www.upkarmarathi.com

pustakache manogat nibandh marathi
 पुस्तकाचे मनोगत



|पुस्तकाचे मनोगत 
|Pustakache manogat in Marathi

     आज शाळेतून लवकरच घरी आलेलो होतो. तब्येत बरी नाही म्हणून शिक्षकांची रजा घेतली. घरी पोहोचलो. दप्तर ठेवले आणि अंथरुणात जाऊन पडलो. अंथरुणावर अंग टाकताच अंगाला कुठलेतरी पुस्तक टोचले. बरे वाटत नसल्यामुळे ते पुस्तक तसेच कसेतरी उचलले आणि कोपऱ्यात फेकून दिले.

        पुस्तक फेकल्याबरोबरच आवाज आला " अरे ,तुला कसा त्रास होतो आहे म्हणून तू शाळेतून आज लवकर घरी आलेला दिसतोस. तसा मला फेकतो तर मलाही त्रास होतोच.आवाज कुठून येतो आहे बघू लागलो तर पुन्हा आवाज आला अरे मी पुस्तक बोलतो आहे आत्ताच तू मला फेकलस ना या कोपऱ्यामध्ये.

      पुस्तक अजूनच रागाने बोलू लागले. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा तू माझी किती काळजी घेत होतास. पण आता मी जुना झालो तर तू आता माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. माझी पाने किती फाटले आहेत तरीदेखील तो ती पाणी व्यवस्थित चिकटवत नाहीस.

        जेव्हा तु मला नवीन आणलं होतं, त्यावेळी माझी पूजाही केली होतीस. दिवसभर मला हातात घेऊन फिरत असायचा. माझे पृष्ठ खराब होऊ नये म्हणून तू मला छान कव्हर हे घातला होतास. आता तो कव्हर फाटला आहे तू कव्हर व्यवस्थित लावण्यासाठी ही तुला  वेळ नाही.

         माझ्यामधील प्रत्येक पानावर असलेली चित्र तुला फार आवडत असत. या चित्रांवरून जेव्हा तू आनंदाने हात फिरवत असे तेव्हा मला आई जशी लहान बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते तसा प्रेमस्पर्श वाटत असे. कितीतरी दिवसांपासून मला तू प्रेमाने स्पर्श देखील केला नाहीस. आजही रागाने फेकून दिलेस.

          मला सतत असे वाटते की तू पुन्हा माझी तशीच काळजी घेशील माझी फाटलेली पाणी व्यवस्थित चिकटवून देशील. माझ्या पृष्ठांवर असलेले चित्र डोळे भरून बघशील आणि आनंदित होशील. त्या आनंदाच्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे.

         माझ्या काही पुस्तकांवर रंग भरण्यासाठी काही चित्रे दिलेली आहेत. काही चित्रांमध्ये तू तुझ्या आवडीनुसार रंग भरून माझे सौंदर्य अजूनच वाढले आहे. तर त्यातील काही चित्रे अजूनही तुझ्या उत्तम रंगसंगतीची वाटच बघत आहेत. माझ्या सहा त्या चित्रातील प्राणी आणि पक्षांना देखील तुझी ओढ लागलेली आहे. माझी तुला कळकळीची विनंती आहे की तू दिवसातून जास्त नको परंतु एकदा तरी मला भेटत जा.

        पुस्तकाची ही केविलवाणी विनंती ऐकून मला फार वाईट वाटू लागले. पुस्तकाचे कैफियत आहे पण घेताना मला मी पुस्तकाकडे केलेले दुर्लक्ष देखील जाणवले. मी पुस्तकाला शब्द दिला आज पासून मी त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही दररोज त्यात राहिलेली चित्रे आवडीने रंगविण.

       मी असे बोलताच  एक मंद वाऱ्याची झुळूक आली .पुस्तकाची पाने वेगाने फडफडली आणि  पुस्तकाने मला होकार देऊन आनंद व्यक्त केला असे मला वाटले. थोड्याच वेळात पुस्तकाचे  पाने फडफडणे बंद झाले आणि पुस्तक उद्याची वाट पाहत आहे असे मला वाटू लागले.



       प्रिय मित्रांनो तुम्हाला हा पुस्तकाचे मनोगत किंवा पुस्तक बोलू लागले तर निबंध कसा वाटला ?  हे मला कमेंट करून नक्की सांगा.
   तुमच्याशी पुस्तक बोलु लागले तर ते काय बोलेल किंवा तुम्ही पुस्तकाचे काय बोलणार याविषयी देखील तुमचे मनोगत आम्हाला नक्की कळवा.  ते जाणून घेण्यात आम्हाला आनंदच होईल.  धन्यवाद. 




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने