1001marathiessay.blogspot.com                   


           प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या यादीत मानाचे स्थान असलेले अब्राहम लिंकन यांनी एकदा हेड मास्तरांना पत्र लिहिले .या पत्राचा मराठी अनुवाद श्री वसंत बापट यांनी केलेला आहे .
                                     चला तर मग बघूया 
   
अब्राहम लिंकन यांचे मुख्याध्यापकास पत्र
अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस पत्र  
. abraham linkanche headmastaras patr /
abraham linconsletter to headmaster

          अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र



प्रिय गुरुजी 
                 सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात
 नसतात सगळीच सत्यनिष्ठ 
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी .
मात्र त्याला हे देखील शिकवा ,
जगात प्रत्येक बदमाशागानिक  असतो 
एक साधू चरित पुरुषोत्तमही.
 स्वार्थी राजकारणी असतात जगात
 तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही .
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही .
मला माहित आहे 
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत .
 तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
 घाम गाळून कमावलेला एकच छदाम 
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे .
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा 
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
 तुमच्यात शक्ती असेल तर
 त्याला द्वेष ,मत्सरा पासून दूर रहायला शिकवा.
 शिकवा त्याला आपला धर्म संयमाने व्यक्त करायला
 गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं
 ्यांना नमन सर्वात सोपं असतं 
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला
 ग्रंथ भांडार यांचं अद्भुत वैभव
 मात्र त्याबरोबरच
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा 
सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला 
पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी 
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर 
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं
 शाळेत त्याला हा धडा मिळू दे
 फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे
 आपल्या कल्पना ,आपले विचार
 यांच्यावर दृढ विश्‍वास ठेवायला हवा त्याने 
बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी 
त्याला सांगा त्यानं भल्यांशी भरायला वागावं 
आणि टग्यांना अद्दल घडवावी 
माझ्या मुलाला हे पटवता आले तर पहा
 जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या
 भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी 
पुढे हे ही सांगा त्याला
 एकावे जनाचे अगदी सर्वांच
 पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून
 आणि फोलपट टाकून निखळ सत्य तेवढं स्वीकारावं 
जमलं तर त्याच्या  मनावर बिंबवा 
हसत रहावं मनातलं दुःख दाबून 
 आणि म्हणावं त्याला आसू ढाळायाची लाज वाटू देऊ नको 
त्याला शिकवा
 तुच्छता वाद्यांना तुच्छ मानायला 
आणि चाटू गिरी पासून सावध राहायला 
त्याला हे पुरेपुर समजावा की 
करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून
 पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा
धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्यावर
 कानाडोळा करायला शिकवा त्याला
 आणि ठसवा त्याच्या मनावर
 जे सत्य आणि न्याय्य वाटते 
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा .
त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका .
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
 लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं 
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य 
आणि धरला पाहीजे धीर त्यानं 
जर गाजवायचं असेल शौर्य .
आणखी एक सांगत रहा त्याला 
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर
 तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर 
माफ करा गुरुजी 
मी फार बोललो आहे 
खूप काही मागतो आहे 
पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच
 माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो 

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने