www.upkarmarathi.com

            Mazi aavadti maitrin in Marathi, शालेय जीवनामध्ये आपल्याला अनेक मित्र मैत्रिणी भेटत असतात त्यामधील काही मित्र आणि मैत्रिणी आपल्या कायम स्मरणात राहतात. काही आपले चांगले मित्र-मैत्रिणी बनतात. म्हणूनच  म्हणून आज आपण माझी आवडती मैत्रीण हा छानसा निबंध बघूया.

Majhi avadti maitrin in Marathi,
माझी आवडती मैत्रीण निबंध


    आजच्या आपल्या माझी आवडती मैत्रीण या निबंधामध्ये मैत्रिणीचे वर्णन करताना कशा पद्धतीने करावे याविषयी सविस्तर माहिती बघूया. चला मग बघुया एक छानसा निबंध माझी आवडती मैत्रीण. Marathi essay on Mazi maitrin for 7th class

माझी आवडती मैत्रीण मराठी निबंध

|my best friend Marathi essay


     ज्याला जगात मित्र नाहीत त्याच्यासारखा दुर्दैवी या जगामध्ये कोणीही नाही असे म्हटले जाते.  मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो. मित्रा आपले दुःख वाटून घेतात. आपण अडचणीत असलो की आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. ज्याला एकही मित्र नाही तो व्यक्ती आतून पूर्णपणे खचून जातो. सुदैवाने मला एक चांगली मैत्रीण आहे.
      तसे मला अनेक मित्र आहेत परंतु योगिता माझी खरी मैत्रीण आहे. आमचे घर जवळच आहे. इयत्ता पाचवी पासून आम्ही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत आहोत. तसे पाहता एका वर्गात शिकत आहोत आम्ही एकमेकांच्या चांगल्या मैत्रीण आहेत तर योगिता चा स्वभाव खूपच छान आहे म्हणून ती माझी खरी मैत्रीण आहे.
     आम्ही दोघीही शाळेमध्ये एकत्र जातो. शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही दोन्ही एकाच बाकावर बसतो. योगिता चे अक्षर फार सुंदर आहे. स्केचपेन च्या सहाय्याने ती फार सुंदर अक्षरात लिहिते. मलाही तिने शिकवले आहे त्यामुळे माझे अक्षर सुद्धा आता सुंदर झाले आहे.



      शाळेमध्ये मोकळा वेळ मिळाला की आम्ही दोघी मराठी आणि हिंदी च्या पुस्तकातील कविता वेगवेगळ्या सिनेमातील गाण्यांच्या चालीवर म्हणतो. योगिता चे वडील संगीत शिक्षक आहेत. त्यामुळे योगिताला देखील संगीताची खूप आवड आहे. शाळेत शिक्षकांनी एखादी गाणे किंवा कविता शिकवले योगिताचे ते लगेच पाठ होते. त्यामुळे शिक्षक देखील तिला ते गाणे किंवा कविता वर्गासमोर सादर करायला सांगतात.

    घरात मैदानात किंवा इतर वेळी आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारत असतो परंतु वर्गात शिक्षक शिकवत असताना आम्ही अजिबात गप्पा मारत नाही. अभ्यासाच्या वेळी आम्ही अगदी मन लावून अभ्यास करतो. त्यामुळे आम्हाला खूप चांगले गुण मिळतात. योगिता चा आणि माझा तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा नंबर आला होता. जशी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जोडी होती तशीच माझी आणि योगिताची जोडी आहे. माझं काही चुकत असल्यास  ते लगेच मला सांगते. खरोखर अशी मैत्रीण मिळायला खूप मोठे भाग्य लागते.

     माझा आवडता विषय गणित आहे आणि योगिता चा आवडता विषय मराठी आहे.  एकत्र अभ्यास करताना या विषयांत काही अडचण आल्यास आम्ही एकमेकांना मदत करतो. माझ्या अनेक मित्र मैत्रिणींपैकी योगिता माझी प्रिय मैत्रीण आहे.
      योगिता फक्त अभ्यासात हुशार आहे असे अजिबात नाही. आमच्या शाळेच्या कबड्डी आणि खो-खो संघाची ती कप्तान आहे. कबड्डीखेळामध्ये तर तिला तोड नाही. समोरचा खेळाडू कितीही चपळ असला तरी देखील योगिताच्या हातून सुटून जाणे केवळ अशक्य आहे. योगिताच्या या चौकसपणाचा मला देखील खूप फायदा होतो. माझ्याकडून काही चुकत असले तर लगेच ती मला अडवते. जो आपल्याला वाईट कामापासून आणि चुकांपासून परावृत्त करतो तोच आपला खरा मित्र असतो असे म्हटले जाते. मैत्रीचे हे कर्तव्य योगिता अगदी तंतोतंत पार पाडते.
    अशी ही सर्वगुणसंपन्न योगिता माझी आवडती मैत्रीण आहे. आणि मला अशी मैत्रीण मिळाली याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानते.

       प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा मी लिहिलेला माझी आवडती मैत्रीण मराठी निबंध , my best friend Marathi essay कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला अजून या पद्धतीचे कोणतेही निबंध हवे असतील तर तसे कमेंट करून सांगा .मी तुम्हाला निबंध लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करीन.    

या निबंधाची खालील प्रमाणे ही नावे असू शकतात

  1. | माझी मैत्रीण मराठी निबंध
  2. | माझी खरी मैत्रीण निबंध मराठी
  3. | माझी बालपणीची मैत्रीण
  4. | माझी प्रिय मैत्रीण निबंध इन मराठी
  5. | Marathi essay on Mazi maitrin for 7th class
हे ही नक्की वाचा
  1.  माझी आई, majhi aai marathi nibandh  
  2. मी कोरोना वायरस बोलतोय.
  3. माझी अभयारण्यास भेट. 
  4. माझा भाऊ
  5. माझे वडील मराठी निबंध


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने