www.upkarmarathi.com

        राजमाता जिजाऊ माहिती ,Jijabai information in Marathi , राजमाता जिजाबाई माहिती , जिजाऊ माता एक आदर्श आई आणि एक महान व्यक्तिमत्व होत्या त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला जाणे संपूर्ण इतिहासच बदलून टाकला. राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांचे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बनवले ज्यामुळे  स्वातंत्र्य  शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजला. एका मोठ्या जहागीरीची जबाबदारी सांभाळत असताना देखील त्यांनी शिवाजी महाराजांसारख्या कर्तबगार पुत्राला घडवले. अशा जिजाऊमाते विषयी आपण आजच्या , jijabai information in Marathi या  मराठी लेखामध्ये जाणून घेणार आहोत. 


राजमाता जिजाबाई विषयी माहिती
 (jijamata information in Marathi)


Jijaamata full information in Marathi
jijau information in Marathi



Jijaamata full information in Marathi 

| वीर माता जिजाबाई माहिती मराठी



      जिजामाता म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्म इसवी सन 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते तर आईचे नाव म्हाळसाबाई होते . हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या महान जाणता राजा  छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ मातोश्री होत्या. सिंदखेड राजा हे केवळ  एतिहासिक स्थळ नाही तर पर्यटन स्थळ म्हणून देखील  ओळखले जाते.

      जिजाऊमासाहेबांचा जन्म भुईकोट राजवाडा मध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला .आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई नागपूर हायवे ला लागूनच आहे. याच वास्तू समोर नगरपालिका निर्मित एक बगीचा देखील आहे .येथे राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे .ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदू राज्याच्या  समाधी पेक्षा मोठी वास्तू आहे .ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच रंगमहालात जिजाऊंच्या आणि शहाजीराजे यांच्या   विवाहाची बोलणी करण्यात आली होती. येथे निळकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरा मध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरिहरा ची सुंदर शिल्प आहे तर राजे लखुजीराव जाधव यांनी मंदिराचे  पुनरुज्जीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे.Veermata jijabai information in Marathi


   या मंदिरासमोरच चौकोनी आकारात  असलेली एक बारव आहे . या बाराव मध्ये तळापर्यंत उतरण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था  आहे.  आठव्या ते दहाव्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे. राजे जगदेवराव जाधव यांच्या कार्यकाळात भव्य किल्ल्यांच्या निर्मितीची सुरुवात झाली होती त्याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठ च्या भिंती वीस फूट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत .या सोबतच साखर वाडा नावाचा चाळीस फूट उंच भिंती चा परकोट येथे बघायला मिळतो . त्या परकोटावर निगराणी साठी अंतर्गत रस्ता, आत मध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वास्तूचे प्रवेशद्वार देखील अति सुंदर आहे.

राजमाता जिजाबाई यांची संपूर्ण माहिती


    मोती तलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थित नियोजन पद्धती  आहे . त्या काळातील जल अभियांत्रिकीचा अति उत्कृष्ट नमुना आहे. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून विलोभनीय परिसर याला  लाभलेला आहे.  मोतीतलावाप्रमाणेच , चांदणीतलाव हे सुद्धा एक  प्रेक्षणीय स्थळ आहे . तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधलेली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळा बारव आहे . ही बारव म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेले देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे .त्या काळी या विहीरीतून गावांमध्ये पाणीपुरवठा भूमिगत बंदिस्त नाल्यांच्या द्वारे केले  जात होत्या. या विहिरी आतपर्यंत उतरण्यासाठी पायर्‍यांची सुविधा देखील आहे.Rajmata jijabai information in Marathi.



faqs

जिजाबाईने कोणता निश्चय केला होता

शिवबा लोकांच्या कल्याणासाठी लोकांचे राज्य अर्थातच स्वराज्य स्थापन करेल तो संपूर्ण प्रजेला सुखी करेल शिवबा परत यांची साखरी किंवा गुलाम मी कधीही करणार नाही असा जिजाबाई निश्चय केला.

 जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला 

जिजाबाईंचा मृत्यू 17 जून 1674 रोजी झाला.

जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?

 जे स्वप्न आपण मनामध्ये बाळगले आहे ते स्वप्न शिवबा पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.

राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे ?

 रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड नावाचे गाव आहे या गावामध्ये राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे.

शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाई यांनी केलेले विविध संस्कार लिहा 

  जिजाबाईंनी शिवरायांना युद्धकला, राजनीति युद्धविद्या, शस्त्रास्त्रविद्या, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र स्त्रियांचा सन्मान करणे असे संस्कार दिले.

राजमाता जिजाऊ जयंती 

12 जानेवारी

एक दिवस जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या 

जिजामाता शिवरायांना म्हणाल्या कि कोंढाण्याचा सारखा मजबूत किल्ला मोगलांच्या ताब्यात असणे योग्य नाही त्यामुळे तो किल्ला पुन्हा स्वराज्यात घेण्यासाठी जिजाबाईंनी शिवरायांना सांगितले.

जिजाबाईंची ईतर नावे

जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मासाहेब, वीरमाता.

जिजाबाई यांचे पूर्ण नाव

जिजाबाई यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले

राजमाता यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला.

जिजाबाईंचा विवाह त्या सहा वर्षांच्या असताना  शहाजीराजे भोसले  यांच्याशी झाला ते मालोजी भोसले यांचे सुपत्र . 

सिंदखेड ची लढाई कोणा कोणा मध्ये झाली

सिंदखेड येथे मराठी आणि निजाम अली यांची युद्ध झाले. या युद्धात निजामाचा पराभव झाला त्यामुळे मराठ्यांना 25 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळाला.

या निबंधाचा किंवा लेखाचा लोक खालीलप्रमाणे देखील शोध घेतात .

  •  जिजामाता निबंध
  • राजमाता जिजाबाई जिजामाता इन्फॉर्मशन इन मराठी
  •  राजमाता जिजाऊ मराठी माहिती 
  •  राजमाता जिजाबाई संपूर्ण माहिती मराठी
  • स्वराज्य जननी जिजामाता

हे वाचायला विसरू नका 


याठिकाणी दिलेल्या jijau information in Marathi (राजमाता जिजाबाई जिजामाता इन्फॉर्मशन इन मराठी)  लेखातील माहिती मध्ये तुम्हाला जर काही चुकीचे वाटले तर आम्हाला तात्काळ कमेंट बॉक्समध्ये किंवा इमेल लिहून कळवा. तुम्ही दिलेली माहिती किंवा सूचना बरोबर असल्यास आम्ही हे नक्की बदल करू. अजून नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेट द्या उपकारमराठी.कॉम

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने