चहा बोलू लागला तर.

        किंवा

 मी चहा बोलतो आहे.

          किंवा

 चहा चे मनोगत.

    

   “ नमस्कार मंडळी, ओळखलत का मला ? चला उठा, सकाळ झाली. कामे उरकण्यासाठी आता उठलच पाहिजे. रात्र सरली ,दिवस उगवला आता . अरे बापरे ! अजून ओळखलं नाही मला? मी आहे तुमचा दररोजचा सकाळचा सोबती, तुमचा  मित्र “चहा”. आता तरी पटली का ओळख.”

            मला विसरून कसं चालेल  ? तुमच्या कोणत्याही कामात, मग तो अभ्यास असो, खेळण्याचा कार्यक्रम असो, सगळीकडे माझी उपस्थिती असते. कधीकधी माझ्या सोबत माझी बहिण म्हणजे कॉफी सुद्धा असते. आम्ही मिळून अनेक वर्षांपासून तुमची सर्वांची काळजी घेत आहोत.

            माझा जन्म खूप दूरवर असलेल्या  आसाममध्ये झाला. तिथे झाडाच्या अंगा-खांद्यावर मी वाढलो. आमची लागवड तशी रांची, देहरादून अशा अनेक ठिकाणी केली जाते. भारताच्या प्रथम चहा आणला तो चिनी प्रवाशांनी. भारतातही चहाच्या मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि आता तर चहाचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात घेतले जाते की आता चहा भारतातून परदेशात पाठवला जातो.

              झाडाच्या अंगाखांद्यावर खेळून आम्ही वाढलो. नंतर तेथील स्त्रियांनी झाडावरून अलगद आम्हाला खुडून घेतलं आणि आई-वडील जसे आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन खेळतात तसं यांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या पाठीवर असणाऱ्या गोल गोल टोपल्यामधून त्यांच्या घरांमध्ये . आम्हाला वाळवलं आणि मग नीट वाळल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या घेऊन जातात आम्हाला त्यांच्या नावाने विकण्यासाठी. म्हणजे कष्ट करतो कोण आणि नाव होतं दुसऱ्याचंच. ते काही असो पण मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून करत असतो ते म्हणजे तुमची तलफ भागवण्याचं…….नाही का?

              माझ्या आयुष्यात मी अनेक प्रकारची माणसे बघितली आहेत. कोणी मस्त झुरके मारत, कोणी सावकाश छान गप्पा मारत मारत चहाचा आनंद घेतात आणि मलाही त्यांचा तो आनंद वाढवण्यात खूप मजा येते.

              वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो. कोणी लिंबू पिळून चहात टाकला की झाला  लेमन टी, कुणी बिनदुधाचा कोरा चहा, कुणी ग्रीन टी अशा अनेक प्रकाराने चहाचे सेवन केले जाते. कोणाला मीठ टाकलेला नमकीन चहा आवडतो, कुणाला अगदी कडक चहा आवडतो तर कुणाला सौम्य चहा आवडतो . 

              अनेक कामांच्या थकव्यावर उपाय म्हणून चहा हा एक उत्तम पर्याय, पण तरीही मी एक बाब सांगतो “अति तिथे माती ” म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणातच छान वाटते ; मग तो चहा असला तरीही. काहीजण म्हणतात चहा हे टॅनिन नावाचं विषारी द्रव्य असलेलं पेय आहे. काहींनी तर माझं दर्शन घेण्याचेही बंद केलंय. पण काहीही असो तुमच्यासारख्या छान छान लोकांच्या सहवासात मला नेहमीच राहायला आवडेल. चला आता, भरपूर गप्पा झाल्या ,कुठे म्हणजे काय ? चहा प्यायला!  चला येताय ना मग.”



 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.


               कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका . म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

               खूप खूप धन्यवाद.


 आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने