www.upkarmarathi.com

मित्रांनो सध्याच्या विज्ञान युगामध्ये संगणकाने आपल्या आयुष्यावर पूर्णपणे पकडून मिळवलेली आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा शिरकाव झालेला आहे. हे संगणक आपल्याशी बोलू लागले तर ते काय बोलले ना? हे आपण आजचा निबंध मी संगणक बोलतोय यामध्ये बघूया. चला तर मग बघुया एक छानसा निबंध मी संगणक बोलतोय |Mi sanganak boltoy  किंवा संगणकाचे मनोगत.

Mi sanganak boltoy Marathi nibandh
संगणकाचे मनोगत



संगणकाचे मनोगत मराठी निबंध
 |sanganakache manogat marathi essay
 |essay in marathi 

      नमस्कार प्रिय मित्रांनो मी संगणक बोलतोय .आज या संगणकाचे मनोगत तुम्ही ऐकून घ्यावे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्हाला वाटेल संगणक  कसा बोलू लागला? संगणक तर  यंत्र आहे. मला माहिती आहे मी यंत्र आहे परंतु तरीही मी बोलणार आहे.

     संगणकाचे म्हणजे माझे महत्त्व तुम्ही सगळेजण जाणुन आहात. आज जगातील असे एकही क्षेत्र नाही ज्या मध्ये संगणकाचा उपयोग केला जात नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाचा अचूक पणे वापर केला जातो. माझी चुकतात अशी आहे की मला एकदा जी आज्ञा दिली ती मी अचूकपणे पार पाडतो. त्यामुळेच मी सगळ्यांचा फार लाडका झालेलो आहे.

     अनेक दुकानांमध्ये हिशोबासाठी व इतर सर्व तांत्रिक बाबींसाठी माझा अगदी सफाईने उपयोग केला जातो. गणितातील मोठमोठ्या क्लिष्ट क्रिया मी अगदी क्षणार्धात सोडवून मोकळा होतो. माझ्या या उपयुक्ततेमुळे मी आज सगळ्यांचा लाडका बनलेलो आहे. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनण्यासाठी मात्र मला बरेच कष्ट करावे लागतात.
      बऱ्याच वर्षांपूर्वी माझा आकार खूप मोठा होता .मी एका मोठ्या खोलीच्या आकाराचा होतो. परंतु हळूहळू जसजसे विज्ञान प्रगती करत गेले तसा माझा आकार लहान होऊ लागला ,आणि आता तर मी लहान टेबलावर सुद्धा आरामात बसू शकतो.

     विविध प्रकारचे नवनवीन घरे कसे बांधावेत? यासह विविध प्रकारच्या घराच्या बांधकामात संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शिक्षण क्षेत्र तर अक्षरशः  संगणकाने व्यापून टाकले आहे. विविध प्रकारचा अभ्यास प्रॅक्टिकल संगणकाच्या आधारे घरात बसून सोडवता येतात. संगणकावर काम करताना मुलांना आनंदही मिळतो. त्यामुळे त्यांचा अभ्यास देखील चांगला होतो. अर्थात संगणकाचा जास्त उपयोग करताना डोळ्यांची देखील हानी होते परंतु योग्य काळजी घेतली तर डोळ्यांचे हानी होण्यापासून आपण वाचू शकतो.


     संगणकात खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवता येते. माहिती फक्त साठवून ठेवता येत नाही तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ही माहिती वापरू शकता. संगणकाच्या मदतीने तुम्ही फक्त एका क्लिकवर अशी कामे करू शकता ज्यासाठी तुम्हाला अनेक तास लागू शकतात. संगणकामध्ये साठवून ठेवलेली माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपण कधीही आणि कुठेही बघू शकतो त्यामुळे वेळेची बचत तर होतेच परंतु होणारा त्रास देखील कमी होतो.

     संगणकामध्ये माहिती मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्यामळे कागद वापरण्याचे प्रमाण कमी होते. कागद कमी वापरल्यामुळे वृक्षतोडीवर सुद्धा मर्यादा येतात. एका अर्थाने संगणकामुळे वृक्षतोड कमी होण्यास देखील हातभार लागतो. स्वतःचे कौतुक करून घेण्यामध्ये मला फारच मजा वाटत आहे.

      संगणकाच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होते. वाचलेली ही वेळ तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामांमध्ये वापरू शकता.  वेळ माणसाला परत कधीही मिळू शकत नाही त्यामुळे हातात जो वेळ मिळालेला आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर करून घेणे यासाठी संगणकाचा इतके चांगले साधन कोणतेही नाही.

    असा मी संगणक बहुउपयोगी आणि बहुगुणी आहे. मी इतरांना उपयोगी पडतो याचा मला खूप अभिमान वाटतो. दुसऱ्यांचे कष्ट कमी करणे इतरांच्या उपयोगी पडणे यातच मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याची धन्यता वाटते.

प्रिय वाचक मित्रांनो आपण आत्ता बघितलेल्या संगणकाचे मनोगत निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.

  1. |संगणकाचे आत्मकथन
  2. |संगणकाचे आत्मकथा मराठी निबंध संगणकाचे विचार 
  3. |संगणक बोलू लागले तर
  4. | संगणकाची आत्मकथा
  5. | मी संगणक बोलतो आहे 
  6. |संगणकाचे मनोगत मराठी निबंध
  7. |संगणकाचे उपयोग
  8. |संगणक आणि मानव

          प्रिय विद्यार्थी आणि वाचक मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिलेला मी संगणक बोलतोय किंवा संगणक बोलू लागला तर मराठी निबंध कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला तुमच्या आवडीचा अजून एखादा निबंध हवा असेल तर तसेही कमेंट मध्ये सांगा. मी माझ्या परीने नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीन.

खालील निबंध नक्की वाचा 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने