1001marathiessay.blogspot.comमाझे बालपण मराठी निबंध
Maze balpan Marathi nibandh

माझे बालपण मराठी निबंध लेखन
majhe balpan marathi nibandh

माझे बालपण मराठी निबंध लेखन
 | majhe balpan marathi nibandh lekhan


       प्रत्येकाच्या जीवनातील रम्य आणि आनंदमय काळ म्हणजे बालपण होय. बालपणाचा काळ हा अतिशय सुखकारक आणि आनंददायी असला तरीदेखील बालपणात त्याची जाणीव अजिबात होत नाही. हीच खरी काळाची गंमत आहे. 
      बालपणा मध्ये प्रत्येकाच्या जीवनात आनंद ओसंडून वाहत असतो. बालपणाचा काळ इतका आनंदी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अपेक्षा नसणे हे आहे. याकाळात कोणत्याच व्यक्तीपासून कसलीही अपेक्षा नसते मुळात अपेक्षा  म्हणजे काय ? हेच या काळामध्ये समजत नाही. जी गोष्ट जशी आणि आणि ज्या प्रकारे मिळते त्या पद्धतीने तिचा आनंद घेणे एवढेच या काळात समजते.
      बालपणातील व्यवहारही अगदी सरळ सरळ असतात त्यामध्ये कपट अजिबात नसते. किंवा कुणाच्या भावना दुखावल्या जातील अथवा कुणाच्या भावना जपाव्या लागतील या गोष्टींचेही  बंधन बालपणामध्ये अजिबात पाळले जाते नाही. असे असले तरी देखील मनामध्ये मात्र कुणाविषयी  देखील कोणत्याही प्रकारचा आकस अजिबात नसतो.
       बालपण श्रीमंताच्या घरात गेले असो आता गरीबाच्या घरात गेलेले असो श्रीमंती गरिबीचा बालपणाशी काहीही संबंध नसतो. माझे बालपण देखील असेच फार मजेत गेलेले आहे. चला तर मग बघुया एक छानसा निबंध "माझे बालपण ".

    या निबंधावर आधारित प्रश्न खालील प्रमाणे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.

माझे बालपण या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
१) आजोबा आजी
२) शेत
३) झोका
४) स्वभाव
५) पोहणे
६)  आठवणी
७) सण समारंभ
८) मित्रपरिवार इत्यादी
     माझे  बालपण मराठी निबंध
 | माझे बालपण मराठी निबंध लेखन
 | majhe balpan marathi nibandh lekhan |

       माझ्या बालपणाच्या फार गमतीशीर आठवणी आहेत. वडील नोकरीला असल्यामुळे माझे बालपण बऱ्यापैकी बाहेरगावी गेलेले आहे. असे असले तरी देखील वडिलांची नोकरी आमच्या मूळ गावाच्या जवळच असलेल्या गावांमध्ये  होती. त्यामुळे मला बऱ्याचदा आपल्या आजोळी जाण्याची संधी मिळत असे.
       आजोळी गेल्यानंतर माझ्या आनंदाला तर काही मर्यादाच राहत नसे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे माझे आजोबा.
      आजोबा म्हणजे माझ्यासाठी कल्पवृक्षच आहेत. आजोबा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायचे. आजोबांचा पेहराव म्हणजे अगदी शुभ्र रंगाचा असायचा. आजोबा त्यांच्या धोतरा चे छोटीशी खोड करून त्यामध्ये आंबे जांभळ बोरे असेल आमच्या शेतातील फळे माझ्यासाठी घेऊन यायचे.
      आजोबा वारकरी असल्यामुळे त्यांना भरपूर अभंग पाठ होते. ते मला असेल तर तुकाराम, संत एकनाथ ,संत ज्ञानेश्वर यांचे अनेक अभंग सुंदर चालीत म्हणून दाखवायचे.
त्यातील काही अभंग मलाही पाठ झाले होते. ते अभंग आजही माझ्या नित्य स्मरणात  आहेत.
        मे महिन्याच्या  सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळी भावंडं एकत्र जमत असू. असलेल्या आंब्याच्या झाडाला उंच झोका बांधायचो. पाळीपाळीने भरपूर झोका खेळायचो. झोका उंच उंच आकाशात जायचा त्यावेळी आम्ही ही अनेक बालगीत मोठ मोठ्याने ओरडायचो . उंचावरून झोका खाली येतांना पोटामध्ये गुदगुल्या होत आहे असा मला भास व्हायचा. झोक्याच्या त्या आठवणी आल्या की आजही त्या गुदगुल्या पोटात होत असल्याचा भास होतो.
        बैलगाडीवर बसून शेतात जाण्याचा आनंद तर वेगळाच होता. शेतातील खडकाळ रस्त्यावरून ज्यावेळी बैलगाडी जात असे तेव्हा आम्ही इकडून तिकडे उधळत जायचो. बैलाला वेगवेगळ्या नावाने हाका मारत सर्जा राजा असं म्हणत बैलगाडी चालवण्याचा प्रयत्न करायचं. आमचा आवडता छंद.
        शेतात पोहोचल्यावर शेतातील आंब्याच्या जांभळाच्या झाडावर चढणे व पोट भरेपर्यंत त्यांचा आस्वाद घेणे. याला आम्ही केवळ स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणू शकतो. आमच्या शेतात असलेल्या वडाच्या वडाच्या पारंब्या नवरा लटकून झोके घेत यायचो.
        आमच्या शेतामध्ये एक मोठी विहीर आहे. या विहिरीला सतत खूप पाणी असते. विहिरीत उतरून जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. विहिरीत उतरताना  मजा तर असतेच. त्याहूनही जास्त मजा ज्यावेळी आम्ही त्या पाण्यात सूर मारतो तेव्हा वाटते. ज्यावेळी सूर मारायचो त्यावेळी विहिरीच्या तळातून एखादा दगड घेऊन वर यायचं हा नियम होता. दगड वर काढल्या नंतर मनामध्ये जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. वा !! तो काळ फार छान होता.
       आंब्याच्या झाडाला कैर्‍या लागल्या की त्या तोडून  आणायच्या . स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी तयार करायच्या, त्यावर मीठ आणि थोडी चटणी टाकून मिटक्या मारत  खायच्या . ते आत्ता आठवले तरीदेखील तोंडाला पाणी सुटते.


    प्रिय वाचक मित्रांनो, तुम्हाला हा मी लिहिलेला माझे बालपण मराठी निबंध ,majhe balpan marathi nibandh, prasang lekhan कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्या मनात  बालपणाविषयी काही आठवणी असतील तर त्या देखील आम्हाला सांगा . तुमच्या भावना जाणून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद.

1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने