www.upkarmarathi.com

|world meteorological day | jagtik havaman din mahiti
  जागतिक हवामान दिन


 
        jagtik havaman din ,संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी तसेच  लहान मुलांपासून वयोवृद्धा पर्यंत सर्वांनाच हवामानाचे महत्त्व समजावे ,हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे? कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? याविषयी जाणीव करून त्या निर्माण व्हावी या उद्देशाने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो . 

            माणसाने विज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात प्रगती केली, परंतु हे करीत निसर्गाच्या अधोगतीला चालना मिळत गेली . त्यातूनच पर्यावरणाचा समतोल ढासळत  गेला.  सुरुवातीला याचे प्रमाण कमी होते परंतु आता मोठ्या प्रमाणात रासायनिक खते , आधुनिक यंत्र ,विनाशकारी युद्ध साहित्य  अशा अनेक साहित्याचा वापरामुळे हवामानाच्या हानीचा उच्चांक गाठला   गेला आहे .त्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील पर्यावरणाच्या चक्राचा समतोल बिघडलेला दिसून येतो.

           हवामान शास्त्र बरोबरच त्यात होणाऱ्या बदलाविषयी लोकांना जागृत करणेहा त्याम्गाचा उद्देश आहे . दरवर्षी त्यासाठी  एक थीम सेट केली जाते .वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक- नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशात जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली .

         निसर्गावर मात करण्याच्या हव्यासापाई मानवाने निसर्गाच्या घरावर आक्रमण केल्याने माणूस आणि निसर्ग यांच्यातील समतोल बिघडत गेला आहे. बदललेल्या हवामानाचे  जागतिक स्तरावरील अनेक विपरीत परिणाम दिसून येऊ लागले. पृथ्वीच्या सरासरी तापमानात   मोठी वाढ झाली .अनेक प्रकारचे अवर्षण ,हिमनग वितळणे, दुष्काळ अशी अनेक संकटे मानवासमोर आज उभी ठाकली आहेत .मानवाचा निसर्ग चक्रावर अशाच प्रकारे आघात होत राहिला तर हवामानातील बदलांच्या परिणामाची  व्याप्ती ही वाढत जाणार आहे .

   आज जागतिक हवामान दिनानिमित्ताने प्रत्येकाने पर्यावरणाला शुद्ध स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करूया या कार्यातूनच पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्याबाहेर ठेवून मानवी जीवन आरोग्यदायी व आनंददायी होईल माझ्या एकट्याच्या करण्याने किती प्रमाणात  फायदा होईल असा विचार न करता या कार्यात प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला ,तर सर्व मिळून निश्चितच आपण आपल्या पृथ्वीवर स्वच्छ आरोग्यदायी व आनंदी जीवन जगू शकू.
| jagtik havaman din information in Marathi

    1950 साली जागतिक हवामानशास्त्र संघटना   डब्ल्यू एम ओ <wmo> स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या 31 देशात भारत ही होता. यानंतर जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणाऱ्या हवामानाच्या नोंदी देवाण-घेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल, कारण स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात आले.

         हवामान बदलायचा परिणामामुळे आज भारतातीलच नव्हे तर जगभरातली शेती क्षेत्र प्रभावित झाले  आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील त्यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन  आपत्कालीन उपायोजनासाठी तयार राहणे आवश्यक आहे .

    विसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे प्रगती केली पण या प्रगती सोबतच हवामानातील बदल आणि वातावरणातील कमी होणारा प्राणवायूचे  संकटही त्यातूनच उभे राहिले. जीवसृष्टीवरील दुष्परिणामांच्या रूपाने आपण ते अनुभवत आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमान वाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजनक परिणाम आहे .

       अनेक देशांमध्ये विशेषत अमेरिका  आणि युरोप  सारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत. भारत शेतीप्रधान देश असून भारतातील 70 टक्के नागरिक शेती आणि त्याला पूरक असणारे व्यवसाय करतात. परंतु देशाची लोकसंख्या विचारात घेता सरकारकडून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुख सुविधा खूपच तुकड्या पडतात. जनतेला पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देताना रेल्वे ,रस्ते ,नवीन इमारती, धरणे आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी जमिनीचा वापर करण्यात आल्यामुळे मोकळ्या जागा- जमिनी कमी होत चालले आहेत.

      हवामानातील अन्य अनपेक्षित बदलामुळे मानवी साधन संपत्तीचे इतर नुकसान होतेच. शिवाय अनेकांचा मृत्यू ओढवतो. इतर प्राणी पक्षीही यातून सुटत नाही कारण जगातील एका भागाचे हवामान इतर ठिकाणाहून भिन्न असू शकत नाही तर एका घटकातील बदलांचा परिणाम इतर घटकावर झालेला आढळतो. हवामानावर लक्ष ठेवणारी वर्ल्ड वेदर वाच ही प्रणाली आजही  सुरू असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते.

निष्कर्ष=
   प्रिय वाचक मित्रांनो या लेखामध्ये आपण जागतिक हवामान दिन याविषयी माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते  कमेंट करून नक्की सांगा.
  आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे तेही अवश्य सांगा .आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद...

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने