1001marathiessay.blogspot.com



           नमस्कार मित्रांनो निसर्गाची स्वतंत्र अशी एक भाषा असते. फक्त ती आपल्याला समजणे गरजेचे आहे . एकदा जर ती भाषा समजू लागली तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून आणि निसर्गातून मिळू लागतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना , परिस्थिती यातून निसर्ग आपल्याला सूचना देत असतो. आता ते आपल्यावर आहे की आपल्याला त्या सूचना किती समजतात किंवा आपण त्या किती समजून घेतो..असो


    असंच एकदा आमच्या शेतात गेलेलो असताना शेतही माझ्याशी भरभरून बोलू लागले आणि त्यानी आपले मनोगत व्यक्त केले. ते माझ्याशी कसे बोलले ते आता आपण या छानशा निबंधामध्ये बघूया.

        या निबंधाचे 
   |शेताचे मनोगत मराठी निबंध 
|शेत बोलू लागले तर
| मी आणि शेत 
अशी विविध प्रकारची नावे या निबंधांची असू शकतात.
.....................................,.....................................


मी शेत बोलत आहे मराठी निबंध 
mi shet bolat aahe marathi nibandh 

      वडील नोकरीला असल्यामुळे आम्ही सतत नोकरीच्या गावी जात असत. म्हणजे बघा ना आमच्या मूळ गावापासून चाळीस-पन्नास किलोमीटरच्या आतच वडिलांची बदली सतत होत असे ,त्यामुळे आम्ही राहण्यासाठी ज्या गावी बदली त्या गावी जात असत.
    सततच्या होणाऱ्या बदलीमुळे गावाकडच्या शेतीकडे आमचे दुर्लक्ष झाले होते. मला आठवते वडील नोकरीला लागण्याच्या अगोदर शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पिके घेतली जात होती. विविध धान्याचे पोते  भरून घरांमध्ये ठेवलेले असायचे. मी कधी कधी पोत्यांमधून भुईमुगाच्या शेंगा काढून त्यावर चांगला ताव मारत असे परंतु आता मात्र त्या नुसत्या आठवणीत उरलेल्या होत्या. शेतीकडे पुरेपूर दुर्लक्ष झालेले होते .
      दिवाळीच्या सुट्टी मध्ये गावी शेतात जाण्याचा योग आला. तुझ्या शेतामध्ये हिरवगार पीक डोलताना बघितले होते त्याच शेतात आता काटेरी बाभळाची झाडे मोठ्या दिमाखात उभी असलेली दिसत होती.शेताचे सीमा निश्चित करणारा पश्चिमेकडील बांध दुरून दिसत होता गाडी उभी करून जसा त्या बांधावर उभा राहिलो तसंच आवाज आला ,"आलास  ! ये . बरी आठवण काढली."मी गोंधळून इकडे तिकडे बघू लागलो तितक्यात पुन्हा आवाज आला घाबरू नकोस ज्या या मातीत तो लहानपणी भरपूर खेळलास मौज केलीस हे तुझं शेतच मी तुझ्याशी बोलतो आहे मला विश्वासच बसेना.
   शेती माझ्याशी मोठ्या आपुलकीने बोलू लागली . "तुझ्याकडे बघून तू आनंदात आहे हे दिसते आहेच , परंतु तुम्ही इथून निघून गेल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही. मलाही तुमची खुप आठवण येते .आज तुला इथे बघून मला खूप आनंद झाला आहे .माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या . तुला लहानाचा मोठा होताना मी ईथे बघितलेले आहे .माझ्या क्षेत्रात उगवलेल्या विविध फळझाडे आणि फुलझाडांचा सुगंध आणि चव चाखताना मी तुला इथे बघितलेले आहे . तुम्ही निघून गेल्यानंतर मात्र त्या फुलझाडांनी आणि फळझाडांनीही  माझी संगत सोडून दिली. आणि हे काटेरी बाळाची झाडे कमरेवर हात ठेवून  या ठिकाणी उभे आहेत.

     तुझ्या जन्माच्या आधीपासून तुमच्या कुटुंबाची प्रगती मी बघितलेली आहे. एकेकाळी माझ्या या क्षेत्रामध्ये वैभव संपन्न आयुष्य तुमच्या पूर्वजांनी उपभोगलेले आहे.त्यांनी माझी काळजी ही अत्यंत मनापासून घेतली आणि मीही त्यांना भरभरून यातून धनधान्याचे दान दिले आहे. हल्लीच्या काळात तुम्ही सर्व मंडळी नोकरी आणि व्यवसाय धंदा यांच्यामागे लागलेले आहात, परंतु एक दिवस तुम्हाला शेतीशिवाय पर्याय नसणार. उगवले नाही तर तुम्ही काय खाणार ?पैसे?
      तुझे वडील आजी-आजोबा सर्व मंडळी माझ्या क्षेत्रामध्ये अगदी मनापासून काम करत असत . माझे निगा राखत असत . त्यांच्या काळात माझाही अगदी आनंदाचा काळ होता ,असेच मला म्हणावे लागेल . कारण त्यांनी मला फक्त शेती किंवा शेतजमीन म्हणून माझी काळजी घेतली नाही तर अगदी स्वतः च्या आईसारखी माझी काळजी घेतली . पिकांना वेळेवर खत देणे ,वेळेवर निंदणी कापनीची कामे करणे .पाण्याची व्यवस्था करणे. ही सर्व कामे त्यांनी अगदी वेळेत पूर्ण केलेत .या सर्वांमुळे माझाही पोत सुधारून माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुपीकता निर्माण झाली. मी आनंदाने त्यांच्या पदरात भरभरून पिकाचं दान दिलं.
   अलीकडच्या काळात मात्र तुमचं दुर्लक्ष माझ्याकडे झालेले असले तरीदेखील मला तुमची आठवण येतच असते .  आज माझं मन मी तुझ्याकडे मोकळं केलं मला फार बरे वाटत आहे. आता इथून पुढं तरी  माझी काळजी घे . म्हणजे मी तुझ्या पदरात देखील धनधान्याने आणि श्रीमंतीने भरलेले दिवस टाकेल.
   आता तू मोठा झाला आहेस माझ्या भावना तुला कळतीलच ह्या अपेक्षेने मी माझे मन व्यक्त केले बाकी तुझे निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. काळजी घे.
    असे बोलून आता शेती गप्प बसली. मी मात्र मनात उठणाऱ्या भावनांच्या अनेक आंदोलनांसह घरचा रस्ता गाठला ,आणि वडिलांशी शेतीच्या मशागती विषयी चर्चा करू लागलो. खरोखर शेती ने माझे डोळे उघडून दिले होते . कितीही प्रगती केली तरीदेखील आपण आपल्या माणसांना विसरायचे नसते. आपली मूळची परिस्थिती विसरून कधीही स्वतःची प्रगती साधता येऊ शकत नाही. असा छान संदेश मला शेतीने दिला मी तिच्या ऋणात राहणे नेहमी पसंत करेन.

       

      निबंध लेखन एक अशी कला आहे की ज्यामुळे आपण आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोचवू शकतो पण सर्वांना ही कला अवगत असेलच असे नाही मला कोणतीही असो ते प्रयत्नाने वृद्धिंगत करता येते असेच निबंध लेखनाचे कला देखील तुम्ही वृद्धिंगत करा तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे . याठिकाणी मी एक नमुना निबंध तुमच्यासाठी लिहून दिलेला आहे तुम्ही देखील निबंध वाचन झाल्यानंतर तुमच्या मनाने इतर किंवा असाच निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा माझ्याकडून काही मदत लागली तर तसे कमेंट करुन सांगा . मी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन किंवा या निबंधा विषयी तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा असेल तर अवश्य द्या सुधारणा सुचवायच्या असतील त्याही सुचवा म्हणजे मला पुढील निबंधांमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. खूप खूप धन्यवाद.




  1. माझी अभयारण्यास भेट. 
  2. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  3. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  4.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  5. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  6. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  7. माझे गाव       
  8.    स्वामी विवेकानंद 
  9.   झाडे लावा झाडे जगवा
  10. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  11. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  12. मी पाहिलेला अपघात
  13. माझी शाळा .
  14. महात्मा ज्योतिबा फुले
  15. माझा भाऊ
  16. आमचे वनभोजन
  17. माझे वडील मराठी निबंध
  18. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  19. मी पाहिलेला अपघात
  20.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  21. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  22. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  23. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  24. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  25. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  26. सुंदर मराठी सुविचार
  27. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  28. स्वामी दयानंद सरस्वती
  29. राजा राममोहन रॉय
  30. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  31. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  32. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  33. परीक्षा .. छान मराठी लेख.
  34. उपकार ...छान कथा वाचा.








Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने