1001marathiessay.blogspot.com  

अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेड मास्तरांना पत्र लिहिल्यानंतर हेडमास्तर यांनीही या पत्राच्या उत्तरात खालील पत्र अब्राहम लिंकन यांना पाठवले


                     हेड मास्तरांचे अब्राहम लिंकन ना पत्र
         hed mastaranche abraham linkanana patr /
                 headmasters letter to abraham lincon.


 प्रिय लिंकनजी,
       या गुरुकुलातील आयुष्यात मला मिळालेले हे प्रथम पत्र. आपली मानवजातीवर असलेली             नितांत श्रद्धा आणि प्रकांड पंडित यांच्या तोलामोलाच्या विचाराचा वारसा आपल्या मुलाला           लाभला असल्याची जाणीव मला आहे .त्याच्यात असलेल्या जाणिवांना आकार देण्याची                 जबाबदारी कर्तव्य म्हणून मी केव्हाच स्वीकारले आहे .तो आपला मुलगा म्हणून नव्हे तर या           गुरुकुलातील माझा एक शिष्य म्हणून.
 लिंकनजी,
             आत्म्याच्या महात्म्याची मी त्याला ओळख करून दिली आहे .गुंडांना भिण्याचा आणि                    गुंडांनी  त्याला घाबरवण्याचा प्रश्न कधीच उपस्थित होणार नाही, कारण आत्मा उन्नत                         झाला की त्या       प्रबळ आत्मशक्ती मुळे गुंड आपली सारी हत्यारे फेकत असतात.                    शस्त्र आणि पैशाच्या जोरावर गुंड जगतात .पैसा नष्ट होतो आणि शस्त्र मोडता येतात.
 लिंकनजी,
                   स्वार्थी राजकारणाच्या या जगात या माझ्या विद्यार्थ्याला खेचू नका. आपण                     राजकारणाच्या कुटील राजनीतीतही  सक्षम राहिलात परंतु केवळ भावना, शब्द आणि   पुस्तकाच्या या जगात तो राजकारणाचे धडे गिरवू शकणार नाही. त्याला तुम्ही शिकवा. घरातल्या शाळेत त्याने चालवावा वारसा तुमच्या तत्वांचा विचारांचा. तो कधीच असू नये उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा .तुमचा मुलगा म्हणून जन्म मिळाला हे त्याचे परमभाग्य पण स्वतःच्या भाग्याचा निर्माता तो स्वतः असावयास हवा .या गुरुकुलातील शेकडो विद्यार्थ्यांसोबत त्याला सामान्य बनुन यायला सांगा. तुमच्या कर्तुत्वाच्या पडछाया यांचा अहंकार त्याला शिवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. मात्र तुमच्या कर्तुत्वाचा तेजोवलयात त्याचे फुलणारे आयुष्य करपणार नाही याचीही तुम्ही जाणीव ठेवा.
 लिंकनजी,
                    त्याला त्याचा विचार करू द्या. तुमच्या विचारांच्या आवडीनिवडींची सक्ती त्याच्यावर कधीच लादू नका .तुमचे आकाशाला गवसणी घालणारे श्रेष्ठत्व या आकाशात तो भरारी घेईलच असे नाही .कदाचित त्याच्या पंखातले बळ कमी पडेलही. म्हणून कर्तव्यशून्य म्हणून त्याला निराश करू नका. प्रयत्नाने तो सर्वकाही शिकेलच .मी व माझे सहकारी त्याला शिकवितात पुस्तकातल्या शब्दांचे अर्थ व्याकरणातले संदर्भ ,लेख ,आलेख, गणिताची सूत्रे ;पण तुम्हालाही व्हावे लागेल त्याचे शिक्षक. कारण तो शोध घेत आहे पृथ्वीच्या पोटातील रहस्यांचा. समस्त मानव जात आणि त्याच्या नीती नियमांचा. येथल्या अनाकलनीय घटनांची उकलही तुम्हास करून द्यावी लागेल .मात्र त्यावेळी तुम्हाला वडिलांची भूमिका बदलावी लागेल .त्याला अभ्यास कर म्हणून कधीच सक्ती करू नका .त्याला त्याची ओळख होऊ द्या .तुम्ही त्याची ओळख करून देण्याची वृद्धा खटपट करू नका .त्याने विचारलेला प्रत्येक प्रश्न हा नवनिर्मितीच्या मार्गावरील पाऊल असेल .त्याच्या चिमुकल्या पावलांनी बरोबर चालण्याची सवय पावलांना लावा .शब्दांच्या दुनियेत त्याला भटकू द्या. मात्र तो भटकेल तेव्हा तुमच्या कणखर हातांची ,समर्थ शब्दांची साथ द्या, एका आदर्श पालकांचा मुलगा माझ्या गुरुकुलात ज्ञानार्जन करतो आहे ,याचा सार्थ अभिमान मला आहे. मानवी देहाचा एक सांगाडा तुम्ही मोठ्या विश्‍वासाने माझ्या हवाली केला आहे. या गुरुकुलातून बाहेर पडताना तो मानवजातीच्या समग्र उत्थानासाठी कार्य करणारा एक पुरुषोत्तम म्हणून बाहेर पडेल यात मला यत्किंचितही संदेह नाही .
                 

                                                                                                        जॉन स्टुअर्ट






Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने