1001marathiessay.blogspot.com
       

               पाण्याला आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे तर त्याच्या उपयोगावरून आपल्याला कळतेच.  तरीही बरेच लोक पाण्याचा निष्काळजीपणे वापर करताना दिसतात. असे म्हणतात की तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल त्यामुळे "जल है तो कल है!" हे लक्षात ठेवून पाण्याच्या वापराबाबत सर्वांनी काळजी बाळगली पाहिजे. नाहीतर विनाश ठरलेलाच आहे.
चला तर मग आता आपण एक छानसा निबंध बघूया " पाणी अडवा पाणी जिरवा"
--------–----------------------------
                    पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
            pani adva pani jirva marathi essay /nibandh

       नुकताच पावसाळा सुरू झालेला होता म्हणजे एकदा थोडासा पाऊस पडून गेलेला होता त्यानंतर पंधरा दिवस झाले तरीही पावसाचा पत्ता नव्हता . सर्व शेतकरी आणि इतर लोकही पावसाची आतुरतेने वाट बघत होते कुठेही चर्चा चालू असताना पावसाचा विषय निघतच होता.
        या चर्चेमध्ये भाग घेणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितले," की फक्त पावसाची वाट बघून काय होणार आहे ? पाऊस येतो आणि आपली दोन तीन महिन्याची गरज भागल्यानंतर आपण पाण्याचा अगदी बेजबाबदारपणे वापर करतो . हा बेजबाबदारपणाच आपल्या भविष्याला अंधारात ढकलतो आहे . .  यामुळेच भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होणार आहे ; त्यासाठी गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून भरपूर पाणी अडवून ते पाणी जमिनीच्या पोटात जिरवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
          ही चर्चा झाल्यानंतर गावातील लोकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरवले . विविध कामांचे नियोजन करून कामे कशा पद्धतीने  पूर्ण करायची त्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करायच्या हे सर्व ठरवण्यात आले.
         पाण्याचे उपयोग हे सर्वमान्य व सर्वश्रुत आहेतच परंतु तरीही पाण्याचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो हे गावातील प्राध्यापक व शिक्षकांनी समजावून सांगितले.          निसर्ग माणसाची गरज भागवतो हाव नाही .आत्ताच्या काळामध्ये माणसांनी आपल्या घरामध्ये स्वतंत्र कूपनलिका म्हणजेच बोरवेल्स करून पृथ्वीच्या पोटातील पाणी उपसण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो पाहता या पृथ्वीवरील जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. जमिनीच्या पोटातील पाण्याचा साठा सतत कमी होत राहिला तर जमिनीच्या आतील तापमान सतत वाढत जाईल ;त्यामुळे पृथ्वीच्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणातही उष्णता निर्माण होईल .परिणामी पावसावर परिणाम होईलच आणि पाऊस कमी पडला म्हणजे दुष्काळ आहेच.
         जल ही जीवन है|  जल है तो कल है |  जल जीवनम् |असे अनेक प्रकारचे सुभाषित आपल्याला ऐकायला भेटतातच. एकीकडे वृक्षांचे होणारी भरमसाठ तोड; तर पावसामुळे पडणारे पाणी अडवण्यासाठी अपूर्ण पडणाऱ्या सोयी सुविधा तसेच बंधारे व धरण यांची  कमी असलेली क्षमता यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते . शेवटी समुद्राला मिळून जाते .समुद्रात गेलेल्या पाण्याचा आपल्याला शेवटी उपयोग नाहीच . म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे अत्यंत गरजेचे आहे. शासनही त्या परीने विविध योजना अमलात आणत असते. डोंगर उतारांवर नालाबंडिंग केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरते.
      शेतकरी तसेच इतर जमीन धारकांनीही मोकळ्या जागेमध्ये पाच फूट लांब ,दोन फूट रुंद व तीन फूट खोल असे खड्डे खणून ठेवले पाहिजे . त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अशा खड्ड्यांमध्ये आडवले जाऊन ते त्यात जिरू शकते. एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की अशा एका खड्ड्यातून सुमारे 40 हजार लिटर पाणी अडवले जाते. यावरूनच या खड्ड्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
       सतत वाढत जाणारे  प्रदूषण , मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलांमध्ये पेटणारे वणवे, तेल जहाजांना लागणाऱ्या आगी , ब्रह्मांडाचा शोध घेणारे विविध प्रयोग, खनिज तेलांच्या शोधासाठी खोलवर खणल्या जाणाऱ्या  खाणी, यामुळे जणू या पृथ्वीवर अन्यायच होत आहे. हे असेच चालू राहिले तर पाण्याच्या अभावाने विनाश ठरलेलाच आहे.
        पाणी नाही .....या कल्पनेनेच अंगावर शहारा उभा राहतो . डोक्याला   झिनझिण्या आल्यासारखे होते. आता तरी जागे व्हा मित्रांनो पाणी अडवा आणि पाणी जिरवा घरातील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी शोषखड्डे यांचा वापर करा पावसाळ्यात घरांवर पडणारे पाणी पाइपद्वारे बोरिंग मध्ये सोडा जेणेकरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होईल एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी आडवा पाणी जिरवा नाहीतर पाणी आपली जिरवेल या गोष्टीचे सतत भान राहू द्या ;आणि आपल्या वागण्यामध्ये आता बदल करा.
        

  1. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  2. सुंदर विचार
  3. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  4. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  5. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  6. पर्यावरणाचे महत्व..  environment
  7. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  8. पैंजण

 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,,,.,..,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,.,,,.,..


        निबंध कसा वाटला ते सांगा आणि तुम्हालाही तुमचा निबंध पाठवायचा असेल तर नक्की पाठवा आम्ही तुमचे निबंध ब्लॉगवर प्रकाशित करू तुमच्या नावासह .
                 धन्यवाद
          
       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने