www.upkarmarathi.com

संत श्री झिंग्राजी महाराज अमरावती

 | sant jhingraji maharaj amravati Information in Marathi 


संत श्री झिंग्राजी महाराज अमरावती |
संत श्री झिंग्राजी महाराज अमरावती | 



     अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुर्जी या तालुक्यात मुऱ्हा बुद्रुक नावाचे गाव आहे. या गावांमध्ये जगदंबा देवीचे एक अत्यंत प्राचीन व जागृत मंदिर आहे. मुऱ्हा हे एक लहानसे खेडेगाव आहे या गावांमध्ये पांडे दांपत्याच्या पोटी संत जनवराचे यांचा जन्म झाला. इसवीसन 1870 मध्ये महाराजांनी जन्म घेतला.

    धनगर कुळातील कुटुंबात जन्म झाल्यामुळे मेंढी पालन करणे हाच कुटुंबाचा व्यवसाय होता. पांडे कुटुंबात तीन मुले व तीन मुली होत्या त्यापैकी द्वितीय चिरंजीव म्हणजेच चंद्राचे महाराज होय.

    झिंग्राजी पाच वर्षाचे झाले तोपर्यंत बोलत नव्हते तरीदेखील त्यांच्यातील देवत्व वयाच्या आठव्या वर्षापासूनच लोकांना जाणवू लागले होते. झिंग्राजी लहान असताना ची गोष्ट. झिंग्राजी यांचे वडील पुराजी मेंढ्या घेऊन चारण्यासाठी जात असत .त्यावेळी झिंग्राजीने देखील त्यांच्या मागे हट्ट धरला की ती सुद्धा मेंढ्या चारण्यासाठी येणार परंतु मेंढ्या चारताना एवढ्या लहान मुलाकडे कसे लक्ष द्यायचे? या विचाराने पुराजी झिंग्राजीना नाही म्हणत होते .परंतु बाल हट्टापुढे काहीही चालले नाही.

      मेंढ्या चारत असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला व नदीला पूर आला. आता लहान मुलाला घेऊन नदीच्या पलीकडे कसे जायचे या विचारात पुराजी असतानाच झिंग्राजीने पुराच्या पाण्यात उडी मारली आणि पुराजीना काही कळायच्या आतच तो नदीच्या पलीकडे निघूनही गेला. जिगर आजींचा हा चमत्कार बघून पुराजी आश्चर्यचकित झाले व घरी आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला हा सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले ,"आपल्या पोटी जन्माला आलेले बाळ साधेसुधे नसून ते अवलिया आहे."

     एके दिवशी असेच जी महाराजांचे एक मेंढरू अंगणामध्ये मरून पडले होते त्यावेळी झिंग राजूने मेंढा जवळ जाऊन ते त्याला थोपटू लागले. फुकटात असताना ते मेंढ्या ला उठ उठ असे म्हणत असत. तितक्यात त्या ठिकाणी नारायण नावाचा एक साधू आला झिंगराजी मेंढर आला उठ उठ करत होते व मेंढरू खरोखर उठून उभे राहिले. हा चमत्कार त्या नारायण साधूंनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला .तेव्हा त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. झिंग्राजीनी नारायण साधूंना बोध दिला.

        शेगावचे श्री गजानन महाराज आणि झिंगराजी महाराज यांची भेट झालेली होती. गजानन महाराजांच्या समकालीन सर्व  संतांनीगजानन महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते आणि या सर्व संतांची गजानन महाराजांचा संपर्क सतत होता.

     गजानन महाराजांचे एक शिष्य भास्कर पाटील गजानन महाराजांना एकदा मुऱ्हा  या गावी घेऊन गेले. त्या गावांमध्ये भास्कर पाटलांची एक मुलगी दिलेली होती. गजानन महाराज देवीच्या मंदिरात उतरले तेव्हा गावातील परशुराम पाटील यांना गजानन महाराज आल्याचे समजले त्यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी येण्याची विनंती केली महाराजांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन परशुराम पाटलांच्या घरी ते गेले त्यांनी महाराजांची भक्तीभावाने पूजा केली पंचपक्वान्नाचे भोजनाची व्यवस्था केली तेव्हा महाराज ताटावरून उठले आणि गावात धावत जाऊन राजे या बालकास उचलून घेऊन आले त्यांनी झिंगराजीना जेऊ घातले आणी म्हणाले, आज पोटभर जेव कांदा भाकर भाजी खाऊन तृप्त हो पुढे तुला आडगावला भेटेन तेव्हा रिद्धी सिद्धी देईन. अशाप्रकारे श्री गजानन महाराज आणि झिंग्याचे महाराज यांच्या प्रथम भेटीचा उल्लेख श्री गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र वासुदेव महाराज लिखित ग्रंथात आहे.

        त्यानंतर काही दिवसांनी दोघांची वडगावला भेट झाली तेव्हा दोघांमध्ये काय बोलणे झाले हे कोणालाही ऐकू येत नव्हते फक्त त्यांची काहीतरी चर्चा चालू आहे असेच दिसत होते. त्यांचे मन आणि हावभाव व इतरांना कळणे केवळ अशक्य होते. आडगावामध्ये या दोन्ही संस्थांचे गावकऱ्यांनी मिरवणूक काढली.

     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने