| झोपडपट्टीचे मनोगत 
किंवा 
| झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा 
मराठी आत्मवृत्तपर निबंध
zopadpattiche manogat /
           zopadpatti bolu lagate tevha essay in marathi atmvrutapar nibandh.

                            आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे घरे व माणसे आपल्याला दिसतात .प्रत्येकाचे सुखदुःख वेगवेगळे असतात .प्रत्येकाच्या अडचणीही विविध प्रकारच्या. तसेच एक दिवस आमच्या घरासमोर असलेल्या झोपडपट्टी ने देखील तिच्या मनातील वेदना ,दुःख ,काही अपेक्षा माझ्याजवळ बोलून दाखवल्या. त्याच मी आता तुम्हाला सांगतो .चला तर मग बघुया एक छानसा निबंध झोपडपट्टीचे  मनोगत म्हणजेच झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा हा आत्मवृत्तपर निबंध.
-----------------------------------------------------------------------------------


       झोपडीचे मनोगत

         आमचे घर तसे उच्चभ्रू वस्तीत आहे. एका दहा मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आम्ही राहतो .इमारतीचे नाव आहे 'हिमालय सोसायटी'. . नावासारखीच सोसायटीची इमारत अगदी उंच आहे . जणू आकाशाशी स्पर्धा करते; आणि या आमच्या हिमालयाच्या शेजारीच आहे 'सह्याद्री सोसायटी' तीही तशीच उत्तुंग . वेगवेगळ्या जातीचे व धर्माचे लोक या सोसायटीमध्ये मिळून मिसळून आनंदाने राहतात .सर्व नोकरदार वर्ग तर काही व्यवसायिक या सोसायटीमध्ये राहतात.
                  एके दिवशी हिमालय आणि सह्याद्री रात्री निद्रादेवीच्या स्वाधीन असताना अचानक कोणीतरी हाक मारत असल्याचा आवाज माझ्या कानावर आला . मी आजूबाजूला बघितले तर घरात सर्वजण शांत झोपले होते . मग मी गॅलरीत आलो; आणि इकडे तिकडे बघू लागलो .कोण आवाज देत आहे ? याचा शोध घेऊ लागलो .कुणाचाही आवाज येत नव्हता. मग परत मागे फिरलो .तितक्यात पुन्हा आवाज आला  "अरेरे जाऊ नकोस ,थांब  वरचेवर काय बघतोस ?खाली बघ मी बोलते .तुमच्या हिमालय आणि सह्याद्रीच्या मध्ये असलेली ही झोपडपट्टी."
                            झोपडपट्टीच्या बोलण्यामध्ये काहीसे दुःख आणि वेदना व प्रौढत्व जाणवत होते. अर्थातच संकटे माणसात अकाली प्रौढत्व निर्माण करतात . झोपडपट्टी बोलू लागली "तुमच्या हिमालय आणि सह्याद्री पेक्षा मी वयाने मोठी आहे बरं का ; पण तरीही तुम्ही लोकं माझ्याकडे अगदी तुसड्या नजरेने बघतात . मी तुम्हाला नकोशी झालेले आहे .तुमच्या डोळ्यात नेहमी खटकते हे मला चांगलंच ठाऊक आहे; पण झोपडपट्टी निर्माण होण्याचे कारण काय ? याचा कधी विचार केला आहे का तुम्ही?"
                    तुम्ही  मऊ मऊ बिछान्यात सुंदर सुंदर गुलाबी स्वप्न बघतात . . त्याच वेळी या झोपड्यांमध्ये प्रत्येक घरात अनेक लोक दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर पाय टाकून झोपलेले असतात .त्यांना झोपण्यासाठी पुरेशी जागाही नसते; पण तरीही कधी ते कोणतीही तक्रार करत नाही  . तुम्ही मात्र आपल्या या सोसायटीजवळ ही झोपडपट्टी नको असा सारखा तगादा लावून बसतात. मग तुमच्यापेक्षा हे लोकच मनानं श्रीमंत नाहीत का?
                         झोपडी माझ्याशी बोलता बोलताच सोसायटीच्या इमारतीशी बोलू लागली. का रे हिमालया काय एवढ्या रागाने माझ्याकडे बघतोस? तुझ्या नादाला लागून तो सह्याद्रीही माझ्याकडे आता तिरप्या नजरेने बघायला लागला आहे ;पण तुम्हा दोघांना मी सांगून ठेवते याठिकाणी तुमच्या आधी मी आलेली आहे.
               तुम्ही मला इथून दूर करू बघता परंतु मला इथून दूर केल्यानंतर इथे राहणारे गरीब बिचारे कुठे जातील ?आणि त्यांच्या चिल्यापिल्यांचे काय होणार ? याचा काही विचार केला आहे का तुम्ही ? तुम्हाला वेळ कुठे आहे एवढा विचार करायला; पण आता करा .तुम्हाला प्रत्येकाला राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली आहे परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त माणसे या झोपडपट्टीत एका एका खोलीत दाटीवाटीने सुखाने राहतात. त्यांचा विचार तुम्ही करायला नको का ? ते ही तुमच्या सारखेच माणसे आहेत ना ?तुमच्या सारखेच अवयव त्यांनाही आहेत .तुमच्या सारखेच शक्ती सामर्थ्य त्यांच्यातही आहेत . मला तर वाटते शक्तीच्या बाबतीत झोपडपट्टीतील माणसे तुमच्या पेक्षा नक्कीच सरस ठरतील ;पण त्या बाबतीत गर्व करताना मी त्यांना आजपर्यंत कधी पाहिलेले नाही
                  माझ्यामुळे तुमच्या सौंदर्याला डाग लागतो असे तुम्हाला वाटते ना परंतु थोडासा माणुसकीचाही विचार करा 'जगा आणि जगू द्या 'या सुविचाराची  जरा आठवण करा.त्या पद्धतीने वागायला जरा शिका .एवढीच मी तुम्हाला विनंती करते
                          काही ठिकाणी तर तुमच्या बाथरूम एवढी ह्या लोकांचे घर आहेत आणि तेवढ्या जागेतच स्वयंपाक घर,संडास ,आंघोळीची जागा या सर्व गोष्टी आहेत. मग तुम्हीच सांगा स्वच्छतेचे सर्व निकष त्यांना कसे पाळता येतील ? ह्या अशा अनेक अडचणींना सामोरे जाता जाता त्यांच्या नाकी नऊ येतात आणि मग हे दुःख विसरण्यासाठी ते मद्याच्या म्हणजेच दारूच्या आहारी जातात . मग यावरही तुम्ही मोठी माणसे त्यांना दोष देतात ;पण जरा तुमच्या फ्रीजचे चोर कप्पे उघडून बघा तिथे काय सापडते  मद्य ना ! पण जरा उच्चप्रतीचे बरोबर की नाही? 
                  तुम्ही ऐषारामात राहतात ते तुमचे बंगले तुम्ही ह्या कष्टकऱ्यांच्या जीवावरच तर बांधलेत ना? मग त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा दूषित का ? संविधानाने सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
               झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले मी बघितले आहेत . त्यातही या माणसांच्या स्वच्छतेविषयी निराशाजनक गोष्टीच लिहिण्याचा अधिकाधिक प्रयत्न झालेला दिसतो; पण एवढ्या छोट्याश्या जागेमध्ये एवढ्या सर्व विधी आटोपून राहायचे म्हणजे अस्वच्छता तर होणारच ना!
         झोपडपट्टीचा राग अधिकच वाढला होता. झोपडपट्टी मोठ्या त्वेषाने बोलत होती ;आणि स्वतःच मन हलकं करत होती. आता बोलून बोलून झोपडपट्टी थकल्यासारखी जाणवत होती . एवढे सगळे बोलून एकदाची झोपडी शांत झोपी गेली.






  1. माझी अभयारण्यास भेट. 
  2. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  3. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  4.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  5. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  6. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  7. माझे गाव       
  8.    स्वामी विवेकानंद 
  9.   झाडे लावा झाडे जगवा
  10. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  11. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  12. मी पाहिलेला अपघात
  13. माझी शाळा .
  14. महात्मा ज्योतिबा फुले
  15. माझा भाऊ
  16. आमचे वनभोजन
  17. माझे वडील मराठी निबंध
  18. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  19. मी पाहिलेला अपघात
  20.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  21. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  22. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  23. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  24. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  25. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  26. सुंदर मराठी सुविचार
  27. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  28. स्वामी दयानंद सरस्वती
  29. राजा राममोहन रॉय
  30. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  31. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  32. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  33. परीक्षा .. छान मराठी लेख.
  34. उपकार ...छान कथा वाचा.
  35. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  36.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  37. रम्य पहाट
  38. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  39. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  40. सुंदर विचार
  41. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  42. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  43. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  44. पर्यावरणाचे महत्व..  environment
  45. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  46. पैंजण
  47. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  48. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 


********************
      वरील निबंध वाचून तुम्ही देखील या विषयावर तुमच्या मनाने निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा व निबंध कलेमध्ये निपूण होण्यासाठी प्रयत्न करा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने