

 सुविचार क्रमांक 2

आपण जे पेरतो तेच उगवते


       निसर्गाचा एक नियम आहे आपण ज्या प्रकारे इतरांना देतो तेच आपल्याला परत मिळत असते. जमिनीत आपण आंब्याची कोय लावली तर त्यापासून आंब्याची झाड निर्माण होते आपण कारल्याचे बी लावले तर कारल्याचीच वेळ लिहून त्यातून कडू कारणे देखील आपल्याला मिळतात याचाच अर्थ असा की आपण जे देतो जे पेरतो तेच आपल्याला पुन्हा परत मिळत असते आपण जर इतरांना प्रेम माया आणि आपुलकी दिली तर त्या बदल्यात आपल्याला प्रेम माया आणि आपुलकीच मिळते यामध्ये येत किंचितही शंका नाही.

सुविचार क्रमांक 3

संकटा पेक्षा संशय यशाला फार घातक असतो

     
  आयुष्य जगत असताना संकटे आणि अडचणी येणारच तो आयुष्याचा अविभाज्य घटक आहे यामुळेच आपले आयुष्य अधिक सुंदर आणि आकर्षक बनत असते.
       येणाऱ्या संकटांवर मात करताना आपल्याला यश मिळेल किंवा नाही अशी शंका घेऊन आपण आपल्या क्षमतांवर शंका घेणे अत्यंत अयोग्य आहे. शंका घेतल्यामुळे एखाद्या कामात आपण आपली पूर्ण शक्ती लावू शकत नाही. त्यामुळे यश मिळत नाही.
      संकट कसेही असले तरी आपण स्वतःच्या क्षमतेवर शंका न घेता त्याचा सामना करण्याचा सतत प्रयत्न करायला पाहिजे. संजय घेतल्याने आपण कोणत्याही कामाची नियोजन योग्य रीतीने करू शकत नाही व अपयश पदरात पडते ,म्हणूनच म्हणतात संकटापेक्षा संशय यशाला फार घातक असतो.


 सुविचार क्रमांक 4

आळस माणसाचा शत्रू आहे.


     बाह्य जगात असलेले आपले शत्रू आपल्याला सहज दिसतात, परंतु आपल्या स्वतःच्या आत लपलेले आपलेच शत्रू म्हणजे आपले दुर्गुण आपल्याला दिसत नाहीत. असाच एक शत्रू म्हणजे आळस. 
        आळस करणाऱ्या माणसांमध्ये कोणतेही काम करण्यासाठी उत्साह अजिबात दिसून येत नाही आणि मग कामात जर उत्साह नसेल तर ते काम योग्य रीतीने कसे होणार? म्हणून सर्वात आधी या आपल्या आत असलेल्या शत्रूला नष्ट करा.


सुविचार क्रमांक 5

करावे तसे भरावे.

    
       विज्ञानाच्या नियमानुसार कृती झाली की त्याला प्रतिकृती मिळते म्हणजेच क्रियेला प्रतिक्रिया ही होतच असते. आपण इतरांचे चांगले केले तर आपले देखील चांगले होणार आणि इतरांची वाईट केले तर आपले वाईट होणे हे ठरलेलेच आहे.
      जमिनीत आपण जे बियाणे पेरतो त्याच बियाणाचे रोपटे आपल्याला भविष्यात मिळत असते. चुकीच्या कर्माचे फळ हे चुकीचेच असणार त्यामुळे असे म्हटले जाते की करावे तसे भरावे.

 सुविचार क्रमांक 6

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी


      जगात पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात परंतु खरं प्रेम स्वार्था विना मिळेलच याची अजिबात शक्यता नाही. हे निर्व्याज प्रेम फक्त आपल्याला आईकडून मिळत असते. आईच्या प्रेमाला कोणत्याही प्रकारची मोल नको असते.
      मुलगा कसाही असो  आईचे त्याच्यावर नितांत प्रेम असते. त्याच्या सुखाच्या दुःखाच्या प्रत्येक काळामध्ये आई एखाद्या डोंगरासारखी त्याच्या पाठीशी उभी असते. जीवनातील कठीण निर्णय घेताना आई एक उत्तम मार्गदर्शक बनते ,तर आजारपणात सेवा करणारी एक सेविका ही बनते. आईच्या प्रेमाची कशाबरोबरही  तुलना होऊ शकत नाही त्यामुळेच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

सुविचार क्रमांक 7

सत्य पापी माणसाला सापासारखे दंश करत असते.


      पापी माणसाचा जीवनाचा आधारच मुळात असत्य असते. असत्य गोष्टीच पापी माणसाला अत्यंत प्रिय वाटत असतात त्यामुळे सत्य बोलणारे आणि सत्य दोन्हीही त्या माणसाला नकोसे वाटणारच.
      सत्य म्हणजे पापी माणसाच्या जगण्यालाच सरळ सरळ अडसर होईल. त्यामुळे सत्य पापी माणसाला सापासाठी दंश करत असते असे म्हटले जाते.

 सुविचार क्रमांक 8

आपली पहिली शाळा आईच असते.


      मूल जन्माला येते ते आईच्या कुशीतच वाढते. आईच मुलाला बोबडे बोल बोलायला शिकवते .आईचा हात धरून मुले मोठी होतात. मुलांचे भरण पोषण सर्वच करते.
     थोडे मोठे झाल्यानंतर संस्कारांचे धडे आईच देते. इतरांशी बोलावे कसे वागावे कसे हे सर्व शिष्टाचार आई आपल्याला शिकवत असते आपली चूक झाली तर योग्य मार्गदर्शनही करत असते आणि त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी विविध उपायही सांगत असते यामुळे आपले व्यक्तीमत्व सतत खुलत राहते . भविष्यात जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य ती प्रेरणा मिळत राहते ,त्यामुळेच म्हणतात आईच मुलाची पहिली शाळा असते.

 सुविचार क्रमांक 9

मूर्ती लहान पण कीर्ती महान.

   
      सध्याच्या जगामध्ये बरेचसे लोक देखाव्याला खूपच महत्त्व देताना दिसतात. अंगावर पांढरे शुभ्र कपडे घातले तरीही आचरण मात्र अत्यंत भ्रष्ट असते. अशा लोकांच्या दुटप्पी वागण्याला काहीही महत्त्व नाही. देखाव्यापेक्षा प्रत्यक्ष व्यक्तिमत्व सुधारण्यावर भर देण्यात खूपच गरजेचे आहे.
      अनेक लोकांना शारीरिक व्यंग असतात परंतु त्यांचे आचरण अत्यंत शुद्ध निर्मळ आणि पवित्र असते .अशी माणसे लोकांना खूपच आवडतात आणि ती इतरांमध्ये लवकरच प्रिय होतात. शरीराच्या मर्यादा ओलांडून जीवनात काहीतरी भव्य दिव्य करून ते यश संपादन करतात.
      भलेही आपले शरीर इतरांसारखे भव्य दिव्य आकर्षक नसले तरी देखील आपले कर्म मात्र आपल्याला भव्यदिव्यता प्राप्त करून देऊ शकते. त्यामुळेच म्हटले जाते मूर्ती लहान पण कीर्ती महान.

 सुविचार क्रमांक 10

अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.

    
      ज्या पद्धतीने एखादी भव्य वास्तू निर्माण करताना आधी जवानीत खोल खड्डा करावा लागतो आणि मग ती वस्तू हळूहळू उभी राहते. अगदी त्याच पद्धतीने कोणतेही काम करत असताना ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असे अजिबात होत नाही. अनेकदा अपयश येते परंतु त्या अपयशामधून खचून न जाता आपण पुन्हा नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करायला हवी.

      अपयश का मिळाले? यावर चिंतन करून अपयश मिळण्याचे कारणे नष्ट केली पाहिजेत. मग यश मिळणार यात कोणतीही शंका नाही. अपयशाकडे आपली हार म्हणून न बघता जिंकण्याची नवीन संधी म्हणून बघता आले पाहिजे, म्हणूनच म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

       प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हे मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ|Marathi thoughts with meaning part 1|१० छोटे सुविचार मराठी अर्थ कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. तसेच तुम्हाला अजून इतर अनेक सुविचार आणि त्यांचे अर्थ मराठीत हवे असतील तर नक्की कमेंट करून कळवा .

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने