upkarmarathi.com

|Essay Writing about effects of COVID 19 on my life
|Please give me an essay on covid-19 experience

corona kalatil majha anubhav
corona kalatil majha anubhavकोरोना काळातील माझा अनुभव निबंध 
| corona kalatil majha anubhav


     |Tales of lockdown 400 words essay , कोरोना काळातील अनुभव सांगायचे झाले तर त्यांची फार मोठी यादीच तयार होईल. कोरोना काळ म्हणजे  एक-दोन अनुभव नव्हे तर अनुभवांचं पूर्ण पुस्तकच आहे. या काळामध्ये मला आलेले अनुभव या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे सांगताना बर्‍याचदा माझे हृदय आणि मन भावनाविवश होऊन शब्द स्तब्ध झाल्यासारखे वाटत आहे. तरी काही चुकले तर मोठ्या दिलाने माफ करा. कारण कोरोना काळामध्ये " माफ करायला शिका" हा सगळ्यात मोठा अनुभव मला आला.|Essay Writing about effects of COVID 19 on my life

    

        अनुभव क्रमांक एक

Essay Writing about effects of COVID 19 on my life

चिमुकल्यांची व्यथा (corona kalatil majha anubhav)
        
            कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळेे मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुट्ट्या भेटल्या. परंतु प्रथमच या सुट्ट्या सर्वांसाठी तुरंगवासापेक्षाही भयानक जाणवत होत्या. आमच्या घरामध्ये चिल्लीपिल्ली बरीच आहेत , त्यामुळे त्यांचा इतरवेळी सारखा गोंगाट असायचा. सुरुवातीच्या लॉक डाऊन च्या काळामध्ये काही दिवस त्यांना सुट्ट्या मिळाल्या म्हणून फार मजा वाटत होती. परंतु हळूहळू ही मजा  मावळू लागली. त्यातील आनंद दिसेनासा होऊ लागला. मुले आपोआपच वही आणि पुस्तके काढून त्यातील चित्रे बघून गप्पा मारू लागली. मोठी भावंडे लहानांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील गोष्टी समजावून सांगू लागले. आणि लहान भावंडे अगदी मनापासून शिकू लागले.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा असह्य आणि त्रासदायकच असतो याचा नकळत अंदाज त्यांना आला. मग ती गोष्ट प्रेम असली तरी देखील.. प्रेमाचा अतिरेक सुद्धा नकोसा वाटतो. त्या पद्धतीने सुट्ट्यांचा अतिरेक देखील त्यांना पचेनासा  झाला होता.
       मुलांना शाळेची आठवण येऊ लागली.शाळेतील आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली दंगामस्ती त्यांना डोळ्यासमोर दिसू लागली आणि आता शाळा कधी पुन्हा सुरू होणार याची मुले आतुरतेने वाट पाहू लागले . मी मुलांमधील हा बदल अगदी डोळसपणे न्याहळत होतो.  काही काळ मलाही माझ्या शाळेतील आठवणींची पुनरावृत्ती करावीशी वाटली.

अनुभव क्रमांक 2

|Tales of lockdown 400 words essay

         अगदी बालपणामध्ये बघितलेले रामायण आणि महाभारत कोरोना काळामध्ये पुन्हा नव्याने बघण्याची संधी मिळाली.
      हनुमानाच्या वेशातील  दारासिंग त्यांचा दमदार अभिनय... भक्तांना पुन्हा जुन्या काळात गेल्याचा अनुभव आला. आधुनिकतेच्या युगामध्ये फेसबूक , युट्युब यासाठी वेडावलेले तरुण आपल्याला सर्वत्र दिसतात, परंतु रामायण आणि महाभारत या सारख्या जुन्या टीव्ही मालिकांनी टीआरपी चे सर्व विक्रम मोडीत काढले. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हे रामायण आणि महाभारत फक्त मनोरंजनासाठी नव्हे तर आत्मिक आणि मानसिक शांततेसाठी सर्वजण बघत होते.
       पूर्वीच्या काळी ज्यावेळी रामायण आणि महाभारत या मालिक पहिल्यांदा प्रक्षेपित होत होत्या त्या काळी माझे आजोबा या जगामध्ये होते . या मालिका लागल्यावर अक्षरशा गावातील रस्ते ओस पडत असत .हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे. रामायण व महाभारत ही मालिका आमच्या घरात बघत असताना आजोबांची जागा आणि त्यांची खुर्ची ठरलेली असे. आता आजोबा जगात नाहीत परंतु रामायण आणि महाभारत मालिका ज्यावेळी कोरोना काळामध्ये पुन्हा प्रक्षेपित करण्यात आल्या त्या वेळी तीच खुर्ची आजोबांच्या त्याच जागेवर ठेवून आम्ही सर्वांनी ही मालिका बघितली . आजोबा देखील ती मालिका अदृश्य रुपाने बघत आहेत हाच भास आम्हाला होत राहिला.        कोरोना काळात अनेक अनुभव आलेले आहेत. ते सगळेच मी याठिकाणी हळूहळू जसा वेळ मिळेल तसे तुम्हाला सांगेन . त्यातील काही फारच दुःखदायक आहेत त्यामुळे त्या विचाराने माझे मन आता भरून आलेले आहे. कालांतराने जसा जसा मनाचा तोल सावरील तसतसा या ठिकाणी ते अनुभव मी नक्की लिहीन.

     कोरोना काळातील अनुभव लिहिण्याचे मुख्य कारण असे की , भविष्यातही जर कधी अशा प्रकारची महामारी आली तर आपल्या वागण्यातील आणि बोलण्यातील तोल अजिबात जाऊ देऊ नका. सामाजिक बांधिलकी जपत आणि आपले कर्तव्य कोणते ते ओळखून मोठ्या धैर्याने आणि संयमाने अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जा.(corona kalatil majha anubhav)

 खालील लेख नक्की वाचा      तुम्हाला देखील या कोरोना काळामध्ये काही चांगले वाईट अनुभव आले असतील तर ते  तुम्ही  आम्हाला नक्की सांगा.या काळामध्ये तुम्ही काय शिकलात ?याविषयी देखील इतरांना समजू द्या म्हणजे त्यांच्या जगण्याला आणि वागण्याला योग्य दिशा तरी मिळेल.
       तुमचे अनुभव या ब्लॉगवर प्रदर्शित करण्याची तुमची इच्छा असेल तर तसे देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. कॉन्टॅक्ट अस या टॅब वर जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
[email protected] या मेलवर देखील तुम्ही तुमचे मत आम्हाला पाठवू शकता.


2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने