आपण येथे माझी ताई या विषयावर 3 निबंध बघणार आहोत. चला तर मग बघुया.



   आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांशी आपले प्रेमाचे व आपुलकीचे नाते असते . आपण सर्वजण एकमेकांची काळजी घेतो . या  निबंधात आपण मोठ्या बहिणी विषयी माहिती घेणार आहोत .चला तर मग निबंधाला सुरुवात करूया.

  माझी ताई निबंध  1



   आमच्या घरात आम्ही चार भावंडे आहोत . दोन भाऊ व दोन बहिणी. चारही भावंडांमध्ये माझी ताई सर्वात मोठी आहे. तिचे नाव पूजा आहे. ती अगदी नावा सारखीच आहे छान. जशी घरात आईची देवावर खूप श्रद्धा आहे तसेच माझ्या पूजा दीदीचीही देवावर मनापासून श्रद्धा आहे . आमच्या घरात दररोज देवपूजा ताईच करते आणि आम्हाला सगळ्यांना बसवून सकाळी श्लोक म्हणायला सांगते व शिकवते . आणि संध्याकाळचे दिवा लावण्याचे श्लोक व मंत्र आमच्याकडून पाठ करून घेतले आहेत . ताई नाही ताई म्हणजे दुसरी आईच आहे . घरात माझे वडील तसे खूप कडक आहेत त्यांचा स्वभाव  अगदी रागीट आहे परंतु त्यांना ताई वर रागावलेले मी आजवर पाहिलेले नाही . यात काही विशेष नाही कारण ताई आहेच तशी  गुणवान. मला तर वाटते देवानं ताईला आधीच सर्व व हुशारी व समंजसपणा देऊनच जन्माला घातले आहे.
       माझ्यासाठी तर ताई म्हणजे कल्पवृक्षच आहे . मी ताईकडे काहीही मागावे किंवा ताईला काहीही काम सांगितले तरी ताई कधीही नाही म्हणत नाही . तिला स्वयंपाक खूप छान बनवता येतो . ती सतत नवीन नवीन पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालते तिने बाजारातून स्वयंपाक बनवण्याचे अनेक पुस्तक आणलेले आहेत. त्यातून बघून ती बरेच आम्हाला न माहीत असलेले पदार्थ बनवून खाऊ घालते.
      ताई अभ्यासातही खूप हुशार आहे . ताईला कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळत असतात; आणि विशेष म्हणजे आजवर ताईने ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या स्पर्धांमध्ये दुसरा किंवा तिसरा क्रमांक ताईने मिळवलेला मी कधी पाहिला नाही . जनु स्पर्धा आणि ताई चा प्रथम क्रमांक हे समीकरणच जुळले आहे असे मला वाटते. परंतु ताईच्या वागण्यामध्ये त्याबाबतीत कधीही गर्विष्ठपणा अजिबात दिसून येत नाही . मला तर  ताई नेहमी सांगते ,"आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी ग ची बाधा होऊ द्यायची नाही कारण ही ग ची बाधा अनेकांचा नाश करते आणि आपल्या प्रगतीचा मार्ग बंद करते."
      ताईला वाचनाची खूप आवड आहे .अनेक पुस्तकांचे लेखक तिला अक्षरशः तोंडपाठ आहेत . कधी कधी आम्ही गप्पा मारत बसलेले असताना ताई विविध पुस्तकातील प्रसंग आम्हाला ओघवत्या भाषेत सांगते आणि आम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते . ताईच्या या छान बोलण्याच्या सवयीमुळे किंवा कलेमुळे आम्हालाही वाचनाची गोडी लागलेली आहे . ताईने सुरुवातीला आम्हाला छोटीशी गोष्टींची व कवितांची पुस्तके वाचायला  दिलीत ; व पुस्तकातील जे शब्द किंवा कवितेतील ओळींचा अर्थ आम्हाला समजत नसेल तर ते समजावून सांगितले . त्यामुळे आपल्या भाषेतील गोडवी कळण्यास आम्हाला मदत झाली .
     अशी बहुगुणी व सर्वगुणसंपन्न बहिण मला जन्मोजन्मी मिळावी अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो.

  

     माझी ताई निबंध 2 

  ताई आणि आई या शब्दांमध्ये फक्त त आणि अ ह्या अक्षराचा फरक आहे . कारण आई नंतर घरात इतरांची काळजी घेण्यामध्ये ताईचा सिंहाचा वाटा असतो आणि मला अशीच एक छानशी मोठी बहीण आहे. तिचं नाव श्रद्धा आहे ; पण मी प्रेमाने तिला ताईच म्हणतो आणि ताई मला भाऊ म्हणते.
        माझी आजी होती . तिला आम्ही प्रेमाने सर्व ताई म्हणत असू . पण ज्या दिवशी आजी वारली त्याच दिवशी ताईचा जन्म झाला ; म्हणून सर्वजण त्या दिवसापासून दीदीला ताई असे प्रेमाने म्हणू लागले . पुढे दीदी मोठी झाल्यावर तिला ताई हेच नाव पडले . पण तिथे शाळेत नाम नाव श्रद्धाच आहे
       ताईला गप्पा मारायला खूप आवडतं ती घरात असले म्हणजे काम तर भरपूर करते पण तिचं बोलण्याचं काम काही बंद राहत नाही ताई घरात असताना स्वतः सतत लता मंगेशकरांची गाणी गुणगुणत असते ती म्हणते लता मंगेशकर यांचा आवाज किती गोड आहे मलाही त्यांच्यासारखाच गायन शिकायचं आहे आणि त्यामुळे ताईने गायन शिकण्याचा क्लासही लावलेला आहे एखादी गोष्ट शिकण्यासाठी तिने चंग बांधला तर जगातील कोणतीही गोष्ट तिला रोखू शकत नाही तिचा निर्धार अगदी पक्का असतो डोंगरा सारखा तिच्या निर्धारी वृत्तीचा माझ्या व्यक्तिमत्वावर ही सकारात्मक परिणाम झालेला आहे याचा परिणाम म्हणून मी शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो व पहिल्या तीन क्रमांकामध्ये माझा क्रमांक नक्कीच असतो.
        आम्ही जेव्हा शेतात जातो केव्हा ताई शेतातल्या सर्व कामांना आई वडिलांना मदत करते आणि सर्व प्रकारची काम करताना ताईला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही मलाही तिने शेतातील बरीच कामे शिकवले आहेत ताईने मला शेतकऱ्यां विषयी एक वाक्य सांगितले आहे ते माझ्या मनात फार खोलवर कोरले गेले आहे ते म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी हूश असला खुश असला तर सर्व देश खुश राहील
        अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई चे अक्षर अक्षर इतके सुंदर आहे की आज पर्यंत हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत तिचा प्रथमच क्रमांक आलेला आहे. तिच्यामुळेच माझे अक्षरही फार सुंदर झालेले आहे .

        
         




  
  

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने