1001marathiessay.blogspot.com

mi pahilela apghat essay in marathi
accident I saw Marathi essay | mi pahilela apghat essay in marathi


मी पाहिलेला अपघात मराठी निबंध 

| accident I saw Marathi essay 

| mi pahilela apghat essay in marathi

          आपल्या जीवनात अनेक प्रसंग घडतात त्यातील काही चांगले तर काही वाईट असतात अर्थातच प्रसंग चांगला की वाईट हे बऱ्याच वेळा परिस्थितीवरून ठरत असते . म्हणजे बघा ना एखादा म्हातारा किंवा म्हातारी वृद्धापकाळाने जर्जर झालेली असेल आणि त्याचे अतोनात हाल होत असतील . अशा वेळी ती व्यक्ती जर कुठे पाय घसरून पडली आणि त्या  व्यक्तीचा मृत्यू झाला . तर त्या व्यक्तीबरोबर चांगले झाले की वाईट हे सांगणे फारसे सोपे नाही. असे अपघात होतच राहतात, पण आपण घाबरू नये.प्रसंगांना सामोरे जावे आणि त्यातून पुढे आयुष्य जगत जावे. हीच तर मानवी जीवनाची खरी गंमत आहे . जीवन कधीही थांबत नाही . ते  वाहतच असते एखाद्या नदीप्रमाणे.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay 


       असाच एक अपघात माझ्या बघण्यात आला . तो अपघात नेहमी माझ्या लक्षात राहील .या अपघातातून मी एक गोष्ट शिकलो की, अपघात हा फक्त स्वतःच्या चुकीमुळे होत नाही , तर समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळेही अपघात होतात . आपण सर्व रहदारीचे नियम पाळून वागणे . हे आपल्या हातात आहे . त्यामुळे अपघात होण्यापासून आपण स्वतः चा व इतरांचाही बचाव करू शकतो.

                                                      मी पाहिलेला अपघात मराठी निबंध

       मला आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो . . शनिवारची शाळा होती . सकाळी शाळा भरल्यामुळे बारा वाजता शाळा सुटली. पप्पा नेहमीप्रमाणे मला घेण्यासाठी शाळेत आले होते . आमची शाळा मुख्य रस्त्याच्या बाजूला  असल्यामुळे गाड्यांची फार गर्दी असते. माझे वडील नेहमी मला घेण्यासाठी येत असत.

       शाळा सुटल्यानंतर मी उड्या मारतच शाळेच्या गेटमधून बाहेर आलो . पप्पा माझी वाट बघत थांबले होते. मी गाडीवर बसलो आणि आम्ही गप्पा मारत निघालो . पप्पा पूर्णपणे लक्ष समोर ठेवून गाडी चालवत होते. मी मात्र मागून खूप बडबड करत होतो . माझ्या प्रश्नांना पप्पा उत्तरे देत होते , परंतु मागे बघून किंवा इकडे-तिकडे बघून नव्हे तर समोर लक्ष ठेवून. पप्पा अधून मधून मला सांगत होती की , गाडी चालवताना नेहमी समोर लक्ष ठेवावे. इकडे तिकडे बघितल्याने आपले लक्ष विचलित होते , आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.

       आमच्या अशा गप्पा चालू असतानाच,  अचानक एका दुचाकीवर तीन तरुण बसलेले होते आणि भरधाव वेगाने ते आम्हाला ओलांडून पुढे गेले . ज्यावेळी ते आमच्या जवळून गेले त्यावेळी हवेचा मोठा  झोत आमच्या अंगावर आला . माझ्या अंगावर शहारे आले. ती गाडी इतक्या वेगाने आमच्या जवळून गेले की वाऱ्याच्या या झोताने गाडी देखील थोडीशी हलली.

        माझे पप्पा मला म्हणाले, या मुलांचे आज काही खरे दिसत नाही. आम्ही मात्र तसेच आमच्या ठरलेल्या वेगाने पुढे पुढे जात होतो . आमच्या समोरच असणाऱ्या ट्रॅक्टरला ओलांडून ते तरुण पुढे गेले . खो- खो खेळताना जसा पळणारा खेळाडू बसलेल्या खेळाडूंच्या मधून कौशल्याने पुढे जात असतो, तसा तो दुचाकी चालवणारा तरुण  रस्त्यावरच्या गाड्यांच्या आजूबाजूने गाडीने नेत होता . रहदारीचे नियम जणू विसरुनच गेला होता.

      मी उंच होऊन पप्पांच्या मागून त्या दुचाकीस्वारांची गंमत बघत होतो. तितक्यात  समोरून एक ट्रक मोठ्या वेगाने येत होता. दुचाकीस्वार ट्रकच्या बाजूने गेला . परंतु  मागेच असलेल्या रिक्षाचा त्याला धक्का लागला. अर्थात चूक तरुणांची होती . रिक्षाचा धक्का लागल्याबरोबर तिघेही तरून गाडी सह दूर फेकले गेले . गाडी घसरत रस्त्याच्या दिशेने गेली . त्यातील एका तरुणाचे रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर डोके आपटले.

      गाडी चालवणारा तरुण गाडी बरोबर दूरपर्यंत फरपटत गेलेला होता . त्याचे सर्व अंग सोलून निघाले होते. तो वेदनेने कण्हत होता. तोपर्यंत आम्ही त्या जागेपर्यंत जाऊन पोहोचलो . बघ्यांची गर्दी जमा झालेली होती . 

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay 


     लोक धावत-पळत अपघात बघण्यासाठी येत होते . काहीनी त्या तरुणांना उचलले . सुदैवाने कोणाचाही जीव गेलेला नव्हता. पप्पा ने लगेच स्थानिक सरकारी दवाखान्यांमध्ये फोन लावून अपघाताची सूचना दिली . काही वेळातच त्या ठिकाणी रुग्णवाहिका दाखल झाली व त्या तीनही तरुणांना घेऊन गेली.

        दुसऱ्या दिवशी तपास केल्यानंतर आम्हाला कळले की तिनही तरुण सुरक्षित आहेत. काही दिवसांचा आराम केल्यानंतर ते पूर्ववत होऊन जातील . पप्पांकडून हा निरोप ऐकल्यावर मला बरे वाटले , परंतु या अपघातानंतर ते तरुण योग्य शिकवण घेतील अशी आशा बाळगतो.     

     हा प्रसंग इतका पटकन घडून गेला की, कुणालाही समजण्याच्या आतच सर्व घटना घडून गेलेली होती. यातून मात्र मी शिकवण घेतली कि ,  रहदारीचे नियम पाळा आणि अपघात टाळा. आपल्या घरी आपले प्रिय माणसे आपली वाट बघत असतात याचे भान ठेवावे आणि मगच वाहन चालवावे. आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.


      वरील मी पाहिलेला अपघात मराठी निबंध (accident I saw Marathi essay | mi pahilela apghat essay in marathi ) तुम्हाला कसा?  वाटला हे कमेंट करून नक्की सांगा .तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे .त्यामुळे आम्हाला पुढील निबंध लिहीण्यासाठी प्रेरणा मिळत राहील .
     खूप खूप धन्यवाद.


 अजून असे खालील कल्पनाविस्तार  वाचायला विसरू नका .
 1. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
 2. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
 3. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
 4. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
 5. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
 6. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
 7. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
 8. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay


या ब्लॉगवरील अजून काही वाचा 
 1. शालेय जीवनात खेळाचे महत्व
 2. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
 3. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
 4. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
 5. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
 6. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
 7. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
 8. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
 9. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
 10. बालपण /रम्य ते बालपण
 11. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
 12. माझी आई - माझा छोटासा निबंध
Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने