आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा घडते आणि मग नंतर आपल्याला त्याचा सराव होत जातो. अनेक चढ-उतारांच्या प्रसंगांनी मानवाचे जीवन भरलेले असते. मिश्र स्वरूपाच्या अनुभवाने मनुष्य विकसित होत जातो.
      असाच मी माझ्या जीवनात केलेला पहिला बस प्रवास तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतरही केलेला बस प्रवास यातील काही प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघू एक छानसा निबंध माझा बस  प्रवास.
        

............................................................................

      

             माझा बस प्रवास


      नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय. मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर या गावात राहतो. माझ्या आजीचे गाव तहाराबाद .ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.
       वडील नोकरीला असल्यामुळे मुळगाव तहाराबाद येथे राहत नाही . त्या गावापासून  तीस किलोमीटरवर असलेल्या पिंपळनेरला आम्ही राहतो. ज्या वेळेस आम्हाला गावी जायचे असते त्यावेळेस आम्ही आमच्या दुचाकीने जातो. दुचाकीच्या मोकळ्या वातावरणामध्ये प्रवास करताना खूप मजा यायची ा वाऱ्यामुळे केस भरपूर  उडायचे डोळ्यांना गार हवा लागून डोळ्यांमधून पाण्याच्या धारा  वहायच्या. बऱ्याचदा डोळ्यातून वाहिलेल्या पाण्याच्या धारा सुकून जायच्या. सुकलेल्या अश्रूंच्या धारांच्या पांढऱ्या रेखा कानापर्यंत वाहिलेल्या असायच्या. त्या रेखा बघून आजी म्हणायची, बाळा आज चष्मा घालून आलास मग मला समजायचे आणि मग मी चेहरा  धुवायचो.
           
        रस्त्याने जाताना भरपूर वाहन दिसायची ट्रक, असायच्या ट्रॅक्टर ,मालगाड्या, जीप्स, रिक्षा. हे सर्व वाहने बघून फार मज्जा वाटायची. मी वडिलांना सारखं विचारायचं ,"पप्पा ही गाडी कोणती? या गाडी ला काय म्हणतात ?या गाडीचं नाव काय?" असे अनेक प्रश्न विचारून मी वडिलांना भंडावून सोडत असे. वडीलही मात्र माझ्या प्रश्नांची फारच प्रेमाने उत्तर देत.
        या सर्व वाहनांमध्ये मला सर्वात जास्त आकर्षण वाटायचे ते सरकारी बसचे .जिला आपण प्रेमाने एसटी बस म्हणतो. एसटीचा लाल रंग लक्ष वेधून घेतो. समोरून एसटी येताना बघून तिचा रुबाब नजरेत भरतो .मोटरसायकल च्या समोर एसटी म्हणजे मोठा डोंगरच वाटते. माझ्या मनात सतत विचार यायचा एसटीमधून कधी तरी प्रवास केला पाहिजे. मी पप्पांना सांगितले ,"आपण कधीतरी बसणे गावाला जाऊया .मला बसचा प्रवास करायचा आहे. " पप्पांनी सांगितले," पुढच्या रविवारी आपण बसणे गावाला जाऊया." मी संपूर्ण आठवडाभर रविवारची आतुरतेने वाट पाहत होतो.
        रविवारी गावाला जाण्यासाठी आम्ही बस स्थानकावर गेलो. मी पहिल्यांदाच बसस्थानक आतून बघितले. सर्वत्र लोकांची गर्दी दिसत होती प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त होता पण प्रवासासाठी होणारी धावपळ आणि लगबग मात्र सर्व प्रवाशांमध्ये दिसून येत होती. कुणी बॅगा सावरत पुढे पुढे जात होते .काहीजण बसस्थानकावर असलेल्या गाड्यांचे वेळापत्रक बघण्यात मग्न होते. कुणी मोबाईल ने वेळापत्रकाचे फोटोही काढत होते. फोनवर घरच्यांना निरोप देत होते, तर काहीजण ख्याली खुशाली विचारत होते.
         बसस्थानक म्हणजे मला  एकमेकांना न ओळखणाऱ्या लोकांचे एक कुटुंबच वाटत होते. सजून-धजून आलेली तरुण मुले मुली गप्पा मारण्यात मध्ये मग्न होते .कुणी अभ्यासाची तयारी करत होते. कुणी वर्गातील गप्पा मारत होते. प्रत्येकाच्या गप्पा मधील रंग वेगळाच होता .मला फार छान वाटत होते कारण की एक नवीनच विश्व मला बघायला मिळाले होते.
     हवी ती गाडी आल्यानंतर लोक पळत जात होते. बस पकडत होते .बस पकडणे म्हणजे नेमके काय ते मला प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर समजले. आई-वडील आपल्या लहान मुलांना गप्पागोष्टी सांगत होते. काही आगाव मुले गाडी आल्यानंतर  तिकडे धावत. त्यांच्या आया हात धरून त्यांना जोराने ओढून नेत .त्यांना रागवत .काही स्त्रिया मात्र मुलांना कडेवर घेऊन गाड्यांविषयी छान छान माहिती सांगतानाही दिसल्या. त्यांना बघून मला माझ्या आईची आठवण आली. आई मला कधीही रागवत नाही सर्व गोष्टी मला नीट समजावून सांगते.
           विचारांच्या तंद्रीत असतानाच आईने सांगितले ,"विजय चल आपल्याला जायचे ती बस आली." मी पटकन आईचा हात धरला आणि आईच्या मागे मागे चालू लागलो. आई-वडिलांच्या मागे चालत बस मध्ये शिरलो. पहिल्यांदाच मी आतून बस बघितली होती. इतकी लांब आणि इतके  सीट असलेली बस बघून मला आश्चर्यच वाटलं.
     आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या  मागोमाग बरेच लोक गाडीमध्ये आले. सगळे लोकं जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते . पप्पांनी मात्र खिडकी जवळची चांगली जागा मिळवली होती. मी खिडकीजवळ जाऊन बसलो आणि बाहेरची गंमत बघू लागलो. खिडकीतून बाहेर बघताना मी  चित्रपट बघतो आहे असेच मला वाटले. बसच्या बाहेर खाली असताना जिथपर्यंत नजर जात होती त्यापेक्षा बसमध्ये बसल्यानंतर अधिक लांबचेही दिसू लागले.
       बसच्या प्रवासाचा मला आनंद येऊ लागला 
होता . आजूबाजूला जे दृश्य दिसते ते अधाशासारखे डोळ्यांमध्ये साठवत होतो. सर्व परिसराचे जणू माझ्या मनाच्या कागदावर चित्र उमटत होते .जे कधीच पुसली जाणार नव्हते.
      गाडीमध्ये गोळ्या विकणारे, शीतपेये विकणारे आले आणि मोठ्याने लोकांना घेण्यासाठी प्रवृत्त करू लागले. या सर्वांमध्ये माझे लक्ष वेधून घेतले ते  
गारे ssगार  गारे sssगार असे ओरडत उसाचा रस घेऊन येणाऱ्या एका दादाने. तसा  अनेक वेळा मी उसाचा रस पिलेला आहे, पण गाडीत रस विकण्यासाठी आलेला बघून मला रस पिण्याची खूप इच्छा झाली. माझी इच्छा  लगेच पूर्ण झाली. मी उसाच्या रसा कडे बघत आहे हे वडिलांनी बघितलं होते आणि मी मागण्याच्या आत्ताच वडिलांनी एक रसाचा ग्लास माझ्या हातात दिला मी घटाघट पिऊन टाकला. मात्र या रसाची चव आज मला जगावेगळी लागत होती.
       रस पिऊन झाल्यानंतर वडिलांनी त्यांना पैसे दिले मग बसचे वाहक म्हणजेच कंडक्टर बस मध्ये आले .त्यांनी सर्व विक्रेत्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितले .सर्व विक्रेते वाहकाला राम राम म्हणून खाली उतरले.
      वाहकाने मोठा आवाज दिला , कृपया सर्वांनी तिकिटाचे सुट्टे पैसे द्या. असे म्हणून वाहकाने एकाबाजूने सर्वांना तिकीट द्यायला सुरुवात केली. अनेक लोकं सुट्टे नाहीत म्हणून सांगत होते वाहक रागानेच का होईना  सुटे देत होता. त्याबरोबरच बस मध्ये प्रवास करताना सुटे बरोबर ठेवावे अशा सूचना करायचेही तो विसरत नव्हता.
         वाहकाकडे बघून पोलीस काकांची आठवण आली. अगदी पोलिसांच्या सारखाच पोशाख  वाहकाचा  होता. फक्त हातात काठी ऐवजी तिकीट देण्याचे यंत्र होते. मग ते आमच्या जवळ आले पणे दोन फुल आणि एक अर्धे असे तिकीट घेतले. अर्धे तिकीट म्हणजे अर्धे फाडून देतील असे मला वाटले पण मला समजून सांगितले की अर्धे तिकीट म्हणजे काय ? त्यावेळी मला माझ्या विचाराचे हसू आले .
     गाडी सुरु झाली. हळू हळू गाडी पुढे जाऊ लागली. बसस्थानका मधून बाहेर निघताना चालक काळजीपूर्वक इकडे तिकडे बघून गाडी चालवत होते. बसस्थानकातून गाडी बाहेर आल्यानंतर मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवला अजून दोन तीन ठिकाणी नवीन प्रवासी गाडीमध्ये बसले.
       हळू हळू गाडी गावाच्या बाहेर निघू लागली. रस्त्याच्या कडेने अनेक दुकाने दिसू लागलेत .ती दुकाने जणू आमच्याकडेच टक लावून बघत आहेत असे वाटू लागले. गाडीने चांगलाच वेग धरला .गावाच्या बाहेर गाडी आल्यानंतर तर गाडीचा वेग खूपच वाढला. रस्त्याच्या कडेने झाडे भराभर मागे धावू लागली .आमच्या विरुद्ध दिशेने झाडे जात होते असे   भासू लागले. झाडे वेगाने फांद्या हलवून आम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा देत होते .माझा पहिला बस प्रवास छान व्हावा असेच ते सांगत होते.
       सर्वांना तिकीटे दिल्यानंतर वाहक दरवाजा जवळच्या पहिल्या आसनावर जाऊन बसले. मधेच कुणाला बसमधून उतरायचे असेल किंवा नवीन प्रवासी आज घ्यायचा असेल तर वाहक त्यांच्या डोक्यावरच असलेल्या एका दोरीला ओढायचे ,मग चालकाच्या जवळच असलेले घंटी वाजायची आणि मग गाडी थांबत असे .हा घंटे वाजवण्याचा खेळ बघून मला फारच मजा वाटली न राहवुन मीही ती दोरी ओढली वाहकाने मागे बघितले मला सांगितले दोरी उडू नको मी लगेच पटकन खाली बसलो.
      गाडीतील सर्व प्रवासी आता शांतपणे बसले होते पुणे मोबाईलवर गाणे ऐकत होते कोणी फोनवर बोलण्यात व्यस्त होते काही लहान मुले खिडकी बाहेरील दृश्य बघून आपल्या आई-वडिलांशी गप्पा मारून अनेक प्रश्न विचारत होते त्यांचे आई-वडीलही त्यांच्या प्रश्नांचे उत्साहाने उत्तरे देत होती. काही खाद्य प्रेमी मंडळी घरून आणलेल्या चिवड्याच्या आणि चकलीच्या पिशव्या सोडून अन्नपूर्णेचा भरभरून आशीर्वाद घेत होते गाडीतील एकंदरीत दृश्य चित्रकाराने आपल्या कुंचल्यात रेखाटावे इतके छान वाटत होते तितक्यात आम्ही बसलेल्या या आसनाच्या शेजारच्या आसनावर एक तरुणी डोकं धरून बसली होती. बहुतेक तिला काहीतरी त्रास होत असावा.
        आता गाडी गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर आली होती डोंगर सुरू झाले होते डोंगरांवर हिरवीगार झाडे डोलत होते मधूनच फुले हे आमच्याकडे बघत असल्याचा भास होत होता ते निसर्ग दृश्य बघून मन आनंदित होऊन गेले दुचाकीने प्रवास करताना इतके मन भरून हे दृश्य डोळ्यांमध्ये साठवता येत नव्हते खरोखर फारच सुखदायक अनुभव होता तो या विचारातच कधी माझे डोळे लागले ते कळलेच नाही आणि ज्या वेळेस आजचे गाव आले त्यावेळेस आईच्या कुशीत शांत झोपलेला होतो मी हे आईने उठल्यावर मला कळले खरोखर अगदी आनंददायी आणि माझ्या आजन्म लक्षात राहील असा माझा बसप्रवास होता तो.



या निबंधाचे खालील नावेदेखील असू शकतात

  1. माझा बस प्रवास /
  2. माझा पहिला बस प्रवास/
  3.  मी केलेला बस प्रवास/
  4. मी केलेला प्रवास




       निबंध कसा वाटला आहे आपला अभिप्राय नोंदवून नक्की कळवा कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही सांगा या निबंधात नवीन निबंध वाढवण्यात येतील त्यासाठी नेहमी ब्लॉग ला भेट देत राहा व संकेतस्थळावर उपलब्ध असलेले इतर निबंध ही सतत वाचत रहा.
   तुम्हालाही तुमचे लेख किंवा निबंध पाठवायचे असतील तर नक्की पाठवा तुमच्या नावासह आपण या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध करू.

      
  
    

2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने