www.upkarmarathi.com

सामान्य ज्ञान मराठी  |Marathi gk |gk in Marathi
सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 



सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

        प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते.निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी-जास्त असतो.सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात.त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 


     स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात.धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत. कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते.म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ या अवस्था असतात. आपण ज्यावेळी डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात, तीच अवस्था आपल्याला पहायला मिळतात.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 


       कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते.फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात.बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेरपडते. तिला सुरवंट म्हणतात.वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो..कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्या वेळी त्याला सहा लांब पाय असतात.आकर्षक पंख असतात.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 


         गाई-म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. ग्रामीण भागातअनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात. गोवऱ्यांच्या ज्वलानाने धूर होतो.पाळीव प्राण्यांची विष्ठादेखील माणसाच्या उपयोगी पडते.गाई म्हशींच्या शेणापासून गोबरगॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही. तोही इंधन म्हणून वापरतात.मातीची घरे लिंपण्यासाठी शेणाचा वापर होतो.गाई-म्हशींच्या शेणापासून शेणखत, तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडीखत मिळते.शेतकरी ते शेतीसाठी वापरतात.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

         गवताळ जागेत म्हैस चरत असते. त्या वेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो. त्याचे कारण काय असेल ?निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एका प्रकारच्या बगळ्याचेअन्न असते. गवतामध्ये खूप कीटक राहतात. गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत. त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही.त्याच गवतात म्हैस चरायला येते. चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते. तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात. तेवढ्यात म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शिताफीने पकडतो आणि मटकावून टाकतो.छान आहे ना युक्ती ?

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

           आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा निरनिराळ्या असतात.माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्याविष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटीबांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो.प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात, तिथेच ते सजीव आढळतात. वाघाच्यागरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात, म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पाणवनस्पती नाही, ती पाणथळ जागी तग धरत नाही.ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवांवर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळताततर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांनापालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसू लागतात.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

       समुद्राचे पाणी चवीला खारट लागते. कारण ते मिठाचे नैसर्गिक द्रावणच आहे. आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वेगवेगळ्या विहिरींच्या पाण्याला वेगवेगळ्या चवी असतात. ते कशामुळे ? जमिनीतीलकाही पदार्थ पाण्यात विरघळतात. त्यांची चव विहिरीच्या पाण्याला येते. पण पाण्यात काहीही विरघळलेले नसेल, तर पाण्याला चव लागत नाही.सोडावॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात.सोडावॉटर बनवताना कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो. झाकण काढताच दाब कमी होतो आणि तो वायू फसफसून बाहेर पडतो.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

    कणभर दही किंवा थेंबभर ताक घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवले. ती पट्टी सूक्ष्मदर्शीतून पाहिली तर आपल्याला त्यात सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात.हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात. ते आपल्याला उपयोगी असतात.पण सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात गेले, तरआपल्याला आजार होऊ शकतात. अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव म्हणतात.


सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 


              काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ विरघळत नाहीत.काही वस्तू पाण्यात तरंगतात, तर काही वस्तू बुडतात आणि पाण्याच्या तळाशी जमा होतात. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवतात. तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात किंवा पाणी गाळून घेतात.गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातही सूक्ष्मजीव असू शकतात. पिण्यासाठी पाणी निर्धोक करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी पाणी उकळून त्यातील सूक्ष्मजीवांचा पुरेसा  नाश करणे आवश्यक असते.

सामान्य ज्ञान मराठी
 |Marathi gk |gk in Marathi 

पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितका जवळ असणे गरजेचे असते.त्यामुळे प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्यातरी मोठ्या नदीच्या तीरावर. आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत. उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. गंगानदीवरील पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील नाशिक ही अशा प्राचीन नगरांची उदाहरणे आहेत.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने