1001marathiessay.blogspot.com

  

          निबंध क्रमांक 1
My best friend essay in marathi / माझा प्रिय मित्र मराठी निबंध  
      चांगला मित्र मिळण्यासाठी खूप भाग्य लागतं . देवाच्या कृपेने मला विवेक च्या रूपात एक खुप चांगला मित्र मिळालेला आहे.
===================
      विवेक आणि मी खूप चांगले मित्र आहोत . आमची मैत्री घडुन येण्याचे मुख्य कारण म्हणजे विवेकचे वडील होय . विवेक आणि मी इयत्ता चौथीपासून एका वर्गात होतो . मग नंतर पाचवीत गेल्यावर आम्ही आमच्या गावातील हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी गेलो. विवेकचे वडील या हायस्कूलमध्ये शिक्षक होते . ते आम्हाला इंग्रजी विषय शिकवत असत .  इंग्रजी विषयामध्ये माझा सतत पहिला क्रमांक येत असे . इंग्रजी विषय माझ्या फार आवडीचा होता;  आणि याच्या अगदी उलट विवेकला इंग्रजी विषयाचा फारच कंटाळा. 
       विवेकच्या वडिलांनी विवेक आणि माझी मैत्रीण घडवून आणण्यासाठी एक युक्ती केली . त्यांनी मला अभ्यासासाठी त्यांच्या घरी यायला सांगितले. मीही सरांच्या अज्ञेचा मान ठेवून नित्यनेमाने संध्याकाळी शाळा सुटल्यावर विवेक च्या घरी जाऊ लागलो अर्थात त्यामुळे मलाही सरांचे मौल्यवान सानिध्य मिळाले व योग्य मार्गदर्शनही मिळाले त्याबद्दल मी सरांचा आजन्म ऋणी राहील.
          विवेक अभ्यासात जरी माझ्यापेक्षा मागे असला तरीदेखील मात्र एक मित्र म्हणून फार गुणी मुलगा आहे . तो कधीही खोटे बोलत नाही .  परिस्थिती जशी असेल तशी प्रामाणिकपणे स्वीकारतो . त्याचं एक वाक्य मला फार आवडतं ते म्हणजे  " विजू टेन्शन घ्यायचं नाही " त्याच्या अशा बिनधास्त वागण्यामुळे तो पटकन सर्वांना आपलंसं करून घेतो . लहानपणापासूनच आणि एकत्र असल्यामुळे एकमेकांच्या स्वभावातील गुणवैशिष्ट्ये आम्ही जाणून होतो.
      विवेक इतका सरळ मार्गी व नाकाच्या समोर चालणारा मुलगा आहे की त्याच्या आयुष्याकडून खूप काही अपेक्षा नाहीत . फक्त शांततेने जगत राहावे आणि आयुष्य अधिक चांगले होण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करत राहावे एवढच साधा तत्त्वज्ञान आहे त्याचं. त्याचा हा साधेपणाच मला खूप आवडतो .  माझा स्वभाव मात्र याच्या अगदी उलट . मला आयुष्याकडून खूप अपेक्षा आहेत . हे सगळे जग मी बदलून टाकेन आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत राहील हे माझं ब्रीद भले यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले , जीवाचे कितीही हाल झाले तरीही चालेल हे माझं तत्वज्ञान . विवेक माझ्या प्रयत्न प्रधान विचारांमुळे माझा सतत कौतुक करत राहतो आणि प्रामाणिकपणे आमच्या दोघांच्या विचारातील फरक स्वीकारतो त्याचा हा सरळपणाच मला खूप आवडतो.
        विवेकला गाणे म्हणायला खूप आवडते कोणतेही नवीन गाणे आले की विवेकला ते लगेच पाठ होते. शाळेतून घरी येताना आम्ही रस्त्याने गप्पा तर मारतोच पण मी विवेकच्या आवाजातील गाणी ऐकण्यात जास्त पसंत करतो आणि विवेकही मी सांगेल ते गाणे अगदी गोड आवाजात म्हणतो विवेक सांगतो गाणे म्हणताना आम्हाला सर्वात जास्त आनंद मिळतो आणि त्यावेळी मला जगाचे भान हे राहत नाही मी वेगळ्याच जगात जातो त्याचं हे गाणं वेड बघून मला फारच आश्चर्य वाटतं आणि त्यातूनच मला माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा मिळते असा हा माझा प्रेरणादायक मित्र मला खूप  आवडतो.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
      

              निबंध क्रमांक 2

           मित्र तर सर्वांनाच असतात ; पण ज्याच्याकडे आपण आपल्या मनातील सर्व दुःख आनंंद मांडू शब्द त्याच्यावर रुसू शकतो असा एक चांगला मित्र सर्वांना असेलच याची खात्री मात्र देता येणार नाही पर्यंत मी मात्र आत्मविश्वासाने आणिि ठामपणे माझ्या प्रिय मित्राचे नाव घेऊ शकतो व मला असाा मित्र मित्र दिला म्हणून मीी देवाचा कायम आभारी राहील
           माझ्या प्रिय मित्राचे नाव तुषार आहे तुषार लहान असतानाच त्याचे वडील वारले तुषारला त्याच्या आईने मोठ्या कष्टाने वाढवले आहे आईच्या कष्टाची तुषारला पुरेपूर जाणीव आहे आणि त्याच्या वागण्यातून हे वारंवार दिसून येतं त्याने आईला त्रास देताना मी त्याला आज पर्यंत पाहिले नाही . तुषार मला नेहमी सांगतो " अरे मित्रा, मला खूप अभ्यास करायचा आहे व मोठा अधिकारी व्हायचे आहे."
          आयुष्याविषयी त्याचे निर्णय अगदी ठाम व अभ्यासपूर्ण असतात तो अगदी विचार करून निर्णय घेतो त्याची ह्या एवढ्या कमी वयात विचार करण्याची क्षमता बघून मला फार आश्चर्य वाटते त्याने निर्णय घेतला ही त्या निर्णयाच्या पूर्ततेसाठी तो प्राणपणाने प्रयत्न करत राहतो कितीही त्रास झाला अडचणी आल्या तरी देखील मग तो मागे हटत नाही अगदीं मोठ्या नद्यांमध्ये जसे वृक्ष आणि मोठमोठे खडक ठामपणे उभे असतात तसा तो ठाम पणे न थकता काम करत राहतो तरीदेखील त्याचा उत्साह अजिबात कमी होत नाही हे बघून मलाही सतत काम करण्यासाठी प्रेरणा मिळते .
         तुषार डान्स फार छान करतो आमच्या गावातील एकही गल्ली अशी नाही की ज्या गल्लीत तुषार आणि डान्स केलेला नाही तो टीव्ही मधल्या कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी डान्सचे खूप प्रॅक्टिस करतो अगदी मनापासून शेतात गेल्यावर शेतात हे तो मोबाईल वर गाणे लावून डान्स ची प्रॅक्टिस करतो व करितांना छान छान झाले लावतो आणि शाळेत म्हणून दाखवतो आमच्या शाळेत जवळजवळ सर्व कवितांना त्याने चाली लावलेल्या आहेत आणि त्याच्याच आले हे फार साध्या व श्रवणीय असल्यामुळे सर्वांना आवडतात असा हा बहुगुणी व्यक्तित्वाचा मित्र मला जन्मोजन्मी मिळावा अशी मी देवाला प्रार्थना करतो.
           


       निबंध क्रमांक 3 

       माझ्या मित्राचे नाव गणेश आहे . गणेश म्हणजे गणपती म्हणून मी त्याला प्रेमानेे कधी कधी गणपती ही म्हणतो  . गणपती म्हणजे विद्येची देवता . त्याचं नाव  त्याला शोभते . गणेश सतत अभ्यासात मग्न राहतो . गणेश चे गुण किती सांगू  आणि कोणते सांगू .
            अभ्यास , खेळ, सामाजिक उपक्रम विविध कला कार्यानुभव या सर्व कलांमधील नैपुण्य मी क्वचितच इतरांच्या ठिकाणी पाहिले आहे  . हे सर्व  नैपुण्य त्याने अति कष्टाने व सततच्या सरावाने मिळवले आहे . गणेशला बरेचसे श्लोक पाठ आहेत . अथर्वशीर्ष ,रामरक्षा स्तोत्र ,मनाचे श्लोक ,देवांच्या आरत्या अगदी तोंडपाठ आहेत त्याला . एवढंच नाही  इंग्रजी ,हिंदी ,मराठी या तिन्ही विषयांमधील सर्व कविता देखील त्याला तोंडपाठ आहेत . त्याही अगदी उत्कृष्ट चालीसह .
            गणेश चे वडील शेतकरी आहेत आणि वारकरीही ; त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण अगदी धार्मिक आहे . गणेश कधीकधी वडिलांबरोबर मंदिरात भजनासाठीही जातो . तिथे तो एक छान गवळण म्हणतो . कधी कधी मलाही ती गवळण म्हणून दाखवतो . त्याचा आवाज फारच गोड आहे . देवी सरस्वतीचा वरदहस्त त्याच्यावर आहे.
             क्रिकेट खेळताना सर्वजण त्याला आपल्या संघात घेण्यासाठी आतुरलेले असतात ; कारण गणेश ज्या संघामध्ये खेळतो तो संघ खूप कमी वेळा हरतो  . कॅरम खेळताना एकदा तर त्याने एकाच डावात सर्व सोंगट्या कॅरमच्या छिद्रांमध्ये टाकून डावच संपवला होता.
क्रिकेटच्या मॅच यांचे वेळापत्रक त्याला तर तोंडपाठ असते . कोणता संघ कोणत्या संघाशी जिंकणार की हरणार याची भविष्यवाणी करण्यात तर त्याला वेगळाच आनंद मिळतो.
         मी आणि गणेश बऱ्याचदा एकत्र बसूनच अभ्यास करतो . मला जर काही अडचण आली तर तो मला समजून सांगतो . गणितातील भागाकार मला त्याने फार छान रीतीने समजून दिला . त्यानंतर मी आज पर्यंत भागाकार चुकलेलो नाही . एकदा मी त्यांच्या शेतात गेलो होतो . त्यांच्या शेतात आंब्याचे व जांभळाची झाडे होती गणेश माकडासारखा झाडांवर चढला ; आणि त्या दिवशी आम्ही इतकी जांभळं आणि आंबे खाल्ले की जेवण सुद्धा केले नाही .त्यादिवशी त्याचे झाडावर चढण्याची अजून एक नवीन कला मला समजली.
           गणेशला पोहता येत नाही पण मला मात्र छान पाहता येते .एक दिवस आम्ही आमच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेलो तेव्हा गणेश बाहेर बसूनच आमची गंमत बघत होता . परंतु त्याने पोहणे शिकण्याचे ठरवले . मला सांगितले . मी त्याला पोहायला शिकवतो आहे ;आणि या सात आठ दिवसांमध्ये तो चांगलं पोहायलाही शिकेन ;हे त्याच्या प्रयत्नांमधून दिसते आहे. यावरून गणेश सारख्या माझ्या प्रिय मित्राला मी माझ्याकडची कला शिकवली याचे समाधान मला सतत राहील .
     असा प्रामाणिक हुशार व सर्वगुणसंपन्न मित्र सर्वांना मिळावा.



       निबंध वाचून झाल्यानंतर तुम्हाला निबंध कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल म्हणून कमेंट करायला विसरू नका तुम्हालाही असा तुमचा एखादा छान मित्र असेल तर तुम्ही तुमच्या निबंध आम्हाला पाठवा आपण तुमच्या नावासह तो निबंध प्रकाशित करू

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने