1001marathiessay.blogspot.com




माझे घर मराठी निबंध 
/ Marathi essay on my home

      नमस्कार प्रिय मित्रांनो . आम्ही 1001marathiessay.blogspot.com आज तुमच्यासाठी माझे घर हा मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. प्रत्येकाचे स्वतःच्या घराबद्दल काहीतरी स्वप्न असतेच. त्या घराचे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतेच . असाच एक छानसा निबंध आता आपण बघू. माझे घर.
   आशा आहे की तुम्हाला हा निबंध नक्कीच खूप आवडेल. ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

     माझे घर / my home /my house 
        
         प्रत्येकाला आपल्या घराविषयी आवड आणि प्रेम असते. मलाही माझे घर खूप खूप आवडते.
        माझ्या घराचे नाव आहे  नाथ सदन. आमच्या घरातील सर्वांची नवनाथ या देवतांवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे बाबांनी घरावर नाथ सदन असे नाव टाकलेले आहे. आमचे हे घर खूप आवडते.
       आमचे घर  दोन मजली आहे. घरामध्ये हे माझे आई - बाबा आणि आजी- आजोबा व मी असे पाच जण राहतो. आमच्या घरातील वातावरण फार आनंददायक असते. 
        घरात प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला देवघर आहे. देवघरामध्ये सतत तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवत असतो. सतत सुगंधी अगरबत्ती देवासमोर चालू असतात, त्यामुळे घरात प्रवेश करताच सुगंधामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

Marathi essay on my home in Marathi


         प्रत्येकाला झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. माझी अभ्यासाची खोली दुसऱ्या मजल्यावर आहे. तिथे माझा अभ्यासाचा टेबल सुद्धा ठेवलेला आहे. या खोलीतच मी माझा सर्व अभ्यास पूर्ण करतो. वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तके सुद्धा वाचतो. टेबलाला लागूनच माझे कपाट आहे. त्या कपाटामध्ये माझे सगळे पुस्तके व्यवस्थित रचून ठेवलेली आहेत.
        माझे घर फार मोठे नाही पण फार छोटे ही नाही . अगदी आम्हाला सर्वांना साजेसे आटोपशीर आणि टुमदार असे घर आहे. घराला प्रत्येक खोलीला एक एक खिडकी आहे.या खिडक्यांमधून भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा आत येते म्हणून नेहमी ताजेतवाने वाटते.
         पतंगाच्या दिवसांमध्ये मी आणि माझे सर्व मित्र आमच्या घराच्या गच्चीवरून खूप पतंग उडवतो. पतंग उडवताना आम्हाला खूप मजा येते. उन्हाळ्यामध्ये आम्ही गच्चीवर झोपतो. आमच्या आनंदात आहे घरामध्ये पाहणेही भरपूर येतात आणि आनंदाने राहतात.
          माझ्या घरासमोर एक पतीशी बनवलेली आहे . यामागे मध्ये  मोगरा, जाई , गुलाब अशी फुलझाडे लावलेली  आहेत. एक कढीपत्त्याचे झाड देखील लावलेले आहे. परीक्षेच्या दिवसांमध्ये मी कढीपत्त्याच्या झाडाखालीच अभ्यासाला बसतो. अभ्यास करताना मध्येच फुलांचा छान सुगंध येतो त्यामुळे मन प्रसन्न होते आणि माझा अभ्यास पण चांगला होतो.
My house Marathi essay

        अशा आमच्या या सुंदर घरांमध्ये आमचे हे छोटे कुटुंब अगदी आनंदात राहते. मला आमच्या घरामध्ये वेळ  घालवायला खूप खूप आवडते.

.................... समाप्त.................

    माझी खात्री आहे की तुम्हाला माझे घर मराठी निबंध नक्की आवडेल.तुमचेही घर असेच छान सुंदर असेल तर तसे कमेंट करून आम्हाला नक्की सांग आता. 
    तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर कमेंट करुन सांगा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद.



हे निबंध वाचायला विसरू नका...


  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने