www.upkarmarathi.com

लोकमान्य टिळक भाषण |Lokmanya Tilak bhashan Marathi |Lokmanya Tilak speech in Marathi |Lokmanya Tilak speech in Marathi for school students

प्रस्तावना 


   |Lokmanya Tilak speech in Marathi,देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी आपल्या घरा दारावर तुळशीपत्र ठेवले. देशाला स्वातंत्र्य मिळावे हेच एक स्वप्न उराशी बाळगून अनेकांनी अनंत यातना सोसल्या. यापैकीच एक होते लोकमान्य टिळक(|Lokmanya Tilak). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून लोकमान्य टिळक ओळखले जातात. दरवर्षी शाळा आणि कॉलेजमध्ये एक ऑगस्टला बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक(|Lokmanya Tilak) यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

   जर तुम्ही अशा विविध स्पर्धांसाठी लोकमान्य टिळक मराठी भाषण (Lokmanya Tilak bhashan in Marathi) शोधत असणार तर मग आजचा हा लेख तुमच्यासाठी फारच उपयोगाचा ठरेल यात अजिबात शंका नाही .या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी लोकमान्य  अनेक भाषण समाविष्ट केले आहेत यांचा उपयोग तुम्हाला तुमच्या शाळेत एक ऑगस्टला नक्की होऊ शकतो

|Lokmanya Tilak speech in Marathi
 |Lokmanya Tilak speech in Marathi 


लोकमान्य टिळक भाषण मराठी भाषण क्रमांक 1 


ब्रिटिश सरकारच्या अन्यायाचे 
   भारतीय जनतेसमोर वाचले पाढे |
न्याय मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 
    अन्यायी सरकारशी दिले लढे |

  सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो. सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

        ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ उगवावे, अगदी त्याच पद्धतीने लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

      त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई हे होते. टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. इंग्रजांविरुद्ध जनतेने एकत्र यावे, लढा द्यावा यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले.

          लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे देखील सुरू केली होती.
मंडालेच्या  तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी "गीतारहस्य" नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

        "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !"अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचे अभंग सिंहासन गदा-गदा हलवण्याचा भीम पराक्रम केला.

        संपूर्ण भारत देशामध्ये स्वराज्याची  भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचे कार्य टिळकांनी केले ,यामुळेच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे देखील म्हणतात . दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक या महापुरुषांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

   प्रिय मित्रांनो तुम्हाला हे लोकमान्य टिळक भाषण मराठी (lokmanya tilak bhashan )कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा .तसेच लोकमान्य टिळक(lokmanya tilak) यांच्या विषयी तुम्हाला अजून भाषण हवे असेल तर खाली क्लिक करा.

लोकमान्य टिळक दहा ओळी भाषण
| Lokmanya Tilak speech in Marathi 10 lines


1) लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेते होते.

2) टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.

3) टिळकांचे बालपणीचे नाव केशव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत आणि आईचे नाव पार्वती बाई असे होते.

4) टिळकांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली.

5)रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावांमध्ये टिळकांचा जन्म झाला व त्यांचे बालपण देखील चिखली येथेच गेले.

6) बालपणापासूनच टिळकांमध्ये देश प्रेमाचे तीव्र भावना निर्माण झाली होती टिळकांना छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श वाटत असत.

7) टिळकांनी लोकांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवली त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला म्हणूनच इंग्रज त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" असे म्हणून संबोधू लागले.

8) टिळकांना तुरुंगवासात मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले ,त्याठिकाणी देखील ते शांत बसले नाहीत .मंडलेच्या तुरुंगात त्यांनी  गीतारहस्य हा महान ग्रंथ लिहिला.

9) टिळक हे जहाल मतवादी विचारसरणीचे नेते होते.

10) टिळकांच्या मृत्यूनंतर टिळक युगाचा शेवट होऊन गांधी युगाला प्रारंभ झाला.


मित्रांनो लोकमान्य टिळक यांच्या विषयी दहा ओळी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा आणि आता आपण वळूया लोकमान्य टिळकांच्या पुढील भाषणाकडे.


लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण 
|Lokmanya Tilak speech in Marathi


    या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष सन्माननीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो .आज मी तुमच्यासमोर लोकमान्य टिळकांच्या पुण्यन्तिथी निमित्त त्यांच्याबद्दल जे चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणाने ऐकून घ्यावेत अशी मी आपणास नम्र विनंती करतो.

    स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असे ब्रिटिशांना अगदी निर्धाराने आणि धाडसाने सांगून त्यांचे अभंग सिंहासन गदागदा हलवण्याचा भीम पराक्रम करणाऱ्या लोकमान्य टिळकांना माझा प्रणाम.

    भारताच्या जाज्वल्य स्वातंत्र्यलढ्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकीच लोकमान्य टिळक  म्हणजे धगधगता अग्निकुंडच होय.

   टिळकांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखली या गावामध्ये झाला. त्यांचे केशव असे नाव ठेवण्यात आले प्रेमाने लोक त्यांना बाळ असे म्हणत. हेच नाव पुढे त्यांना पडले आणि त्यामुळे मोठे झाल्यावर लोक त्यांना बाळ गंगाधर टिळक असे म्हणू लागले.
    गंगाधर पंत आणि पार्वतीबाई यांच्या पोटी जन्माला आलेला हा केशव अत्यंत हुशार आणि धडाडीचा होता. बालपणापासूनच ते प्रचंड हुशार होते. गणित आणि संस्कृत हे लोकमान्य टिळकांचे अत्यंत आवडते विषय होते. पुढे त्यांनी हे विषय शिकवले देखील.

     टिळक अत्यंत धाडसी वृत्तीचे होते एकदा वर्गात मुलांनी शेंगा खाऊन टरफले बाका खाली टाकली. शिक्षक वर्गात आल्यावर शिक्षकांनी सर्वांना शिक्षा करायला सुरुवात केली. टिळक न घाबरता शिक्षकांना म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही. अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या या वागण्यातून दिसून येते. त्यांच्या या वृत्तीनेच त्यांना संघर्ष शिकवला आणि इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी शक्ती दिली.

   टिळक सोळा वर्षाचे असताना त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केले आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई म्हणजेच तापी बाई यांच्याशी झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. गणित विषयांमधून 1876  साली टिळक बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले .पुढे त्यांनी एल.एल.बी. देखील केले.
    
     डेक्कन कॉलेज मधील शिक्षणा दरम्यान त्यांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर मैत्री झाली. पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने टिळकांनी 1880 मध्ये इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.

     आम्हाला संपूर्ण स्वराज्य हवे आहे असा टिळकांचा निर्धार होता .टिळकांच्या अनोख्या नेतृत्वामुळे जनमानसांमध्ये टिळक अत्यंत लोकप्रिय झालेले होते. इंग्रजांमध्ये देखील टिळकांविषयी प्रचंड भीती होती. केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून त्यांनी अनेक अग्रलेख लिहिले ब्रिटिश सरकारचे डोके ठिकाणावर आहे का तसेच उजाडले पण सूर्य कुठे आहे असे अनेक अग्रलेख लिहून टिळकांनी ब्रिटिशांविरोधात  भूमिका घेतली.

      स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर त्यासाठी रक्त सांडावेच लागते नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत समजणार नाही असे टिळक  म्हणत असत. कितीही संकटे आलीत अगदी आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील असे ते म्हणून त्यांच्या या जाज्वल्य आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले.
     
      अशा या तेजस्वी क्रांतीसुर्याने एक ऑगस्ट 1920 रोजी या जगाचा निरोप घेतला.

अशा या महान देशभक्तासाठी माझ्या मनातून दोनच ओळी बाहेर येतात...
 मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे तुझ्या यशाचे गाणे गाती तोफांचे चौघडे

   प्रिय मित्रांनो तुम्हाला हा लोकमान्य टिळक निबंध मराठी(|Lokmanya Tilak essay in Marathi  ) कसा वाटला? हे कमेंट करून नक्की सांगा.


निष्कर्ष


     Lokmanya Tilak speech in Marathi, यामध्ये टिळकांच्या जीवनामध्ये अनेक मूलभूत गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. शाळेमध्ये ज्या वेळा तुम्ही लोकमान्य टिळक यांच्या विषयी भाषण त्यावेळी या वरील भाषणामधील अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकता. वरील भाषणांमधून तुम्ही स्वतः प्रेरणा घेऊन भाषण लिहू शकता. वरील Lokmanya Tilak speech in Marathi for school students,शालेय विद्यार्थ्यांसाठी फारच उपयोगाचे ठरेल.

   Tags: Lokmanya Tilak information in Marathi speech, Lokmanya Tilak bhashan Marathi mande ,Lokmanya Tilak Marathi ,Lokmanya Tilak punyatithi

खालील लेख वाचायला विसरू नका 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने