www.upkarmarathi.com

|Majha avadta pakshi Marathi nibandh

|Majha avadta pakshi Marathi nibandh

|Majha avadta pakshi Marathi nibandh

माझा आवडता पक्षी कोंबडी मराठी निबंध


     माझा आवडता पक्षी कोंबडी आहे. कोंबडी वेगवेगळ्या रंगांची असते. लाल ,काळी, पिवळी अशा अनेक रंगांची कोंबडी मी पाहिलेली आहे. आमचे शेतकऱ्याचे घर असल्यामुळे आमच्या घरात बकऱ्यांबरोबर कोंबड्या देखील पाळलेल्या आहेत.
    आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि सगळ्या पक्षांचा राजा गरुड आहे. परंतु गरुड आणि दोन्ही पक्षांना पाहिलेले भरपूर लोक आपल्याला सापडतील .याउलट कोंबडी न पाहिलेले व्यक्ती आपल्याला बघायला मिळणे जवळजवळ अशक्य आहे. मला तरी वाटते की कोंबडीला राष्ट्रीय प्राणी करून टाकायला पाहिजे. त्या कोंबडीला पक्ष्यांचा राजा म्हणुन घोषित करायला देखील काही अडचण नाही.
मी दररोज सकाळी कोंबड्यांना खुराड्यातुन बाहेर सोडतो. कोंबड्या खुराड्यातुन बाहेर निघाल्या की सगळीकडे पळत सुटतात. त्यांना जिकडे दाणे दिसतील तिथे त्या जात असतात.
    कोंबडीला उकरण्याची फार घाण सवय असते. कोंबडीला किती धान्य टाकले तरीसुद्धा ती पायाने ते उकरतच असते. आमच्या घरामध्ये वीस कोंबड्या होत्या आता  फक्त पाचच रहिल्या. बाकीच्या कोंबड्या कुठे गेल्या हे मला माहित नाही. पण ज्या दिवशी माझे आणि माझ्या आईसाठी वेगळे जेवण बनवलेले असते ्याच्या दुसर्‍या दिवसापासून आमच्या घरात एक एक कोबडी कमी झालेली दिसते. कोंबडी कुठे गेली असे विचारल्यावर आजीचे उत्तर मात्र ठरलेले असते की, कोंबडीला कुत्रे घेऊन गेले.
       कोंबडी अंडे देते. आमच्या बाळाच्या अंगणवाडीतल्या ताई सुद्धा अंडी देतात. त्यांनी बाळाला दिलेली अंडी आमच्या कोंबडीच्या अंड्यापेक्षा छोटी असतात. आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा आमच्या कोंबडीला खूप त्रास देतो. तो सारखा त्याच्या मागे धावतो मग आमची कोंबडी देखील पिसारा वर करून वेगाने पळते.
        कोंबडी अंडी घालते त्यावेळी ती खूपच आक्रमक बनते. तिच्या अंड्या जवळ कोणी केले तर ती आक्रमण करते आणि चोचीने अंड्यांचे संरक्षण देखील करते. कोंबडी एवढीशी दिसते परंतु ती फार जोरात चोच मारते मला देखील तिने डोक्यामध्ये चोच मारली होती. रक्त निघाले होते तेव्हापासून मी कोंबडी चा नाद सोडून दिला.
      कोंबडीच्या अनेक जाती असतात. पण माणूस प्रत्येक जातीची कोंबडी खाऊन फस्त करतो. माणसाला कोंबडी कोणत्या जातीची आहे याचे काही घेणे देणे नाही . फक्त ती कोंबडी पाहिजे म्हणजे काम झाल.

          प्रिय मित्रांनो तुम्हाला हा माझा आवडता पक्षी कोंबडी निबंध कसा वाटला? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला अजूनही कोणता निबंध हवा असेल ,तर तेही कळवा .खूप खूप धन्यवाद.
     
        
  1. माझा भाऊ
  2. मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची  कैफियत 
  3. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.

      

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने