रम्य पहाट मराठी निबंध |  Essay on pahat  in Marathi
रम्य पहाट मराठी निबंध | Essay on pahat in Marathi 


         सकाळचे प्रसन्न वातावरण मनाला आनंद देऊन जाते असाच एक प्रसंग माझ्याही जीवनात घडला.  प्रसन्न वातावरण  माझ्या मनाला मोहून गेले. चला तर मग बघुया छान निबंध रम्य पहाट निबंध क्रमांक एक

       |  रम्य पहाट 
| मी पाहिलेली पहाट
 Essay on Pahat  in Marathi 

      
  जो सकाळी लवकर उठतो त्याला आरोग्य संपदा मोठ्या प्रमाणात मिळते असं नेहमीच आपल्याला सांगितलं जातं आणि ते खरंही आहे . आत्ताच्या आणि पूर्वीच्या काळातीलही अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती जर आपण बघितल्या तर त्यांच्या यशामागे असणाऱ्या अनेक सवयींमध्ये पहाटे उठणे ही सवय बहुतांशी लोकांमध्ये असल्याचे दिसून येते.

         पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न असते .रोमारोमात चैतन्य फुलवणारी.   मनाला  मोहवणारी अल्हाददायक पहाट दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करते. विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट अधिक चैतन्यमय प्रसन्न असते कारण या पहाटे मध्ये ग्रीष्मातील अंग जाळणारी दाहकता नसते, तसेच वर्षा ऋतु मधील पावसाची संततधारही नसते.

         पावसाळा नुकताच संपलेला असतो. या वेळी आकाश निरभ्र होते. पहाट होताच सगळीकडे पसरलेला काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो आणि त्या पडद्यामागे घडलेल्या अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागतात . त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. त्याच वेळी आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड ही चालू असते . लहान मुलांसारखे एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो.

     स्वच्छ निळे आकाश असते आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगांची दाटी हे बघून म्हणाला अगदी आल्हाददायक वाटते . एखाद्या कुशल चित्रकाराने सहजपणाने आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटावे तसेच सर्वात महान चित्रकार असलेल्या निसर्गाने रेखाटलेले हे चित्र आणि त्यातील रंगसंगती अप्रतिमच असते. साधेपणातील सौंदर्य आपल्या निदर्शनात येते. अशावेळी माझ्या मनात हिंदीतील एक वाक्य सहज आणि सतत येते ते म्हणजे," सादगी मे ही सुंदरता हैं! "

          वाऱ्याची मंद शीतल झुळूक अलगद आपल्याला स्पर्श करू लागते. तो स्पर्श म्हणाला मोहून टाकतो. त्या लहरीने मन सुखावून जाते. पहाटेच्या या प्रसन्न शांत वेळेतच आपल्या पूर्वजांना वेद स्फुरले.
        
       हिवाळ्यातील सकाळ मात्र फारच गंमत करून जाते. हिवाळ्यात केलेला व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने अधिक पोषक असतो. त्यामुळे हिवाळ्यात पहाटे फिरायला आणि व्यायाम करायला जाणाऱ्यांची चांगलीच दांडी उडते. सकाळच्या बोचऱ्या थंडीत बिछान्यातून बाहेर येण्याचे धाडसच होत नाही . आईने पांघरून दिलेल्या  किंवा आजीच्या जुन्या साडी पासून बनवलेल्या गोधडी मधली ऊब जगावेगळीच असते. त्यावेळी एका क्षणाला मन म्हणते चला आज व्यायामाला जाऊया, पण अंगावरचे पांघरून काढताच थंडीमुळे पुन्हा अंथरुणात शिरून कधी झोप लागते ते कळतच नाही.
   
       मी पाहिलेल्या सुंदर पहाटेचे वर्णन तुम्हाला कसे वाटले ते  कमेंट करून नक्की सांगा...

*************************************
|  Essay on pahat  in Marathi -रम्य पहाट मराठी निबंध 
      निबंध क्रमांक 2

 माझा प्रत्यक्ष अनुभव नक्की वाचा
|मी अनुभवलेली एक रम्य पहाट निबंध


| ती  एक रम्य पहाट


       मला सकाळी खूप लवकर उठण्याची तशी अजिबात सवय नाही. अर्थात सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पण माझ्या आयुष्यात घडलेला हा एक प्रसंग ज्यामुळे मला सकाळी लवकर उठण्याचे महत्व कळले व आता मी नेहमीच लवकर उठण्याचा प्रयत्न करतो.

          डिसेंबर महिन्यात ला सुरुवात झाली होती थंडीचा जोर बर्‍यापैकी वाढलेला होता. थंडीचा अनुभव घेत घेत नाताळ सण कधी आला हे कळलेच नाही नाताळ सणा निमित्त शाळेला तीन दिवस सुट्ट्या होत्या. मामाच्या गावी जाण्याचे ठरवले.

         ठरलेल्या दिवशी सगळी तयारी करून आम्ही मामाच्या गावी निघालो.गावी पोहोचण्यासाठी आम्हाला रात्र झाली प्रवास आणि आम्ही खूप थकून गेलो होतो.रात्री झोपताना मामाने मला एक प्रश्न विचारला सकाळी लवकर शेतात येणार का? मी घाईघाईत मामाला हो म्हटले आणि माझे डोळे कधी लागले हेच मला कळले नाही.
           सकाळी साखरझोपेत असताना अचानक मामाने माझ्या अंगावरील पांघरुन काढले . तसे माझ्या गोधडी मध्ये गार गार हवा शिरली आणि मला चांगलीच थंडी वाजून आली. मामा म्हणाला अरे ,"विजय चल शेतात येतो ना? सकाळ झाली."मामाच्या हातातून गोधडी ओढून घेईल पूर्ण अंग झाकुन घेतले मामाला म्हटलं मी येत नाही मला थंडी वाजते.

       मामाने मात्र मला नेण्याचा निर्णय केलेला होता .माझ्या अंगावरील गोधडी ओढून घेतली आणि मामाने मला उचलून अंगणात नेले. चुलीवर ठेवलेल्या गरम पाण्याने हात पाय धुतले. घाई घाई मध्ये ब्रश केला आणि मामा मला घेऊन निघाला.

         पूर्वेकडे बघितले तर काहीसे तांबडे फुटले होते. आपल्या अनंत प्रकाश मे बाहूंनी संपूर्ण विश्वाला कवेत घेण्यासाठी सूर्यनारायण आसुसला होता. दूर डोंगराच्या आडून जणू तो डोकावून बघत होता. थंडीने गारठलेल्या संपूर्ण जगाला तो आपल्या उदार हातांनी कवेत घेण्याचे जणू मनात आडाखे आखत होता.

         जसजसे शेताच्या दिशेने जाऊ लागलो तस तसे निसर्गाचे सुंदर रूप मला दिसू लागले.पिंजलेला कापूस उघड्यावर ठेवावा आणि वाऱ्यानं तो उधळून हवेत सगळीकडे पसरावा. अगदी कशा पद्धतीने सगळीकडे धुके पसरलेले होते. आमच्या तोंडातून धूर निघत होता मला फार मजा वाटत होती. माझे सगळे लक्ष तोंडातून निघणार्‍या या धुरा कडेच होते त्यामुळे काही क्षण का होईना मला  थंडीचा विसर पडला.

          सूर्य आता डोंगराच्या आडून पूर्ण वर आलेला होता. मामा शी गप्पा मारत मारत होणे धरणाजवळच असलेल्या आमच्या शेताजवळ येऊन पोहोचलो. पूर्वेकडे मान वळवली तर बघतो काय धरणाच्या संपूर्ण पाण्यावर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सूर्याचे बिंब लखलख करत होते. तो उजेड बघून काही क्षणापुरता माझे डोळे गोंधळून गेले होते. मला वाटले सूर्य म्हणजे देवाने दिलेला किती मोठा लाईट आहे माणसाने बनवलेले कितीही लाईट लावले तरी देखील या सूर्या इतका प्रकाश निर्माण होणार नाही.


          हा दिवस जणू माझ्या आयुष्याला सुंदर देखावे दाखवण्यासाठी निर्माण झालेला आहे. असे मला वाटू लागले. शेता कडे नजर जाताच माझ्या लक्षात आले मामाने लावलेल्या वाटाण्याच्या शेंगा आता तम फुगून वेलीवर डुलत होत्या. प्रत्येक शेंगेवरती आणि पानावरती पाण्याचा बारीक थर जमा झालेला होता.
        हे सगळे बघत असताना मामाने विहिरीवरील पाण्याची मोटर सुरू केलेली होती .त्यामुळे खळखळ आवाज करत विहिरीतले पाणी शेतातल्या  चाऱ्यांमधून  पिकांच्या मुळापाशी पोहोचत होते. वाहणारे पाणीही अचानक सूर्यप्रकाशामुळे चमचमत होते.

       पाण्यापासून बचाव होण्यासाठी शेताच्या बाजूलाच असलेल्या उंच ठिकाणी मोठ्या खडकावर जाऊन उभा राहिलो. त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर जणु मी एका नवीन जगातच डोकावून पहात होतो. धरणाच्या सांडव्याच्या उंचीपर्यंत संपूर्ण धरणाचे पाणी अखंड दिसत होते.अचानक छोटे-छोटे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर उड्या मारून पुन्हा पाण्यात सामावत होते.

|पहाटेचे सौंदर्य वर्णनात्मक निबंध इन मराठी 

        एकीकडे शेतातील मनाला शांत करणारी हिरवळ दिसत होती. तर दुसरीकडे संपूर्ण गावाची तहान भागवून शरीर शांत करणारे पाणी दिसत होते. या सर्वांमध्ये मात्र एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे परोपकार.

    खरंच निसर्ग माणसावर अनंत उपकार करतो परंतु मनुष्य कृतघ्नपणाने वागून निसर्गाची हानी करतो. या संपूर्ण विचाराने माझा दिवस आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या दिवसापासून मी नेहमीच सकाळी लवकर उठतो. तो दिवस मी कधीही विसरणार नाही.

                                     -.     विजय


     मित्रांनो थंडीत भेटलेल्या एका सुंदर सकाळचा अनुभव तुम्हाला सांगितला. ह्यालाच तुम्ही थंडीतील पहाटेचे वर्णन ही म्हणू शकता.
      मित्रांनो तुम्हाला मी घेतलेला पहाटेचा अनुभव कसा वाटला हे मला नक्की कळवा.
        ...................



या निबंधांचे खालील प्रकारे ही नाव असू शकतात


  1. |मी अनुभवलेली पहाट निबंध|mi anubhavaleli pahat
  2. |मी अनुभवलेली एक रम्य पहाट.
  3. |मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध
  4. |मी पाहिलेली रम्य पहाट मराठी निबंध
  5. |Mi pahileli ek pahat Marathi nibandh.
  6. |वर्णनात्मक निबंध मराठी 
  7. |पहाटेचे सौंदर्य वर्णनात्मक निबंध इन मराठी 
  8. |पहाट निबंध


  1. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  3. परीक्षा .. छान मराठी लेख.
  4. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
  5.  पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  6. झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
  7.  एका शेतकऱ्याचे मनोगत
  8. आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
  9. माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
  10.  माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
  11.  वृक्षदिंडी
  12.  माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
  13.   माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
  14.  घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
  15. नवनवीन मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

8 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. खूपच सुंदर भाषेत अनुवाद केला आहे आपण पहाटे चा... सर अतिशय सुंदर वाटला निबंध

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने