1001marathiessay.blogspot.com
     


Janaseva hich Khari Ishwarseva
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मराठी कल्पनाविस्तार
       जनसेवा हीच ईश्वर सेवा असे बोलणे किती सोपे वाटते ना ! हे वाक्य ऐकून बऱ्याच जणांचे आयुष्य देखील संपले ,परंतु त्यांच्या हातून जनसेवा काही घडली नाही.
       इतरांची सेवा करणे ही भावनाच मुळात किती पवित्र आहे.सर्वात प्रथम सेवा म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या कृतीमुळे एखाद्या गरजवंताला व दुखी याला आधार आणि आनंद मिळतो मिळतो त्या सर्व कृतींना सेवा असे म्हणता येईल. सेवा केवळ पैशांच्या आधारानेच करता येते हा एक चुकीचा समज आहे.पैसे नाहीत असे सांगून कोणीही पळवाट काढू शकत नाही. बाबा आमटे, प्रकाश आमटे, मेधा पाटकर अशी कितीतरी माणसे पैशाने व्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा अनेक गरजवंतांना देत आहेत.
कोणत्याही चांगल्या आणि विधायक कार्याला हातभार लावणे व मदत करणे ही देखील एक  प्रकारची सेवाच आहे.
     आपल्या भारत देशाला अत्यंत समृद्ध संत परंपरा आणि  सामाजिक , आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. अनेक संत महंत यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा  आहे असे सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच तर असे म्हटले जाते की,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
 देह कष्टविती परोपकारे
  म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी जे स्वतःचा देह झिजवत आहेत ,  कष्टवित आहेत त्यांनाच संत असे म्हटले जाते.
        साने गुरुजींनीही आपल्याला अशी शिकवण दिली की ,खरा धर्म म्हणजे जगाला प्रेम अर्पण करणे होय.चंदन ज्याप्रमाणे स्वतःचा देह झिजवून  इतरांना सुगंध देते अगदी त्याचप्रमाणे जनसेवेचे व्रत उचलणाऱ्या ने स्वतःचा देह झिजला तरीदेखील या व्रतपासून मागे फिरू नये. अशी शिकवण आपल्याला संत साहित्यातून मिळते.
        विविध समाजसेवक फक्त स्वतःचे नाव होण्यासाठी आणि कीर्ती मिळवण्यासाठी जनसेवा करत असल्याचा देखावा करतात. अशी दिखाऊ  सेवा कधीही फलद्रूप होत नाही.जिथे खरोखर सेवेची आणि मदतीची गरज आहे त्या ठिकाणी मदत न करता जिथे आपला उदोउदो होईल व जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळेल अशा ठिकाणी स्वतःहून मदत करण्यासाठी जातात. अशी सेवा केवळ वांझ ठरते. अशा स्वार्थी सेवेतून ईश्वरप्राप्ती कशी होणार.
      देवळातल्या दगडाच्या मूर्तीची सेवा करण्यापेक्षा माणसा माणसातल्या खऱ्या देवाची सेवा करण्यातच खरी धन्यता आहे. असा  सेवाभाव नसेल तर ही सेवा फलद्रूप कशी होणार. अशी  सेवा फलद्रूप होण्याची अपेक्षा करणे म्हणजे बाभळीच्या झाडाला गोड आंबे लागण्याची वाट बघण्यासारखे आहे
.
        सध्याच्या काळातही काही संस्था व समाजसेवक जन- माणसातच देव बघून समाजसेवेचे व्रत आचरतात आहेत. नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, मदत संस्था  यांसारख्या संस्था गरजवंतांना मदत करत आहेत त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहत आहेत. स्वतःभोवती प्रसिद्धीचे वलय असलेले नाना पाटेकर, सोनी सुद, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार, आमिर खान असे लोक आपल्या प्रसिद्धीचा आणि पैशांचा जनकल्याणासाठी उपयोग करत आहेत . त्यांनाच खरं तर जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हेच सूत्र समजले असे म्हणावे  लागेल.
   जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन हसवावे 
    जगाला प्रेम अर्पावे
 असे सांगून साने गुरुजी जणूकाही ईश्वर सेवा म्हणजेच जनसेवा एक गुपितच आपल्याला सांगत आहेत. जगामध्ये  पतित आणि दुःखीकष्टी लोक आहेत त्यांच्या दुःखाचा नाश करणे हे जणू आपले कर्तव्यच आहे.
   जन्मताच अनेकांना शारीरिक व मानसिक व्याधी असतात ते लोक आपले दैनंदिन कार्य चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीत तर आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा  भाग दूरचा आहे.अशांच्या जीवनामध्ये आपण आनंद निर्माण करू शकलो तर, आपल्या मानवी जीवनाचे सार्थक आहे आणि आपल्याला याच जीवनामध्ये भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही.
         अनेक ऋषीमुनी ईश्वराच्या शोधामध्ये जंगलांमध्ये आणि  कड्या कपाऱ्यात तप करत बसतात. पण स्वतःच्या अंतरंगात आणि माणसामाणसांमध्ये आत्म रूपांनी राहणाऱ्या ईश्वराचे दर्शन त्यांना होत नाही.
शोधिसी मानवा 
राउळी मंदिरी
 नांदतो देव हा
 आपल्या अंतरी
        चला तर मग आता पासून एक संकल्प करूया माणसामाणसातील नाती जपुया एकमेकांना मदत करूया आपल्याला जे शक्य जसे शक्य होईल त्या पद्धतीने इतरांच्या कामी येण्याचा प्रयत्न करूया.
        गाडगे बाबांचे एका गावांमध्ये कीर्तन होते.लोक आतुरतेने गाडगेबाबांची वाट बघत होते. बराच वेळ झाला तरीदेखील गाडगेबाबा आले नाही. काही वेळाने एक बातमी घेऊन आला की गाडगेबाबा नदी जवळ बसलेले आहेत. सगळे लोक पळत पळत गाडगेबाबांजवळ गेले आणि सांगू लागले की, बाबा भजनासाठी चला , वेळ होत आहे त्यावर गाडगे बाबा म्हणाले की मी तर भजन  करत आहे. लोकांनी बघितले तर गाडगेबाबा एका कुष्ठरोग्याला आंघोळ घालत होते. बाबा म्हणाले दीनदुबळ्याचा जो भार वाहतो  तो ईश्वराची सेवा करत असतो .देवळात जाऊन  भजन करत बसण्यापेक्षा दुःखितांची सेवा करणे हेच खरे भजन .
......... धन्यवाद...
       

         प्रिय मित्रांनो तुम्हाला वरील जनसेवा हीच ईश्वर सेवा हा कल्पना विस्तार कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
         


 1. अति तिथे माती
 2. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
 3. माझे आवडते शिक्षक my TVfavourite teacher Marathi essay
 4. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
 हे निबंधही वाचा .
  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
  20. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  21. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  22. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  23. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  24. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  25. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  26. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  27. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  28. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  29. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  30. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  31. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  32. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  33. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने