www.upkarmarathi.com



3 January Balika din information in Marathi 3 
जानेवारी बालिका दिन माहिती राष्ट्रीय बालिका दिवस.
    
         सर्वसामान्य आणि बहुजन समाजामध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण करणारे थोर समाज सुधारक म्हणून महात्मा ज्योतीबा फुले हे आपल्या सर्वांना परिचित आहेतच. त्यांनी केलेले कष्ट आणि त्याग त्यामुळेच आज बहुजन समाज शिक्षणाची गोड फळे चाखत आहे.
           महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणाच्या या पवित्र कार्यामध्ये साथ दिली ती त्यांच्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी. चला तर मग आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती जाणून घेऊया.

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती

Savitribai Phule information in Marathi

         असे म्हटले जाते कि , प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो . अगदी त्याच पद्धतीने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्यामध्ये त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी.
        महात्मा ज्योतिबा फुले यांचे ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न झाले त्यावेळेस सावित्रीबाई अशिक्षित होत्या. अशिक्षित जरी असल्या तरी देखील परिस्थितीची जाण असणाऱ्या एका सुसंस्कृत स्त्रीची सर्व लक्षणे त्यांच्या ठिकाणी होतीी. लग्नानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाईंनी देखील मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि संपूर्ण भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.

      सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील नायगाव येथे झाला. नायगाव पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर व शिरवळ पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.भारतीय सामाजिक सुधारणा आंदोलनामध्ये सौ सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे खूप मोठं नाव आहे. सावित्रीबाईंच ज्योतीरावांशी 1840 साली लग्न झालं त्यावेळी त्या फक्त नऊ वर्षांच्या होत्या व ज्योतिबा तेरा वर्षांचे होते.

        सावित्रीबाई फुले यांनी स्वतः आधी शिक्षण घेतले. आणि मग स्त्रियांच्या या उद्धारासाठी शैक्षणिक लढ्याला सुरुवात केली. श्रिया यांना फक्त शिक्षण देऊन चालणार नाही तर अन्य सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील काम करण्याची गरज आहे. असे त्यांना सतत वाटत होती.

      स्त्री शिक्षणाच्या मेरूमणी , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून अजरामर आहेत. सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्र माणूस विसरणे कधीही शक्य नाही. ज्या कठीण काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जायचे अशा कठीण परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला . त्यांच्या या महान कार्याला न डगमगता खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई कामाला लागल्या.

     स्वतः शिक्षण घेऊन सावित्रीबाई मुलींना शिकवू लागल्या. तत्कालीन रूढीवादी आणि परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजाला हे सहन झाले नाही यामुळे त्यांनी अनेक वेळा सावित्रीबाईंचा अपमान केला त्यांना शिव्याशाप दिले. काहीवेळा त्यांच्या अंगावर दगड आणि शेण यांचा मारा केला. पण सावित्रीबाईंनी हे सगळं सहन करून देखील कधीही माघार  घेतली नाही.

        आधी स्त्री शिकली पाहिजे स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे न्याय हक्क मिळाले पाहिजे. स्त्रियांना समाजात समान दर्जा मिळाल्याशिवाय समाज सुधारू शकणार नाही , हे त्यांनी ओळखले होते. शिक्षणाची ही ज्योत सतत  तेवत ठेवण्यासाठी प्रसंगी त्यांनी मंगळसूत्र देखील विकून टाकले.

     समाजासाठी आणि विशेषता स्त्रियांसाठी महान कार्य करणाऱ्यांच्या यादीमध्ये सावित्रीबाई फुले यांना सर्वोच्च मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
         

    faqs 


  • बालिका दिन कधी साजरा केला जातो?

बालिका दिन दरवर्षी 3 जानेवारीला साजरा केला जातो.

  • बालिका दिन कोणाच्या जयंती निमित्ताने साजरा केला जातो?

बालिका दिन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

3 जानेवारी 1831 रोजी, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील नायगाव.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू

10 मार्च 1897,प्लेगमुळे झाला.

  • बालिका दिन केव्हा पासून साजरा केला जातो?

समारोप 


     प्रिय मित्रांनो तुम्हाला हा बालिका दिन 3 जानेवारी छोटासा निबंध किंवा भाषण कसे वाटले ? ते मला तुम्ही नक्की कमेंट करुन सांगा. तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची भाषण किंवा निबंध पाहिजे असेल तर तोही कमेंट मध्ये सांगा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने