1001marathiessay.blogspot.com

     माणसाला ज्या गोष्टी खऱ्या आयुष्यामध्ये करणे शक्य होत नाही ,त्या गोष्टी मनुष्य कल्पना विश्वामध्ये सहज रित्या करू शकतो. कल्पना विश्वामध्ये आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या मनात ठेवून जे निबंध लिहिले जातात ,त्यांना कल्पनात्मक निबंध म्हणतात.
      अशा निबंधांमध्ये आपल्या कल्पनांना मुक्त वाव असतो. आपल्याला ज्या आणि जशा कल्पना सुचतील ते आपण अशा प्रकारच्या निबंधांमध्ये लिहू शकतो. त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. चला तर मग बघुया एक छानसा गमतीदार कल्पनात्मक निबंध मला लॉटरी लागली तर..


.........................................

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
Mala lottery lagali tar Marathi nibandh

          मी नेहमी अशी कल्पना करतो की मला लॉटरी लागली तर किती मजा येईल. मला लॉटरी लागली तर सगळ्यात पहिले मी मस्त पैकी एक बँड बाजा आणूून  नाचत गाजत गावातून मिरवणूक काढून घेईल. राजा महाराजां सारखा हत्तीवरून मिरवणूक काढताना सगळ्या गावात पेढे वाटेल.
          माझ्या आईवडिलांनी आजपर्यंत माझ्या शिक्षणासाठी व माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले आहे.मला लॉटरी लागली तर मी माझ्या आई-वडिलांना कुठेही बाहेर कष्ट करण्यासाठी जाऊ देणार नाही . त्यांची खूप काळजी घेईन. आईसाठी मी सुंदर पैठणी साडी घेईन व एक कपाट घेऊन त्या कपाटात कपाटात आईच्या आवडीच्या विविध रंगाच्या साड्या भरून देईन. वडीलांसाठी मस्तपैकी धोतर जोडा घेईन. जरीचा पटका त्याला सोनेरी काठ असलेला छानसा मस्तपैकी घेईन. दोघांचा चांगला  राजा महाराजांसारखा एक छानसा फोटो काढून मोठा तयार करेन आणि घराच्या भिंतीवर लावेल.
        आईच्या आणि वडिलांच्या नावावर बँकेमध्ये काही रक्कम ठेवून देईल. म्हणजे भविष्यामध्ये पैशाची चिंता राहणार नाही. एखादं छानसं टुमदार घर विकत घेईन त्याच्यासमोर लावण्यासाठी छोटीशी गाडी देखील घेईन. आता मला गाडी चालवता येत नाही म्हणून गाडी बरोबरच एक मस्त सायकल सुद्धा घेईन म्हणजे माझा व्यायाम पण होईल आणि माझं शरीर चांगलं राहील.
       आमच्या गावातील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर म्हणजेच मुरलीधर महाराजाचे मंदिर माझे आवडीचे ठिकाण आहे. त्या मंदिराचे छानसे बांधकाम करण्यासाठी मी पैसे नक्की देईन व माझ्या आवडीचा रंग देखील देईन. मंदिरामध्ये महिन्यातून एकदा सत्यनारायणाची पूजा द्यायला मी विसरणार नाही.
       माझ्या सर्व मित्रांना घेऊन मी छानशा हॉटेलमध्ये जेवण करायला जाईल  आणि माझ्या मित्रांना थोडे पैसे पण देईन.शेवटी माझे मित्र आहेत ते म्हणून मी त्यांना मदत तर करेनच. अमर नावाचा माझा एक मित्र खूपच गरीब आहे पण तो खूप हुशार आहे. त्याचे आई वडील मोलमजुरी करतात. म्हणून मी अमरला शिक्षणासाठी चांगली मदत करेन. त्याच्या आई-वडिलांनाही छान ड्रेस घेऊन देईन.
       लहान मुलांना खेळण्यासाठी आता मैदाने उरलेलेच नाहीत. मुळे आमच्या घराजवळच असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मी मुलांसाठी छोटीशी बाग तयार करीन. त्यामध्ये अनेक झुले ,गोल- गोल फिरणारे खेळणे, हत्ती, घोडे यांचे खेळणी बसवीन. म्हणजे मुलांनादेखील छान करमेन आणि मुलांना खेळताना बघून मला माझ्या पैशांचा काहीतरी उपयोग झाला असे वाटेल.


  1. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
  20. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  21. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  22. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  23. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  24. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  25. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  26. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  27. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  28. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  29. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  30. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  31. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  32. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  33. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.


       
       

     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने