1001marathiessay.blogspot.com

माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh/my favourite saint

       संत हे खरे समाज सुधारक आणि शास्त्रज्ञ  होते .तत्कालीन परिस्थिती न जुमानता त्या परिस्थिती विरुद्ध बंड पुकारून तेही शांततेच्या मार्गाने त्यांनी अनेक लोकांना माणूस म्हणून जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवले.


                     संत ज्ञानेश्वर



ज्ञानेश्वर म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानालाच हातपाय फुटलेत असे म्हणावे लागेल.
    या महाराष्ट्रात राहून संत ज्ञानेश्वर यांचे नाव माहीत नाही असा व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही याचे कारण संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी करून ठेवलेले महान कार्य.
         
     अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमि मध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपले परम भाग्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्रामध्ये मध्ये अनेक पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले .त्यातीलच एक पुरातन पंथ म्हणजेच वारकरी पंथ .याचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. या संप्रदायातील महान भागवत भक्त श्री संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी आपण या निबंधांमध्ये माहीती बघूया. तसे पाहता संत ज्ञानेश्वरांचे अध्यात्मिक कार्य व सर्व मानव जातीसाठी केलेले त्यांनी मार्गदर्शन हे एका निबंधात किंवा काही निबंधांमध्ये वर्णन करणे केवळ अशक्यच आहे तरीदेखील या निबंधांमध्ये आपण त्यांच्या कार्याचा थोडा आढावा घेण्याचा प्रयत्न  करूया.

संत ज्ञानेश्वर
   
संपूर्ण महाराष्ट्रभर आज  वारकरी संप्रदायाची पताका मोठ्या अभिमानाने  अनेक भाविकांच्या भक्ती भावाच्या आधारावर डोलत आहे. या वारकरी संप्रदायाचा अभंग आणि  स्थिर पाया घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संत ज्ञानेश्वर यांनी केले म्हणून असे म्हटले जाते ज्ञानदेवे रचिला पाया पाया उभारिले देवालया.
      
संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते ह्या हरिभक्त दाम्पत्याच्या पोटी आपेगाव येथे अकराव्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 (इसवीसन 1275) रोजी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांना अजून दोन भाऊ आणि एक बहीण होती ज्ञानेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ व लहान भावाचे नाव सोपान देव होते या तिन्ही भावांना एक हुशार बहीण तिचे नाव होते मुक्ताबाई.  मुक्ताबाई चारही भावंडांमध्ये सर्वात लहान होती.
      
         संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास आश्रम स्वीकारला होता म्हणजेच सर्व संसाराचा त्याग करून संन्यासाची दीक्षा त्यांनी घेतली परंतु ज्यावेळी त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करायला सांगितला म्हणजेच पुन्हा संसार करायला सांगितला गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी पुन्हा संसार करायला सुरुवात केली परंतु तत्कालीन रूढी वाद्यांना व परंपरा वाद्यांना हे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले होते संत ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनी जलसमाधी घ्यावी असे त्यांना शिक्षा सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी ती शिक्षा मान्यही केली परंतु त्या बदल्यात त्यांच्या मुलांना म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांना सर्व सामाजिक व धार्मिक अधिकार प्राप्त व्हावेत असे ठरले होते परंतु मातापित्यांनी जलसमाधी घेतल्यानंतरही या चारही भावंडांना तत्कालीन रूढीवादी अंधश्रद्धाळू समाजाने कोणत्याही प्रकारचे अधिकार बहाल केले नाहीत परंतु अधिकाधिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.
         या चारही भावंडांच्या वाट्याला अनंत अडचणी आणि कष्टप्रद अनुभव आले परंतु तरीदेखील त्यांनी कोणत्याही व्यक्ती बद्दल अपशब्द काढले नाहीत किंवा त्यांच्यावर राग व्यक्त केला नाही इतक्या लहान वयात हा समंजसपणा वही क्षमाशील वृत्ती फार मोठी शिकवण देऊन जाते.
       शिक्षणापासून वंचित असलेल्या बऱ्याच मोठ्या समाज घटकावर काही सुशिक्षित पंडितांनी अनन्वित अत्याचार केले ग्रंथ व शास्त्रांमधील ज्ञान या अशिक्षित माणसांपर्यंत पोहोचले नव्हते त्यामुळे हा वर्ग अनेक वर्षांपासून जुलूम सहन करत होता.
        त्या काळातील बरेचसे ग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे लोकांना त्या ज्ञानापासून वंचित राहावे लागत होते ज्ञानेश्वरांनी आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनाच गुरू मानले होते व गुरूंच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेत असलेल्या भगवद्गीतेचे मराठी भाषांतर केले म्हणजे त्यावर टीका लिहिली या टीकेचे नाव म्हणजेच ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा सुमारे नऊ हजार ओव्यांचा ग्रंथ पूर्ण केला या ग्रंथातील विविध ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर इतक्‍या कमी वयात इतके प्रचंड ज्ञान सर्व समाज घटकांचा विरोध असताना देखील त्यांनी कुठून मिळवले याविषयी मनात अनेक शंका निर्माण होतात यांच्यामुळेच ज्ञानेश्वरांना देव पद देखील प्राप्त झाले आहे.
       ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये जवळजवळ जगातील सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्याला काहीनाकाही रुपाने मिळतात असे अनेक अभ्यासू लोकांचे मत आहे. 
        चौदाव्या व पंधराव्या सोळव्या शतकामध्ये अनेक शोध लागलेले आपण बघतो त्यात जलविद्युत, विमान ,अणु रेणू यासारख्या क्रांतिकारी शोधांचा उल्लेख करावा लागेल परंतु त्याही आधी तेराव्या शतकामध्ये झालेल्या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथांमध्ये या गोष्टींचा विविध ओव्यांमधून उल्लेख झालेला दिसतो. त्या ओव्या खालीलप्रमाणे
         उपजे ते नासे 
नासे ते पुनरपी दिसे 
हे घटिका   यंत्र 
जैसे परिभ्रमे गा
       या ओळी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे निर्माण झाले आहे ते नष्ट होणार आणि दुसरे रूप धारण करून पुन्हा निर्माण होणार ज्या पद्धतीने घड्याळ फिरत असते त्यापद्धतीने हे चक्र चालूच राहणार यातून जीव चक्रच जणू ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे.
      

     मी सूर्याचे नि वेशे तपे तेने सोसे
      पुन्हा इंद्र होऊनी वरसे जीवा लागी
 या ओळी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि ती वापस पुन्हा जल होऊन बरसते यामुळे ज्ञानेश्वरांनी जलचक्र सांगून टाकलेले आहे

तया जलाचे आवेसे प्रकटले तेज लखलखीत दिसे
तेथ विजेमजी असे सलील काही
    ज्याप्रमाणे पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाहित झाल्यानंतर त्यामध्ये वीज निर्माण होते त्याप्रमाणेच ते परमतत्व देखील लखलखित आहे. या ओवीत ज्ञानेश्वरांनी जलविद्युत कसे निर्माण होते याचेही वर्णन केलेले आपल्याला दिसते.
      अशा प्रकारचे अनेक शोध आणि वर्णने ज्ञानेश्वरी मध्ये आढळून येतात त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाची खोली आपल्याला दिसून येते.
          संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक होते थोर कवी आणि तत्वज्ञ होते त्यांनी भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठाचे अभंग लिहिले. अनेक अभंग व विविध रचना त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यातून मानवाला जीवनाचे सार सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला वारकरी संप्रदायाचे परंपरा त्यांनी स्वतः सांगितले आहे ते खालील अभंगातून आढळून येते.
    आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
    मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य 
    मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला 
     गोरक्ष वळला गहिनी प्रति 
      गहिणी प्रसादे निवृत्ती दातार 
       ज्ञानदेवा सार चोजविले,
संत ज्ञानेश्वर यांनी लोकांच्या भल्यासाठी आवश्यक  असणाऱ्या बाबींचा आपल्या ग्रंथसंपदा आतून उल्लेख केलेला आहे.
ज्ञानेश्वरांची ग्रंथसंपदा जन्म सर्व मानव जातीला जगण्याची योग्य दिशा आणि मार्गदर्शन करत राहतील.
   ज्ञानेश्वरांनी त्यांचे ग्रुप म्हणजे त्यांचे मोठे भाऊ भूतनाथ निवृत्तीनाथ यांची परवानगी घेऊन आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आहे .जर तुम्हाला कधी प्रसंग मिळाला तर या समाधीचे नक्की  दर्शन घ्या.

संत ज्ञानेश्वर विषयी लिहायचे झाले तर एका निबंधामध्ये त्यांचे कर्तुत्व वर्णन करणे म्हणजे काजव्याने सूर्याच्या तेजाचे वर्णन करण्यासारखे आहे. 

संत ज्ञानेश्वरांची ग्रंथसंपदा खालील प्रमाणे सांगता येईल.
  1. ज्ञानेश्वरी
  2. अमृतानुभव
  3. चांगदेव पासष्टी
  4. हरिपाठ.




पुढे काही दिवसांमध्ये या लेखाचे अजून विस्तारीकरण केले जाईल त्यामुळे नेहमी या ब्लॉगला भेट द्या व सबस्क्राईब करा म्हणजे कोणत्याही निबंधात काही बदल झालेत तर तुम्हाला लगेच माहिती मिळेल आणि ब्लॉक शेअर करायला अजिबात विसरू नका म्हणजे अधिकाधिक लोकांना त्यांचा आनंद घेता येईल व मुलांना अभ्यासामध्ये मदत होईल
      






     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने