www.upkarmarathi.com

गुलाबाची मराठी माहिती
|Rose information in Marathi

      संपूर्ण जगामध्ये हजारो प्रकारची फुले आहेत परंतु गुलाब फुलाची बातच काहीतरी वेगळी आहे. उगाचच त्याला फुलांचा राजा म्हटले जात नाही. गुलाब जगातील सर्वाधिक सुंदर आणि सुगंधित फूल असल्याचे  मानले जाते. विविध प्रकारच्या रंगांमधील गुलाबाची फुले खूपच आकर्षक वाटतात . गुलाबाला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. गुलाबाला इंग्रजीत रोज (Rose 🌹)असे म्हणतात. अशा या छान गुलाबाची माहिती मराठीत आपण आज बघूया. या लेखामध्ये आपण जाणून घेऊया गुलाब फुलाचा इतिहास व गुलाबाची मराठी माहिती.

गुलाब फुलाची मराठी माहिती

|Rose information in Marathi

 |gulab fulachi mahiti

     आत्ताच्या काळातील विविधरंगी चित्र असुद्या किंवा इतिहासकालीन  कोरीव मूर्ती असलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुलाब फूल बघायला मिळेल. यावरूनच गुलाब फुलाची लोकप्रियता किती आहे हे आपल्या लक्षात येईल. विविध रंगांमध्ये उगवणाऱ्या सुंदर गुलाबाकडे आपले लक्ष गेले तर आपली मनस्थिती प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही.

गुलाब फुलाची मराठी माहिती
गुलाब फुलाची मराठी माहिती|Rose information in Marathi |gulab fulachi mahiti


     एखाद्या सुंदर स्त्रीला गुलाबाची उपमा दिली जाते. किंवा नाजूक सुकुमार अशा लहान बाळांना देखील गुलाब फुलांच्या नाजूकतेची उपमा दिली जाते. ज्या ज्या ठिकाणी सुंदरता, नाजुकपणा व निरागसपणा संबंधी बोलायचे असते . त्या-त्या ठिकाणी गुलाब फुलाचा उल्लेख हा ठरलेलाच असतो.
    ज्यावेळी एखादा प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला भेटत असतात त्यावेळी गुलाब फुलाची उपस्थिती त्याठिकाणी ठरलेलीच असते.

झाडा विषयी माहिती


  1.  गुलाबाचे झाड खूप उंच वाढत नाही ते फक्त पाच-सहा मीटर पर्यंत वाढते.
  2. संपूर्ण जगाभरात गुलाब फुलांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
  3. गुलाबाच्या झाडाला टोकदार छोटे छोटे काटे असतात. त्यामुळे बऱ्याचदा हे काटे गुलाब तोडताना हाताना टोचतात.
  4. गुलाबाच्या झाडाची फांदी लावली जाते. या फांदीला पुढे अनेक फांद्या येतात व मुळांची वाढ देखिल होते. गुलाबाच्या  पानांना बाहेरच्या बाजूने करवतीसारखा आकार असतो.
  5.  नाजूक छोटिशी पाने फारच सुंदर दिसतात.
  6.  एक पैसे देणारे पीक म्हणून देखील गुलाबाची शेती जगभरामध्ये केली जाते.
  7. घराचा शेताचा विविध कार्यालय यांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी यांच्या आजूबाजूला गुलाब फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

गुलाब फुलाचे उपयोग


    गुलाब हे सुवासिक फूल असल्याने पूजेसाठी वापरतात. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे अभिनंदन म्हणून गुलाबपुष्प दिले जाते. विविध सत्कार समारंभामध्ये देखील गुलाब फूल दिले जाते.
    घरभरणी, विविध सामाजिक कार्यक्रम , कौटुंबिक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुलाब फुलांचा पूजेसाठी वापर केला जातो . तसेच सजावट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गुलाब फुले वापरली जातात. स्त्रिया केसांमध्ये गुलाबाचे फुल माळतात. अत्तर , सरबत, गुलाबपाणी, रोजमेरी, तेल इत्यादी गुलाबापासून बनवले जातात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो.
     एखादी सामान्य स्त्री देखील ज्यावेळी गुलाबाचेफुल केसांमध्ये माळते त्यावेळी तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बऱ्याच ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या जेवणाची चव वाढवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वापरले जातात.

गुलाबाचे प्रकार

  1. वेली गुलाब
  2. फ्लोरी बंडा
  3. हायब्रीड टी
  4. मिनीएचर्स

याशिवाय गुलाबाच्या फुलांच्या रंगांवरून देखील विविध जाती आहेत.


 
रंगगुलाबाच्या जातीचे नाव
लाल  
सोफिया लॉरेन्स ,क्रिमसन ग्लोरी, पापा मिलान, मिस्टर लिंकन, ख्रिश्चन डायर

पांढरा 
लुसियाना ,वर्गो, पास्कली, जवाहर, गार्डन पार्टी
गुलाबी 
    केलस ,मृणालिनी ,मारिया, क्वीन एलिझाबेथ ,फर्स्ट प्राइस

पिवळा समर सनशाइन, डच गोल्ड , माबेला सनकिंग, लांडोरा



गुलाब फुलावर पडणारी कीड

  1. मावा 
  2. तुडतुडे 
  3. खवले कीड 
  4. फुलकिडे 
  5. कोळी 
  6. वाळवी 
  7.  पिठ्या ढेकूण

FAQ


|गुलाबाला इंग्रजीत काय म्हणतात?

गुलाबाला इंग्रजीत रोज (Rose) असे म्हणतात.

|रोज डे कधी साजरा करतात?

रोज दे म्हणजेच गुलाब दिवस दरवर्षी सात फेब्रुवारीला साजरा करतात.

|फुलांचा राजा कोणाला म्हणतात?

फुलांचा राजा गुलाबाला म्हणतात.

युरोपमधील काही देशांनी गुलाब फुलाला राष्ट्रीय फूल म्हणून घोषित केलेले आहे.

|गुलाबाला कशाचे प्रतीक म्हणतात?

गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने