प्रसंग लेखन मराठी, |prasang lekhan in Marathi ,नमुना
प्रसंग लेखन मराठी, prasang lekhan Marathi नमुना

माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग.(|प्रसंग लेखन मराठी, prasang lekhan Marathi नमुना)

|प्रसंग लेखन म्हणजे काय?


  दैनंदिन जीवन जगत असताना आपण विविध लोकांना भेटतो .प्रत्येकाचे गुणवैशिष्ट वेगवेगळे असतात. कुठे फिरायला गेलो तर त्या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या वस्तू बघतो. आपल्या जीवनात सुखदुःखाचे आनंदाचे आणि फजिती चे प्रसंग  घडतात.
       आपल्या सोबत घडलेल्या किंवा आपण  पाहिलेल्या  व्यक्तींचे, वस्तूंचे, घटनांचे हुबेहूब वर्णन इतरांना सांगणे किंवा लिहिणे  याचा प्रसंग लेखनामध्ये समावेश होतो.

प्रसंग (prasang lekhan) लेखन कसे करावे?

      प्रसंग लेखन करताना केवळ घटना लिहिणे किंवा शब्दबद्ध करणे अपेक्षित नाही तर तो प्रसंग ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भावना देखील शब्दांद्वारे व्यक्त करता आल्या पाहिजेत.
    उदाहरणादाखल काही प्रसंग वर्णनाचे नमुने तुमच्यासाठी खाली देत आहे.

   प्रसंग लेखन  नमुना नंबर 1

अशी झाली माझी फजिती


        मी पाचवीत असताना ची गोष्ट आहे. शनिवारचा दिवस होता त्यामुळे सकाळची शाळा होती. इतर दिवशी दुपारची शाळा असते त्यामुळे मी सकाळी आरामात उठतो.शुक्रवारी झोपताना माझ्या लक्षातच राहिले नाही की उद्या सकाळी लवकर शाळेला जायचे आहे.
       शनिवारी सकाळी कवायती चा तास  असायचा. त्या तासाला जो गैर हजर असेल त्याला दंड होत असे. कवायतीचा तास पाटील सर घेत असत.
      पाटील सर म्हणजे आपत्ती ,, अगदी कडक  शिस्तीचे व्यक्तिमत्व. त्यांचा चेहरा खूपच करारी दिसत असे.पण पाटील सरांना हसताना मी आज पर्यंत बघितलेले नव्हते. फारच रागीट वाटायचे मला नेहमी. नेहमी एक गोलाकार अगदी गुळगुळीत सुमारे तीन फुटाची काठी राहत असे. काठीचा रंग
 हळदी सारखा पिवळा होता.  काठी छान चमकत असे. मला तर असे वाटायचे की सरांनी हे काठी तेल आणि हळद लावून चांगली चकचकीत केलेली आहे.
        शनिवारी सकाळी साडेसात वाजता शाळा भरत असे. सात वाजले तरीही मी गाढ झोपलेला होतो. तितक्यात आईने मला उठवण्यासाठी आवाज दिला. माझी आई पण जरा गमतीदार व्यक्तिमत्व आहे. आई मला म्हटली,"अरे विजू आज शनिवार आहे बेटा पाटील सर आलेत बघ तुला शाळेत न्यायला."आईचे हे शब्द कानावर पडताच जशी लोकांच्या पायाखालची जमीन सरकून जाते तसा माझ्या अंगा खालून पलंग सरकून गेला.
          घाईघाईने अंगावरची गोधडी काढून फेकली.दात घासण्याचा ब्रश ला दुरूनच राम-राम केला आणि अंघोळीच्या खोलीत घुसलो. नळ चालू केला . आज तर मला गरम पाण्याची आठवण सुद्धा आली नाही. मधेच अचानक पाटील सर साबण घेऊन बाथरूम मध्ये उभे आहेत .असे मला वाटत होते.लगेच मनाची समजूत घातली अरे वेड्या पाटील सर आमच्या घरात ,माझ्या बाथरूममध्ये माझ्या साठी आंघोळीचा साबण घेऊन कोपऱ्यात कसे उभे राहतील?
       दहा मिनिटातच आंघोळ करून मी शाळेत जाण्यासाठी तयार झालो.काल अभ्यासासाठी बाहेर काढलेली वही पुस्तके घाईघाईने दप्तरात कोंबली आणि शाळेच्या दिशेने सुसाट सुटलो. आज माझा शाळेत जाण्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही दुप्पट आहे असे मला वाटत होते.
          जसे भक्ताला चराचरामध्ये भगवंताचे दर्शन होत असते तसे मला सर्वत्र हनुमानाच्या वेशात पाटील सरांचे दर्शन घडत होते आणि त्यांची ती पिवळी काठी त्यांनी खांद्यावर सुवर्ण गदेसारखी धारण केलेली भासत होती.
        घाईघाईने शाळेत पोहोचलो पण व्हायचा तो उशीर झालाच होता. शाळेचे गेट बंद करून तिथे पाटील सर उभे होते. मला बघताच सरांनी कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांच्या मागच्या रांगेत मला उभे राहायला सांगितले.मी श्रावण बाळासारखा मागच्या रांगेमध्ये जाऊन शांतपणे उभा राहिलो आणि सरांच्या काठीचा प्रसाद कधी मिळेल याची वाट बघत राहिलो.
        काही वेळाने पाटील सर आत आले व माझ्यासह आणखी चार-पाच उशिरपटूना  बघून प्रसाद द्यायला सुरुवात केली.माझा नंबर आला तेव्हा सरांनी छडी देण्यासाठी काठी उगारली आणि माझ्या तोंडून जोरात आई ग अशी आरोळी बाहेर पडली. सरांनी छडी न देताच मला विचारले तुझ्या पायातील बूट कुठे आहे? मी बघितले तर माझ्या फक्त एकाच पायात बूट होता दुसऱ्या पायात फक्त पायमोजा घातलेला होता.
       घाई घाईत मी फक्त एकच बूट घालून घरातून शाळेच्या मोहिमेवर निघालेलो होतो.सरांना सांगितले सर तुमच्या भीतीमुळे घाईघाईने येताना माझा बूट शाळेजवळ निघून पडलेला आहे.  निरागस पणाचा आव आणत मी म्हटले सर मी... मी ...बूट घेऊन येऊ का? सरांनी होकार देताच मी वाऱ्याच्या वेगाने निघालो गेट जवळ ठेवलेले दप्तर उचलले आणि  थेट घर गाठले.
       घरी बूट त्याच्या नेहमीच्या जागेवर आरामात विश्रांती घेत होता. मी  दप्तर ठेवले आणि आईजवळ गेलो. आईला सगळा प्रसंग  सांगितला. व आता शाळेत जाणार  नाही असे सांगून मी माझ्या खोलीत निघून गेलो.
    दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती. सोमवारी मात्र आईला शाळेत घेऊन जायला मी अजिबात विसरलो नाही. आईला घेऊन गेल्यामुळे माझी शिक्षा वाचली पण माझी झालेली फजिती माझ्या आज पर्यंत लक्षात आहे.

      असे अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये हे घडलेले आहेत. बरेचसे शनिवारी घडलेले आहेत. या सर्वांमुळे शनिवार हा माझ्या जीवनातील लक्षात राहणारा वार आहे.

     तुम्हाला जर असेच अजून मजेशीर प्रसंग वाचायचे असतील तर मला तशी कमेंट करा. तुमच्या जीवनात घडलेले अविस्मरणीय प्रसंग कोणते किंवा गमतीशीर प्रसंग  कोणते हे देखील तुम्ही मला कमेंट करुन सांगा. मलाही ते वाचायला खूपच आवडेल.

प्रिय मित्रांनो तुम्हाला हे ,प्रसंग लेखन मराठी, prasang lekhan Marathi नमुना कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.

       असाच माझ्या जिवनात घडलेला अजून एक प्रसंग खाली दिला आहे नक्की वाचा.
1)prasang lekhan in marathi 10th class
2)prasang lekhan in marathi example
3) प्रसंग लेखन इयत्ता नववी
4) प्रसंग लेखन इयत्ता दहावी 
5) prasang lekhan in marathi topics
6) prasang lekhan marathi maze balpan
7) prasang lekhan in marathi 9th class

 प्रसंग लेखनासाठी तुम्हाला खालील विषय महत्त्वाचे व मार्गदर्शक ठरतील.(prasang lekhan in marathi topics)
१) प्रसंग लेखन मी पाहिलेला पूर
२) प्रसंग लेखन मराठी कौतुक सोहळा
३) प्रसंग लेखन मराठी मी पाहिलेला अपघात
४) प्रसंग लेखन माझे बालपण

   प्रिय वाचक मित्रांनो आजच्या लेखात आपण प्रसंग लेखन मराठी|prasang lekhan in Marathi याविषयी थोडक्यात जाणून घेतले. त्याबरोबरच प्रसंग लेखनाचे मुद्दे|prasang lekhan tips, prasang lekhan Marathi namuna|prasang lekhan in Marathi topics याबद्दल माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री वाटते. आमच्या www.upkarmarathi.com ला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, पुन्हा अवश्य भेट.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने