www.upkarmarathi.com 
       
                       नमस्कार मित्रांनो आज आपण निबंध बघणार आहोत त्याचे नाव आहे  "मी पेन बोलतोय".  
         पेनाचा उपयोग तर आपल्याला दैनंंदिन अभ्यासासाठी होतच असतो . पण पेन बोलूू लागला तर ? तो आपल्याशी काय गप्पा मारेल ? तो त्याचे मनोगत कसे व्यक्त करेल ?  चला तर पाहूया छानसा मराठी निबंध ....




    |  मी पेन बोलतोय |
 किंवा 
 | पेन बोलू लागला तर मराठी निबंध |

                  मी पेन बोलतोय. जेव्हा मी प्रसिद्ध झालो त्याच्या आधी लोक लिहिण्यासाठी पक्ष्यांच्या पिसाचा  व शाईचा वापर करत असत. पण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून लोक माझा वापर करू लागले. 
                  माझा जन्म एका कंपनीत झाला. तेव्हा मी एकटाच होतो जसा माणसाचा जन्म झाला तेव्हा तो एकटाच होता . मग थोड्या काही काळाने त्याची प्रजाती वाढत गेली. तसेच माझे देखील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान माझ्याच मदतीने लिहिले. 
                जिथे शंभर तलवारी काम करत नाही तिथं मी एकटाच धीटपणे उभा राहून ते काम पूर्ण करतो. शाळेत जाणारी मुले देखील माझा वापर करतात. मुले तर सोडाच शिक्षकापासून तर पंतप्रधान पर्यंत  सर्व माझाच वापर लिखाण कामासाठी करतात.
                   माझ्याच मदतीने सुंदर सुविचार लिहिले जातात. माझी  बहिणी सुद्धा आहे . तिचे नाव आहे पेन्सिल. आणि माझा छोटा भाऊ देखील आहे त्याचे नाव आहे खडू. पेना मधून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दाला तलवारी पेक्षाही अधिक धार असते. जगातील मोठमोठ्या क्रांती या पेनाने घडवून आणलेल्या आहेत.
                 अनेक तलवारी जे काम करू शकत नाही ते काम पेन करू शकतो. पेन आकाराने लहान जरी दिसत असला तरी देखील त्याचे काम मात्र फारच मोठे आहे.
                सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे पेन उपलब्ध आहेत. सुंदर सुंदर रंगांमध्ये पेन बघून अभ्यास करायची मनस्थिती निर्माण होते. शाईचे पेन वापरणाराही फार मोठा चाहता वर्ग आहे. शाईच्या पेनमध्ये शाही भरताना लहान मुलांची बऱ्याचदा तारांबळ होते आणि त्याचे हात पाय आणि कपडे सगळेच रंगाने माखून जातात. त्यांची ही तारांबळ बघून मला फारच गंमत वाटते. 
या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात.

  1. | पेनाचे मनोगत 
  2. | पेनाची आत्मकथा
  3. | पेनाची आत्मकथा मराठी निबंध
  4. | Autobiography of a pen Marathi essay
  5. | लेखणीचे मनोगत 
  6. | lekhaniche manogat marathi essay 
खालील निबंधही तुम्हाला आवडतील  ..

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने