1001marathiessay.blogspot.com

वृक्षदिंडी I आमची वृक्षदिंडी प्रसंग लेखन |आमच्या शाळेची वृक्षदिंडी| vrukshdindi prasanga lekhan|prasang lekhan in Marathi
वृक्षदिंडी I आमची वृक्षदिंडी प्रसंग लेखन |आमच्या शाळेची वृक्षदिंडी| vrukshdindi prasanga lekhan 

                 वृक्षदिंडी (prasang lekhan in Marathi)

        सध्याच्या काळात अनेक समस्या माणसाला भेडसावत असतात परंतु पर्यावरणाचा प्रश्न ही आज एक जागतिक समस्या झाली आहे . सध्या प्रदूषण इतके वाढले आहे की प्रदूषणाचे आपण केव्हा बळी होऊ हे सांगता येणार नाही . हा धोका ओळखून भारत सरकार तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असतात.

            वन महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने देखील वृक्षदिंडी चा कार्यक्रम आयोजित केला होता .ह्या कार्यक्रमाची तयारी फारच उत्साहाने सुमारे एक महिना भर चालू होती. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला  आपल्या घरी एक छोटा वृक्ष तयार करायचा होता . त्यालाच ' बालवृक्ष ' असे नाव देण्यात आले . कोणी कोणता वृक्ष लावायचा हे आपणच ठरवायचे असे सांगण्यात आले . ठरल्याप्रमाणे 2 ऑक्टोंबरला सगळे विद्यार्थी आपापली रोपे घेऊन सकाळी साडेसात वाजता शाळेमध्ये आले . शाळेतूनच वृक्षदिंडी निघणार होती .याची सूचना सर्वांना आदल्या दिवशीच देण्यात आली होती . विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या विविध प्रकारच्या पाट्या बनवून आणल्या होत्या. शाळेनेही झाडांचे महत्त्व सांगणारे मोठाले बॅनर बनवले होते . वृक्षदिंडी पूर्ण गावातून फिरून पुन्हा शाळेत येणार होती. शाळेच्या मागे असलेल्या मोठ्या पटांगणाच्या चारही बाजूंनी या बालवृक्षाचे रोपण करण्यात येणार होते ; व हे बालवृक्ष या भू मातेच्या कुशीत बागडण्यासाठी  मातेच्या स्वाधीन केले जाणार होते.

          आज पर्यंत शाळेतून अनेक प्रकारच्या मिरवणुका निघाल्या होत्या परंतु या वृक्षदिंडीतील मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता; कारण विद्यार्थ्यांनी स्वतः एक महिना जतन केलेले बाल वृक्ष ते स्वतः आपल्या हाताने लावणार होते . एक महिना झाड स्वतःने जतन केलेले होते , त्यामुळे त्या झाडांविषयी विशेष प्रेम व एक नाते निर्माण झालेले होते . हेच त्या उत्साहाचे रहस्य होय .आजच्या मिरवणूकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही वेगळ्याच होत्या. ' एक मूल एक झाड ', 'झाडे लावा झाडे जगवा ', 'प्रदूषणाचा नाश करा'. अशा विविध घोषणा सर्व विद्यार्थी मोठ-मोठ्याने देत होते .त्यातील मला आवडलेली सर्वात चांगली घोषणा म्हणजे 'आजचे बालतरु उद्याचे कल्पतरू'. मीही घोषणा फार मोठ्याने देत होतो. माझा तर घसाच बसला ; पण मिळालेला आनंद काही वेगळाच .काही विद्यार्थ्यांनी आमच्या ह्या वृक्षदिंडी मध्ये वृक्षासारखे हिरवेगार पोशाख केले होते . काही विद्यार्थ्यांच्या हातात फलक होते . ''वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती "."निसर्ग आमचा मित्र झाडे लावू सर्वत्र "."निसर्ग आमचा सखा  आरोग्य देई फुका".

           वृक्षदिंडी चे स्वागत करण्यासाठी गावातील सर्व करून तरुण तसेच इतरही ग्रामस्थ उभे होते दारामध्ये अंगणात सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या.

             वृक्षदिंडी च्या आदल्या दिवशीच आळी तयार केलेली होती व प्रत्येकाला आपले आळी निवडून दिले होते त्यामुळे काहीही गोंधळ झाला नाही कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही बघून ग्रामस्थांनी सर्व शिक्षक विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले गुरुजी व मुख्याध्यापकांनी ही वृक्षारोपण आत भाग घेतला आणि काय गंमत त्याच वेळी आकाशातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या जणूकाही आकाशाच्या झाली तून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला निसर्गही आमच्यावर खूश झाला असेच आम्हाला वाटले . काही वेळाने पाऊस थांबला बालतरुची टवटवीत झालेली पाने  वाऱ्याबरोबर डोलत होती. जणू  ते आनंदाने टाळ्या वाजवत होते .ते बघून मला एक कविता आठवली .                
               वृक्ष आमचे मित्र तयांना 
               तोडू नका कोणी 
              तोडू नका कोणी तयांना 
               तोडू नका कोणी 
               देती सारे मनापासुन 
               जे जे जवळी वृक्ष 
         वृक्ष म्हणू की ऋषी म्हणू त्या 
               हे तर जनहित दक्ष

...................................

आमची वृक्षदिंडी प्रसंग लेखन 


निबंध (prasang lekhan in Marathi )कसा वाटला ?हे कमेंट करून नक्की सांगा व आपलेही निबंध तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद

4 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

  1. 𝒌𝒉𝒖𝒑 𝒔𝒖𝒏𝒅𝒂𝒓 𝒏𝒊𝒃𝒂𝒏𝒅𝒉 𝒂𝒎𝒄𝒉𝒆 𝒌𝒂𝒎 𝒔𝒐𝒑𝒑𝒆 𝒌𝒆𝒍𝒆𝒕 𝒔𝒂𝒅𝒉𝒊 𝒔𝒂𝒓𝒂𝒍 𝒂𝒏𝒊 𝒎𝒂𝒏𝒂𝒍𝒂 𝒔𝒑𝒂𝒓𝒔𝒉𝒖𝒏 𝒋𝒂𝒏𝒂𝒓𝒊 𝒃𝒉𝒂𝒔𝒉𝒂 𝒗𝒂𝒑𝒓𝒍𝒊𝒕

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. आपल्या या प्रेरक अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद. असे अनेक छान निबंध आपल्या या www.upkarmarathi.com वर उपलब्ध आहेत त्यांचाही नक्की आनंद घ्या. धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने