1001marathiessay.blogspot.com


Heart attack information in Marathi.
हार्ट अटॅक विषयी मराठीतून माहिती.
   भाग ::१





      हार्ट अटॅक याविषयी सर्वसामान्य लोकांना प्राथमिक माहिती मिळावी आजारी असणाऱ्यांना वन असणाऱ्यांनाही स्वतःच्या जीवनात बदल करण्याची प्रेरणा व आधार मिळावा या उद्देशाने हा लेखन प्रपंच करीत आहे.
या लेखामध्ये आपण हार्ट अटॅक का येतो कसा येतो त्याचे लक्षणे कोणती त्याच्यावर उपाय कोणते याविषयी सविस्तर माहिती आपण यामध्ये बघुया.
In this article we will look at the details of why and how heart attack occurs ?, what are the symptoms ?and what are the remedies for it  In Marathi language.

हार्ट अटॅक का व कसा येतो?
Why and how does a heart attack occur?

हार्ट अटॅक हा शब्द ऐकल्याबरोबर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. आपल्यापैकी अनेक जणांचे जिवलग व्यक्ती या आजाराने आपल्यापासून दूर नेलेले आहेत. खरेतर या आजारापासून वाचण्यासाठी व आपल्या प्रियजनांना  वाचवण्यासाठी या आजाराविषयी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
    आपले शरीरातील हृदय हे असे इंद्रिय आहे की जे मनुष्य गर्भात असल्यापासूनच काम करायला सुरुवात करते .व अखेरचा श्वास घेईपर्यंत ते एका क्षणाचीही विश्रांती न घेता सतत काम करत राहते. प्रौढ व्यक्तींमध्ये एका मिनिटाला सत्तर ते ऐंशी (सुमारे 72)वेळा हृदयाचे ठोके पडतात.
     आपल्या शरीरात सुमारे पाच ते सहा लिटर रक्त असते. ते प्रत्येक मिनिटाला पूर्ण शरीरात पंप केले जाते . अशाप्रकारे आपले हृदय दिवसभरात जवळपास सात हजार ते आठ हजार लिटर रक्त पंप करते.
   स्वास्थ्यपूर्ण व्यक्तीचे हृदय एका मिनिटाला सुमारे बहात्तर वेळा धडधडते ,परंतु कष्टाचे काम असेल व्यायाम असेल त्यावेळेस जास्तचा रक्त पुरवठा गरजेचा असतो . त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढवून ते 150 ते 180 पर्यंत जाऊ शकतात.
   हृदयाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी आपण गाडीच्या इंजिनचे उदाहरण घेऊया.
समजा गाडी चालवण्यासाठी पेट्रोलच्या पुरवण्याची गरज असते आणि गाडी जितक्या वेगाने जाणार तितकेच जास्त पेट्रोल लागेल, आणि अशावेळी पेट्रोलचा पुरवठा ी करणाऱ्या  नळी मध्ये जर कचरा अडकला... तर गाडी झटके मारेल किंवा बंद पडेल .अगदी त्याच पद्धतीने काम करत असताना शरीराच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा ची गरज असते आणि ते काम हृदय करत असते .
    हृदयाकडून अवयवांकडे रक्त घेऊन जाणाऱ्या नलिकांमध्ये ज्यावेळी अडथळे निर्माण होतात . त्यावेळी हृदयाची गती कमी होते किंवा बंद पडते . यालाच आपण हार्ट अटॅक आला असे म्हणतो.

रक्तवाहिन्या लहान होऊन हृदयविकार होण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. Main reasons of heart attack

१) कोलेस्टेरॉल व इतर पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये साचून अडथळे निर्माण होतात.

२) विशिष्ट भावनिक अवेगाच्या प्रसंगी रक्तवाहिन्यांचे स्नायू आकुंचन पावल्याने अडथळे निर्माण होतात.

३) रक्त घट्ट झाल्यामुळे रक्ताचा प्रवाहीपणा कमी होतो आणि गाठी तयार होतात . त्यामुळे अडथळे निर्माण होतात.

     घरांमध्ये पाईपलाईन केलेली असते. काही वर्षांनी पाईप लाईन मध्ये क्षारांचे थर साचून आतून पाइपाचा आकार कमी होतो .त्यामुळे पापातून पाणी जाण्यासाठी मोटरला जास्त जोर लावावा लागतो. अगदी त्याप्रमाणेच रक्तवाहिनी आहे वर सांगितलेल्या अडथळ्यांमुळे आतून त्यांचा आकार कमी होतो. त्यामुळे त्यातून रक्त ढकलण्यासाठी हृदयाला जास्त ताकद लावावी लागते व हृदयावर जास्त दाब पडतो.
  जसे पाण्यामध्ये क्षार असतात तसा रक्तामध्ये कोलेस्टेरॉल नावाचा पदार्थ असतो. कोलेस्टेरॉल हा एक स्निग्ध पदार्थ आहे .तो आपल्या शरीरात तयार होत असतो तसेच आपल्या आहारातूनही आपल्याला मिळतो. तसे बघितले तर हा शरीराला उपयोगी व आवश्यक पदार्थ आहे ,पण त्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढले तर कोलेस्टेरॉल आणि दुसरे काही घटक रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला जमा व्हायला सुरुवात होते. हळूहळू रक्तवाहिन्यांचे छिद्र लहान होते आणि परिणामी ब्लडप्रेशर वाढतो .रक्तवाहिन्यांवरील दाब जास्त वाढतो आणि त्यांची लवचिकता आणखीनच कमी होते..



    हृदय रोगाची सुरुवात......
Beginning of heart attack disease.


       रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यानंतर सामान्य परिस्थितीमध्ये रक्ताची गरज भागवली जाते ,पण कष्टाची कामे करताना किंवा इतर कोणतीही कामे करताना हृदयाची रक्ताची गरज वाढलेली असते. त्यावेळी पुरेसे रक्त न मिळाल्याने हृदय कासावीस होते. म्हणजेच हार्ट अटॅक येतो.
       सुरुवातीला जीना चढताना किंवा धावपळीचे काम करताना,  
  छातीत अर्धा- एक मिनिट दुखायला लागते.
 दम लागतो .
  थोडी विश्रांती घेतली किंवा sorbitrate( सोर्बीट्रेट) नावाची गोळी जिभेखाली ठेवली की दुखणे बंद होते.
  याला अंजायना  पेक्टरीस असे म्हणतात ही झाली हृदय रोगाची सुरुवात.


   यामध्ये छाती दुखणे जीव घाबरणे छातीत धडधड होणे घाम येणे उलटी व संडास होणे यासारखे लक्षणे असू शकतात मात्र काहीवेळा कुठलीच लक्षणे सुद्धा नसतात व ईसीजी तपासणी केल्यानंतरच हार्टअटॅक आल्याचे लक्षात येऊ शकते.


   हार्ट अटॅक साठी कोणते उपचार करावे लागतात?

What treatment is needed for a heart attack?

१) प्रथमोपचार
  • हार्ट अटॅक आल्यावर घाबरून न जाता रुग्णाला बसवावे किंवा झोपवावे.
  • कपडे सैल करावेत त्याला धीर द्या.
  • बेशुद्ध अवस्थेत काहीही खायला प्यायला देऊ नये.
  • ताबडतोब डॉक्टरकडे न्यावे मात्र हृदयविकाराचे निदान नक्की होईपर्यंत एक पाऊलही चालू देऊ नये हे महत्वाचे
  •  अशा अवस्थेत केलेली थोडीदेखील हालचाल हृदयावरील ताण वाढवते व हृदयाचे कायमचे नुकसान होऊ शकते.
2) औषध
    
      आवळल्या जाणाऱ्या रक्तवाहिन्या मोकळ्या करणाऱ्या sorbitrate. , 
रक्त पातळ ठेवणाऱ्या ऍस्पिरिन 
आणि हृदयाची कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांचा औषधांचा वापर करून ब्लड प्रेशर व डायबिटीज चे योग्य नियंत्रण करावे.
    हार्ट अटॅक आल्यानंतर लवकरात लवकर शक्यतो दोन तासांच्या आत तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने streptokinase 
इंजेक्शन दिलेस रक्तवाहिनी मधील गाठ विरघळून रक्तप्रवाह परत सुरळीत होण्याची बरीच शक्यता असते . यामुळे हृदयाचे कायमची होणारे नुकसान कमीत कमी होऊ शकते.

३)  ॲन्जिओप्लास्टी

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे एन्जोप्लास्टी द्वारा दूर करता येतात यामध्ये प्रत्यक्ष चिरफाड करत नाहीत पायाच्या एका रक्तवाहिन्यांमधून रंगासारखे निळे टाकतात हृदयाच्या रक्तवाहिनी मधील अडथळा पर्यंत पोहोचवतात तिच्या टोकाला एक फुग्यासारखा भाग जोडलेला असतो अडथळ्याच्या जागे पोहोचल्यानंतर तो फुगा फुगवतात त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे मोकळे होतात.
एन्जोप्लास्टी करण्यासाठी सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो. कधीकधी त्या जागेवरती कृत्रिम पाईप ही बसवले जातात यांनाच स्टेंट म्हणतात.




4) बायपास सर्जरी bypass surgery

एखाद्या ठिकाणी रस्त्यावर पुलाचे काम चालू असलेले की काम चालू असताना वाहतूक करण्यासाठी बाजूने एक छोटासा वळण रस्ता काढून देतात आणि त्या रस्त्यावरून वाहतूक चालू राहते. अगदी त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा एन्जोप्लास्टी करणे शक्य नसते त्यावेळी ऑपरेशन करून रक्तपुरवठा सुरळीत करावा लागतो.
     बायपास सर्जरी साठी काही वेळा हातातील तर काही वेळा छातीचे रक्तवाहिनी वापरतात. रक्तवाहिनीचा एक तुकडा कापतात आणि ज्या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे त्या ठिकाणांच्या रक्तवाहिनीच्या अडथळ्याच्या दोन्ही बाजूंना हा तुकडा जोडला जातो त्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो खालील चित्र बघून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल.
 खालील चित्र काळजीपूर्वक बघा.

महत्वाचे::
     हार्ट अटॅक साठी बायपास सर्जरी किंवा एन्जोप्लास्टी केले म्हणजे हार्ट अटॅकचा धोका कायमचा मिटला असे अजिबात नाही .खरेतर ऑपरेशन नंतर सुद्धा रक्तातील कोलेस्ट्रॉल तर तसेच राहणार ना ! आणि ते जमा होणे देखील सुरूच राहणार. तसेच भावनिक उद्रेकामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि प्रसरण रक्ताचा प्रवाहीपणा कमी होणे ही देखील पुढे चालू राहिल्यास अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी च्या ठिकाणी दुसरे नवीन अडथळे निर्माण होणारच.
    साधारणपणे 35% एन्जोप्लास्टी या पहिल्या सहा महिन्यातच बंद होतात उरलेल्या तीन ते पाच वर्षापर्यंत चालतात आणि बायपास साधारणपणे पाच ते आठ वर्षे चालते म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक आहे अँजिओप्लास्टी किंवा बायपास हे कायमचे उत्तर अजिबात नाही. 25 टक्के रुग्णांमध्ये तर उपचार करण्याची संधीही मिळत नाही त्याआधीच ते दगावतात. 


      मग आता हृदयविकार टाळण्यासाठी आपल्या मध्ये नेमका बदल कसा करावा आपल्या हातात कोणकोणत्या गोष्टी आहेत व कोण कोणत्या गोष्टी नाही. आपल्या रूटीन मध्ये कोणता बदल केल्यास आपण हार्ट अटॅक टाळू शकतो इत्यादी विषयी माहिती पुढच्या भाग दोन मध्ये घेऊया.

 लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व अजून काही माहिती हवी असेल तर तसेही कमेंट मध्ये सांगा.

        

.





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने