1001marathiessay.blogspot.com
     
     आपण ज्या गावात जन्माला येतो किंवा ज्या गावात आपण लहानाचे मोठे होतो त्या गावाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना असतेच. माझ्या मनातही माझ्या गावाविषयी अशीच भावना आहे. तीच भावना या निबंधा मधून मी व्यक्त करत आहे. मित्रांनो तुम्हीही माझे गाव  निबंध नक्की वाचा व तुम्हाला तुमच्या गावाविषयी वाटणाऱ्या भावना देखील मला कळवायला विसरू नका.
       आम्हाला तुमचे सगळ्यांचे विचार आणि भावना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. चला तर मग बघुया एक छानसा निबंध माझे गाव.



माझे गाव मराठी निबंध
Maze gav Marathi nibandh

 माझ्या गावाचे नाव पिंपळनेर आहे.महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात वसलेले माझे पिंपळनेर गाव मला खूप आवडते. याच माझ्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो. इतक्या इथल्या रस्त्यांवर खेळलो. उनाड सारखा फिरलो आणि  दंगामस्ती करत मोठा झालो.
       माझे गाव  पांझरा नदीच्या तीरावर वसलेले आहे. पिंपळनेर पासून सुमारे वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर पांझरा नदीचा उगम आहे. नदी वरती लाटीपाडा नावाचे धरणही बांधलेले आहे. पांझरा ही बारमाही नदी आहे. या नदीमुळे माझे गाव पिंपळनेर सतत सदाहरित राहते. लाटीपाडा धरण हे गावातील प्रेक्षणीय ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे .अनेक लोक त्या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी जातात.मेही सकाळी व्यायाम करण्यासाठी धरणावर जातो . सकाळचा सूर्योदय बघून मन अगदी आनंदी होऊन जाते आणि दिवसभराच्या कामासाठी प्रचंड ऊर्जा मिळते.
      सकाळच्या प्रसन्न समयी ज्यावेळी पूर्व दिशेकडून सूर्याचे बिंब हळूहळू वर सरकू लागते तस-तशी संपूर्ण लालिमा धरणाच्या पाण्यावर पसरते. सूर्याच्या बिंबा पासून तर आम्ही उभा असतो त्या काठापर्यंत सूर्याची एक सरळ केशरी रंगाची प्रतिमा पाण्यामध्ये दिसते.त्यावेळी ते दृश्य बघून माझ्या मनात सतत एक भावना येत असते की, जगात कोणीही कितीही उत्कृष्ट चित्रकार असेल परंतु निसर्गापुढे सगळे चित्रकार केवळ तुच्छ ठरतात.
          माझ्या गावांमध्ये शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी बागायतदार शेतकरीही मोठ्या प्रमाणात आहेत. शेतामध्ये ऊस गहू बाजरी तांदूळ हे पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात.  फार मोठा शेतकरी वर्ग भाजीपाला देखील करतो. शेतकरी वर्गाला फार मोठी बाजारपेठ गावातच उपलब्ध असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नेहमी खुश असतो आणि शेतकरी म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा. तो खुश असला म्हणजे सगळेच खुष असणारच ना!
        माझ्या गावाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे. आमच्या गावांमध्ये वर्षभर विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम चालूच असतात. गावामध्ये विठ्ठल मंदिर बालाजी मंदिर, मुरलीधर मंदिर कालिका माता मंदिर एकवीरा देवी मंदिर शनी मंदिर हनुमान मंदिर आशा बऱ्याच प्रकारच्या या मंदिरांची स्थापना केलेली आहे. या सर्व मंदिरांमध्ये वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. रामनवमी हनुमान जयंती,  नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण अशा हीच कार्यक्रमांची सतत रेलचेल असते.
       माझे गाव शिक्षणाच्या बाबतीतही बऱ्याच अंशी स्वतःच्या पायावर उभे आहे.गावामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत .त्यामध्ये गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये चांगले शिक्षण घेत आहे. शिशु वर्गापासून तर उच्च शिक्षणापर्यंत चे शिक्षण गावांमध्ये उपलब्ध आहे. बाजारपेठ आणि मध्यवर्ती गाव असल्यामुळे माझ्या गावात आजूबाजूच्या खेड्यावरील खूप विद्यार्थी शिकण्यासाठी येतात.
        आमच्या गावातील खूप विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन अनेक जिल्ह्यांमध्ये उच्च पदावर नोकरीला आहेत. स्पर्धा परीक्षांविषयी देखील युवक वर्ग जागरूक होताना दिसतो आहे बऱ्याच युवकांनी स्पर्धा परीक्षा पास करून चांगले पद मिळवलेले आहे.
         संपूर्ण गावाची एकूणच सामाजिक आणि भावनिक ठेवण अत्यंत मदतीची व सहकार्य वृत्तीची आहे. गावांमध्ये कोणतीही विधायक काम अथवा उपक्रम होत असेल तर संपूर्ण गाव त्यामध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेते. गावची लोकसंख्या वीस ते पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे. टक्के लोकसंख्या असून देखील भांडण-तंटे होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे सगळे लोक अगदी प्रेमाने आणि आनंदाने मिळून मिसळून राहतात.
        गावाच्या बरोबर राष्ट्रीय महामार्ग जातो. मार्गावर गाव असल्यामुळे गावात विविध उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी गाव फारच सोयीस्कर आहे. आजूबाजूच्या गावातील अनेक लोक व्यवसायानिमित्त आमच्या गावा मध्ये आलेले आहेत. इथे चांगला जम बसल्यामुळे ते येथेच स्थायिक झालेले आहेत. उद्योगधंद्यांची भरभराट फार वेगाने होत आहे.
     अध्यात्मिक व्यवसायिक आणि औद्योगिक प्रगतीपथावर अग्रेसर असताना देखील आमच्या गावातील लोक मात्र जमिनीवरच पाय ठेवून आहेत. एकमेकांशी सहकार्य भावनेने वागणे ते कधीही सोडत नाहीत. या मुळेच माझे गाव मला आदर्श गाव वाटते.

.............. धन्यवाद.


प्रिय मित्रांनो तुम्हाला हा माझे गाव मराठी निबंध कसे वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही तुमच्या गावाविषयी माहिती सांगायची असेल तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील,   तर आम्हाला नक्की कळवा. ब्लॉग वरील कॉन्टॅक्ट या पेजला भेट व त्या ठिकाणी तुमचे मत नोंदवा.  


  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  19. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  20. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  21. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  22. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  23. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  24. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  25. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  26. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  27. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  28. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  29. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  30. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  31. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  32. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने