www.upkarmarathi.com

                       निसर्ग माणसावर सहस्र हातांनी उपकार करत असतो . माणसाच्या गरजा भागवण्यासाठी भरभरून देत असतो. अनेक वनस्पती प्राणी पक्षी यांच्या निर्मितीने मनुष्यासाठी निसर्गाने मदतीचे द्वारेच खुले करून दिले आहे .
        अनेक वनस्पती माणसाला आजारातून मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात ,तर काही वनस्पती माणसाची भूक भागवण्यासाठीही हितकर आहेत. अशाच एका वनस्पतीची आपण आज माहिती बघूया .
 आजच्या लेखामध्ये आपण सुरणाच्या भाजीचे फायदे उपयोग या विषयी माहिती बघूया. चला तर मग बघुया| elephant foot vegetable information in Marathi.

 |सुरणाची  माहिती  मराठीमध्ये
 | elephant foot vegetable information in Marathi 

Few lines about elephant foot vegetable in Marathi


         या वनस्पतीला मराठीमध्ये सुरण असे म्हणतात. ही वनस्पती दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलते. सुरणाच्या फुलांची कळी जांभळ्या कुंभाच्या रुपात जमिनीतून बाहेर पडते आणि नंतर फुलते. सुरणाच्या वनस्पतीवर नर आणि मादी हे दोन्ही एकाच झाडावर असतात.
      वाढ पूर्ण होत असताना हे पुष्पगुच्छ दंडगोलाकार दांड्या वर एकत्र वाढत असतात वरच्या भागामध्ये श्लेष्मल म्हणजे आवरण असते यामध्ये एक स्त्राव असतो .ज्यामुळे या झाडाचा तिखट वास येतो. या वासामुळे कीटक आकर्षित होतात. कीटकांमुळे याचे परागीभवन होण्यासाठी मदत होते.
      ज्यावेळी फुले फुलतात त्यावेळी मधी फुले चांगल्या पद्धतीने फुललेली असतात. या मादी फुलांमधून खूप वास येत असतो आणि या वासामुळे या ठिकाणी कीटक आकर्षित होतात व नर फुलावरून आणलेले परागकण त्यांच्या पायांना किंवा पंखांना चिकटलेले असतात .ज्यावेळी हे कीटक फुलांच्या वासाने मध्ये फुलाजवळ जातात त्यावेळी हे फुल बंद होते व किटक अडकतात. पुरुष बीज त्या ठिकाणी पडते म्हणजेच परागीभवन होते. संपूर्ण रात्रभर ते फुल बंद असते.
     दुसरे दिवसानंतर पुढे पुन्हा उमलू लागतात व त्यांचा सुगंध दरवळतो. या सुगंधामुळे नर फुलं जवळ कीटक आकर्षित होतात.यामध्ये एक गमतीदार गोष्ट अशी आहे की ज्या स्त्री फुलांमध्ये आदल्या वेळी परागीभवन झालेले आहे ती फुले आता फुलत नाहीत. अशा रीतीने परागीभवनावर देखील नियंत्रण ठेवले जाते व प्रजनन देखील प्रतिबंधित केले जाते.
     पुढच्या 34 ते 36 तासांमध्ये फुलांना पहिला बहर आल्यानंतर फुलांचे मादी विकसित होऊ लागते व तिच्यापासून लाल फळ आकार घेऊ लागते हळूहळू फुलाचे इतर भाग कोमेजून जाऊ लागतात व सुरण तयार होते. फुले भरलेली असताना तील उष्णता निर्माण करतात व पुढे पाच दिवसांनी मरून जातात.
     सुरणाचा कंद थोडासा ओबडधोबड थोडासा चट्टा गर्द तपकिरी रंगाचा अर्धगोलाकृती असतो आतल्या बाजूने किंचित लालसर किंवा बदामी असतो.

    दक्षिण पूर्व आशिया ,दक्षिण आशिया, ओशनिया, न्यू गिनी ,मादागास्कर या बेटांमध्ये सुरणाचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पूर्वीच्या काळी सुरणाचा मुख्य उगम स्त्रोत भारत आहे असे समजले जात होते परंतु 2017 च्या अभ्यासामध्ये असे दिसून आले की, दक्षिण पूर्व आशिया मध्ये भारतापेक्षा अधिक प्रमाणामध्ये सुरणाच्या विविध प्रकारांची उपलब्धता आहे त्यामुळे आग्नेय आशिया पासूनच पश्चिम मेकडे थायलंड आणि भारतात सुरणाचा प्रसार झाला असे म्हटले जाते.

सुरणाचे फायदे |what is the use of elephant foot?

  सुरण हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
  • अग्निमांद्य म्हणजेच भूक कमी लागणे यावर सुरण अत्यंत गुणकारी आहे.
  • दमा ,खोकला ,जंत , प्लीहा आणि यकृताचे विकार यावर सुरण लाभकारी आहे.
  • संधिवातामध्ये सुरणाच्या कंदाचा किंवा बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.
  • सुरणाची भाजी खाल्ल्याने आतड्यांच्या तक्रारींवर बराच फायदा होतो.
  • मुळव्याधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारामध्ये सुरणाचा समावेश केला पाहिजे.

सुरणाचे प्रकार (types of elephant foot)

सुरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत .
  1. वन्य सुरण
  2. ग्राम्य सुरण
  •   वन्य सुरणालाच जंगली सुरण असे देखील म्हटले जाते .हे सुरण जंगलामध्ये आपोआप वाढते.
  • याउलट ग्रामीण , गावठी ,  या सुरणाची लागवड करावी लागते.
  • जंगली सुरण मोठ्या प्रमाणामध्ये औषधासाठी वापरले जाते. तर गावठी सुरण हे खाण्यासाठी वापरतात.
  • ज्याप्रमाणे आळूच्या  पानांमध्ये  कॅल्शिअम ओक्झलेटचे स्फटिक असतात. त्याप्रमाणेच सुरणात कॅल्शियम ओक्झलेट असल्यामुळे खाज येते.
  • ग्रामीण सुराणा पेक्षा जंगली सुरणामध्ये याचे प्रमाण जास्त असते.

सुरणाचे उपयोग (uses of elephant foot vegetable)


  1. सुरण भूक वाढवते. जठराग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थित भूक लागते.
  2. सुरणाच्या कंदापासून बनवलेली भाजी मूळव्याधीसाठी अत्यंत गुणकारी आहे.
  3. सुराणा मध्ये अ ब आणि क जीवनसत्व असतात.
  4. श्वास नलिकेमध्ये होणारा दाह पोटदुखी वांती रक्तविकार हत्तीरोग मुळव्याध अग्निमांद्य यावर सुरण अत्यंत उपयुक्त आहे.

निष्कर्ष 

     प्रिय वाचक मित्रहो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण सुरणाची माहिती मराठीमध्ये|elephant foot vegetable information in Marathi बघितली यामध्ये सुरणाचे उपयोग, सुरणाचे फायदे, सुरणाचे प्रकार या सर्व गोष्टी आपण बघितल्या . सुरणाची वाढ कशी  होते?  त्याचे झाड कसे असते  याविषयी गमतीशीर माहिती आपण या लेखामध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.

खालील लेख अवश्य वाचा 




    

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने