1001marathiessay.blogspot.com

बायको नावाचा प्राणी



  

     बायको नावाचा प्राणी
 | bayko navacha prani ek majeshir lekh 

     आपल्याला माहित  असलेल्या प्राण्यांचे अनेक प्रकार आहेत जसे की शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, पाळीव प्राणी इत्यादी. परंतु बायको नावाचा प्राणी असा आहे की, या एकाच प्राण्यांमध्ये हे सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. माझं बायकोला प्राणी म्हणणं हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल , परंतु शेवटी मनुष्य हा देखील प्राणीच आहे ना! म्हणून हे धाडस करतो. हा प्राणी समजण्यासाठी थोडा नाही तर खूपच विचित्र आहे. कारण सर्वस्व मनापासून अर्पण करणारा हा प्राणी प्रसंगी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पानिपतची लढाई सुरू करतो. या लढाईत पती नावाचा प्राणी जिंकणे म्हणजे उंबराचे फूल बघण्यासारखेच आहे. यावर कळस  म्हणजे बायको नावाचा प्राणी या लढाईत जिंकला तरीदेखील मी का जिंकले हा प्रश्न घेऊन पुन्हा भांडणार!!!
       बायको नावाचा हा प्राणी वेड्यासारखा जीव लावतो. पण याच प्राण्यासमोर बाहेर शेर म्हणून मिळवणारा कधी ढेर होतो हे कळतही नाही. आपला केविलवाणा चेहरा बघून या प्राण्याला दया आल्याशिवाय राहत नाही. पण आपला केविलवाणा चेहरा या प्राण्यामुळे झालेला आहे त्याला कळत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आपला चेहरा केविलवाणा असो नाहीतर गुलाबासारख्या फुललेला असो हा प्राणी आपली साथ सोडत नाही. बाकी सगळे आपल्याशी गद्दारी करतील परंतु बायको नावाचा हा प्राणी कधीही गद्दारी करत नाही आणि आपल्यावर जीव ओवाळून टाकल्याशिवाय राहतही नाही.
      बायको नावाचा प्राणी आणण्यासाठी कधीही जात नाही. आणि हा प्राणी शांततेने घरातही येत नाही. याचे आगमन मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहाच्या भरात प्रत्येक घरामध्ये होते. या प्राण्यामुळे संसार सुखद प्रेमळ आणि आनंदमय होतो तसाच कधीकधी तो बाभळाच्या झाडासारखा काटेरी देखील वाटतो.
       बायको नावाचा हा प्राणी विविध रूपे घेण्यामध्ये फारच पटाईत असतो. कधी कामिनी ,कधी दुर्गा ,कधी भवानी तर कधी झाशीची राणी. या प्राण्याबरोबर राहणे म्हणजे एक सजा आहे असे वाटते परंतु या प्राण्या शिवाय पुरुष अपुरा आहे म्हणून त्याच्यासबत जगण्यातच खरी मजा आहे.
      ........ विजय साळवे.
           9421513078


      कृपया या लेखाचा कुणीही विनाकारण गैर अर्थ काढू नये. सर्व माता भगिनी हे वाचताना केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हणून बघावे ही नम्र विनंती.तसे पाहता स्त्रिया  पुरुषांपेक्षा कोणत्याही कार्यामध्ये सरस असतात . यावर माझा ठाम विश्वास आहे.......
       

       तरीही कुणाला या लेखामध्ये अजून काही वाक्य वाढावे असे वाटले किंवा काही बदल सुचवावा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा..

हे वाचायलाही अजिबात विसरू नका.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने