1001marathiessay.blogspot.com




|शाळा - समाज - शिक्षक - विद्यार्थी परस्पर संबंध|

  1.    मुलांच्या भाषिक ज्ञानाच्या संचिताचा शाळेमध्ये उपयोग केला तर मुले अधिक वेगाने व उत्तम रीतीने शिकतील. मूल शाळेत येण्याअगोदर बोलायला शिकलेले असते म्हणजेच त्याला अनुभवातून बोलण्याची कला प्राप्त झालेली असते. त्याचे भाषेत ज्ञान किती आहे याचा अध्यापनामध्ये नक्कीच उपयोग आणि विचार केला गेला पाहिजे.
  2. भाषेचा वापर आणि जीवनानुभव यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा.
  3. हाताळून बघायला, मोड- जोड करायला मुलांसाठी वस्तूच नाही अशी शाळा मुलांसाठी योग्य जागा नाही.
  4. ज्या माणसाने लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न मुले करते, त्यांनी ती अपेक्षा पूर्ण केली नाही तर मुलगी कोमजुन जाते.
  5. मुलांची बडबड गाणी गोष्टी भाषेच्या सर्जनशील सळसळत्या रुपाचा दुर्मिळ असा स्त्रोत आहे.
  6. भाषा हे एक विलक्षण लवचिक असे माध्यम आहे जे जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत लागू करता येते.
  7. जिथे लहान मुलांना मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही अशी शाळा काय कामाची ?
  8. सर्जनशील विश्लेषणात्मक पद्धतीने बोलण्यासाठी चित्र हा मोठा स्त्रोत आहे.
  9. चित्र आणि भाषा यांचे जवळचे नाते आहे त्यामुळे भाषा शिक्षकाने चित्रांचा अधिकाधिक वापर करायला हवा.
  10. मुलांच्या भोवताली जे घडते ते मुलांच्या अवधानाच्या चाळणीतून जाते, मुलांच्या भावविश्वाचा भाग बनते.
  11. वाचलेल्या मजकुराचा अर्थ जोपर्यंत मुल लावू शकत नाही तोपर्यंत मुलांचे वाचन निकोप आहे असे म्हणता येत नाही.
  12. शाळेत पुस्तके असणे पुरेसे नाही तर पुस्तके वर्गात असायला हवीत
  13. एकदा का मुलाला वाचता यायला लागले की वेगवेगळ्या उद्देशाने मुलाने वाचत राहायला हवे.
  14. शाळेतील शिक्षण आणि अनुभव हे मुलांच्या शाळेबाहेरील दैनंदिन जगण्यातील अनुभवाशी निगडित असले पाहिजेत.
  15. शाळा व समाज यातील संस्कृतीक तफावत कमी झाली की शिक्षण आनंददायी व अर्थपूर्ण होते.
  16. रचनावादी शिक्षण पद्धतीसाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही.
  17. ज्ञान मातृभाषेतून मिळत असते आणि  ज्ञानावरची विचारप्रक्रिया सुद्धा मातृभाषेतच होत असते.
  18. मुलांच्या नैसर्गिक क्षमता ज्ञान पुढे नेणे अधिक समृद्ध करणे म्हणजे दर्जेदार शिक्षण.
  19. मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणात दर्जेदार शिक्षणाचे सर्व पैलू आढळून येतात.
  20. मातृभाषेचे शिक्षणातून मुलांच्या भावनिक सौंदर्यवादी आणि बौद्धिक क्षमतांचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
  21.  भाषेकडे एक साधन संपत्ती म्हणून पाहावे कारण भाषा अभिव्यक्तीची विविध साधने उपलब्ध करून देत असते.
  22. सामाजिक सलोखा निर्माण करणे टिकविणे आणि वैविद्या जपणे यात भाषेची भूमिका महत्वाची असते.
  23. मुलांवर जबरदस्ती केली नाही तर ती  उत्तम शिकतात.
  24. प्रत्येक मुलाकडे भाषा आत्मसात करण्याची निसर्गदत्त देणगी असते.
  25. आसपासच्या भाषिक वातावरणातून मुले आपसूकच भाषेच्या वापराचे नियम शोधत-शोधत भाषा शिकतात.
  26. विचार न करता वाचन म्हणजे न पचवीत खात सुटणे.
  27. शिक्षणाचे माध्यम पैकी भाषा असेल तर मुलांची  आकलनाची व आत्मविष्कारराची शक्ती कुंठित होते.
  28. माणूस भाषेच्या सहाय्याने विचार करतो कल्पना करतो त्यामुळे भाव-भावनांची अभिव्यक्ती होते.
  29. भाषा हीच माणसाचा प्रगत संस्कृतीचे कारण आहे.
  30. बाहेरून शिस्त लादणे हा शिक्षणाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे.
  31. शिक्षणात आनंद मिळत असेल तर लक्ष लागते लक्ष लागले की लक्षात राहते.
  32. शिकवणे ही शिक्षकांना सोपी वाटणारी गोष्ट विद्यार्थ्यांचे शिक्षणाच्या पातळीवर फार अवघड असते.
  33. लेखन वाचनाबरोबरच एखादी गोष्ट स्वतः करून बघणे अनुभव घेणे महत्त्वाचे असते.
  34. हसू द्या खेळू द्या हसत-खेळत शिकू द्या.
  35. हसत-खेळत उड्या मारत गाणी गुणगुणत नाचत बागडत एकत बोलत हिंडत बघत मुलांना बहरू द्या.
  36. विचार स्वातंत्र्यात मूल जेव्हा निर्भयतेने श्वास घेऊ लागले तेव्हा सर्जनशीलतेचा  होईल.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने