www.upkarmarathi.com

       नमस्कार .या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

|Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi pdf
|स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी pdf   



 |Swatantracha Amrut Mahotsav या विषयावर मराठी निबंध आणि भाषण  तसेच, अमृत महोत्सव भारत निबंध लिहिलेला आहे. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या भाषण स्पर्धांमध्ये नक्कीच होईल.                                                                                                    
 |Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi pdf
|स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी pdf   
  download करा 👇

 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यासाठी भाषण


                     |Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi, सर्वांना माझा मनःपूर्वक नमस्कार सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला स्वातंत्र्याचा आनंद ,अनुभव, अनुभूती प्रत्येक सेकंदाला मिळते त्या असंख्य स्वातंत्र्य वीरांना मी मनःपूर्वक वंदन करतो. स्वातंत्र्य  हा राष्ट्राचा प्राण आहे. आणि हा प्राण फुंकण्याचे काम शेकडो शूरवीरांनी प्राण देऊन गतप्राण होऊन केलेले आहे. 

 जब जब तिरंगा लहराता हे 
हे शूरवीर हमे तुम्हारी याद आती है
 ये शूरवीर हमे तुम्हारी याद आती है

                         मित्रांनो आज आपण सर्व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम साजरा करीत आहोत आणि याचवेळी मला शहीद भगतसिंगांची तीव्रतेने आठवण होते आहे. मला नेहमी असा भास होतो की, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात ही भारत माता भगतसिंगांबद्दल मोठ्या  गर्वाने मोठ्या अभिमानाने म्हणत असेल,
 या भूमीवरी संकट होऊनी 
 काळ जरी कोसळला असता 
या भूमीवरी संकट होऊनी 
 काळ जरी कोसळला असता 
निश्चित माझ्या या पुत्राने
  निश्चित माझ्या भगतसिंगाने
 तो छातीवरती झेलला असता 
तो छातीवरती झेलला असता,

             होय मित्रांनो मी आज तुम्हाला भगतसिंगां विषयी एक कथा सांगणार आहे. जी मुलांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. असं म्हणतात  बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. भगतसिंग तेव्हा फक्त आठ वर्षांचे होते . आपल्या मित्रांसोबत ते घराच्या अंगणात खेळता खेळता त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातल्या बंदुकीकडे गेले .लहान मुलांना खेळण्यातल्या बंदुकीचे खूप जास्त आकर्षण असते ,पण हे तसले आकर्षण नव्हते बरं का मित्रांनो! तर हा एक संकेत होता .

     छोटा भगत काकांना विचारतो चाचाजी चाचाजी यह क्या है ?और इससे क्या होता है ? काकांना आता आश्चर्य वाटते आणि ते विचार करू लागतात. आता या मुलाला काय सांगावे ? पण काका सांगतात यह बंदूक हे और    इसका  इस्तमाल करके अन्ग्रजोको  हिंदुस्तान से बाहर भगाने वाले है| पढाई कर पढाई|


              या चार दोन वाक्यांचा या छोट्या मुलावर इतका परिणाम झाला की याच बंदुकीचा वापर करून आपल्याला इंग्रजांना हिंदुस्थाना बाहेर हाकलून द्यायचे आहे. या एकाच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला. अशाच एका दिवशी छोटा भगत काकां बरोबर शेतात काम करायला गेला. काका आंब्याच्या रोपांची लागवड करीत होते. "तेव्हा भगतने त्यांना विचारले चाचा जी आप क्या कर रहे है ?" चाचा जी म्हणाले हम सब आम कि बाग लगा रहे हे|इन्हे फळ आयेंगे तब हम बाट  कर खायेंगे"

          भगत पळत घराकडे गेला घराकडे गेला व तो जागोजागी खड्डे खोदू लागला. काकांना आश्चर्य वाटले हा छोटा भगत एवढे खड्डे उत्साहाने  का खणत आहे ?असा प्रश्न त्यांना पडला .तेव्हा त्यांनी भगतला  विचारले बेटा भगत यह तूम  क्या कर रहे हो?" यावर तो म्हणाला की हम यहां बंदूकों की फसल उगाएंगे और यह सारी बंदूकें सबको बांट कर अंग्रेजो को हिंदुस्तान से बहार भगायेंगे ."

      मित्रांनो मला आता आश्चर्य वाटते की ज्या वयात हा छोटा मुलगा खाऊ खायचे सोडून, खेळणी खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो आणि काही वेळानंतर बंदुकीची शेती करू पाहणारा हा मुलगा क्रांतिकारी चळवळीचा अविभाज्य अंग बनतो आणि यह देश हमारा है  यहासे  चले जाव नही तो गोली खावो " असे ठणकावरून सांगतो .

         मित्रांनो भगतसिंग फक्त 21 वर्षाचे होते , पण त्यांनी आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले .ते म्हणाले होते ,
           " जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है |
 दुसरो के  कांधोंपर पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है।"

 या क्रांतिवीराला माझा सलाम जय हिंद जय भारत धन्यवाद

|भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे निबंध

अमृत महोत्सव भारत निबंध क्रमांक 2

अमृत महोत्सवी भारत 2021

      15 ऑगस्ट 2021. आज आपला भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे .त्यामुळे प्रत्येक भारतीय अतिशय आनंदात व उत्साहात आहे. देश व मातृभूमी विषयीची आस्था  असणे खूप महत्त्वाचे आहे.

     आपल्या भारत देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे ,देशाला स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आहे, दीडशे वर्ष पारतंत्र्य व त्यातून मुक्ततेसाठीचा संघर्ष खूप मोठा आहे. अनेक महान व्यक्तींनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले .आज 2021 या अमृत महोत्सवी वर्षात भारत देशाने खूप काही कमावले आहे .

              ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केलेली आहे. कृषी ,उद्योग, व्यापार, दळणवळण ,शिक्षण ,आरोग्य, संशोधन, संरक्षण अशा असंख्य क्षेत्रातले आपल्या भारत देशाचे यश लक्षणीय आहे. सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे .

          आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही हे जगण्याचे एक सर्वोच्च मूल्य आहे .आपण खूप भाग्यवान आहोत की आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. अमृत महोत्सवी वर्ष हा आपल्या भारत देशासाठी खूप मोठा टप्पा आहे. यात प्रथम पारतंत्र्यातून मुक्त होऊन नंतर नव्या भारताच्या उभारणीचा मार्ग व प्रयत्न आहेत.

              जगाला कवेत घेण्याची क्षमता भारत देशाकडे आहे. आज नवनिर्माणाच्या नव्या दिशा आपण शोधलेल्या  आहेत . आपल्या संस्कृतीचा उद्घोष करून आपण समृद्धीची शिखरे चढत चाललो आहोत.
    अशा या माझ्या भारत देशाच्या सन्मानार्थ माझ्या मुखातून या काव्यपंक्ती सहज येत आहे,,

 15 ऑगस्ट हमे है प्यारा ,
आजादी का पर्व यह न्यारा 
आजादी का पर्व यह न्यारा 
मुट्ठी में आकाश कर लिया 
यश गाता है यह जग सारा


   प्रिय मित्रांनो तुम्हाला हा "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी  |Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi " किंवा अमृत महोत्सवी भारत 2021 निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठीमध्ये अजून वेगळ्या स्वरूपात हवे असतील तर तसेही कळवा. धन्यवाद.

TAGs
Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi ,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी ,अमृत महोत्सवी भारत 2021, भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे निबंध

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने