ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
 |वाचनीय लेख
 | विनोदी लेख 


“अरे कोणीतरी हे ट्याव-न्याव बंद करा रे        पार वैताग आणलाय मला नुसता ,

      मला जर सापडला ना तर तंगडी             धरून आपटतोच त्याला,”

( माझा पाच वर्षाचा मुलगा रागातच बोलत होता)

"काय रे ,काय झालं तुला रागवायला "

"आहो पप्पा, या ट्याव-न्याव मुळे माझ आता फार डोकं दुखायला लागलं."   "कसली रे ट्याव-न्याव ?"

असं विचारल्याबरोबर माझ्या पाच वर्षाच्या मुलाने माझा हात धरला आणि ओढतच मला घराच्या मागच्या दारातून बाहेर घेऊन आला. पोलीसांच्या गाडी कडे बोट दाखवत म्हणाला

"ते बघा " ट्याव-न्याव."

 त्याच्या भाषेतलं ते ट्याव-न्याव बघून त्याला हसतच म्हटलं

" अरे बाळा, त्याला सायरन म्हणतात . आणि  ती  पोलिसांची गाडी आहे ."

"पण ती गाडी आपल्या गल्लीत का येते सारखी ट्याव-न्याव घेऊन ?"

 त्याच्या बालसुलभ मनातून आलेले ते बोल त्याच्या बाळबोध रागाची ग्वाहीच देत होते , मी त्याला समजावण्याच्या सुरात म्हटलं

"अरे बेटा आता नाही का कोरोनाव्हायरस आलाय, त्याच्यामुळे खूप लोक आजारी पडत आहेत म्हणून हे पोलीस फिरताय". "पण पप्पा, आजारी पडल्यावर डॉक्टर येतात ? ना मग या पोलिसांच काय काम ?."

"अरे बेटा आता लॉकडाऊन आहे ना , तरीही लोक घराबाहेर पडतात म्हणून त्या लोकांना समजवण्यासाठी पोलीस येतात ".

   माझ्या उत्तराने त्याच्या मनात अजून प्रश्न येत आहेत हे मला समजत होतं . आणि आता आपली तोंडी परीक्षा सुरू होणार हेही मला कळत होतं ; आणि ती लगेच सुरू झालीही. त्याचा पुढचा प्रश्न लगेच बाणासारखा माझ्यावर झेपावला.

"बाबा लॉक डाऊन म्हणजे काय हो ?" "घरातून बाहेर  निघायचं नाही, बाहेर कुठेही फिरायचं नाही ".

मी हुशारीच्या अविर्भावात बोललो.

" असं आहे का?"

 तो सगळं समजल्यासारखा बोलला.  

मी म्हटलं" हो "

"म्हणजे घरातून बाहेर निघायचं नाही तरीपण लोक बाहेर फिरतात का?"

" हो "

"मग त्याच्यात काय एवढं पोलिसांनी सरळ घरांना बाहेरून कुलूप लावून टाकायचं ना म्हणजे नो टेन्शन"

 मला थोडं हसू आलं मी म्हटलं

"पण अरे पण इतके लॉक कुठून आणणार"

" कुठून काय हो पप्पा ,ज्यांच्या घराला कुलूप लावायचं त्यांच्याच घरातल लॉक घ्यायचं"

" पण कोणाकडे कुलूप नसलं तर"

" असं कसं कुलूप नसणार ते पण सुट्टीत मामाच्या गावाला जात असणारच ना ?मग तेव्हा नाही का लावत असणार ते?"   त्याचा चर्चेच्या मूड बघून मलाही मज्जा वाटत होते आणि त्याच्या चौकस बुद्धीची जाणीवही होत होती मी काही बोलणार तितक्यात तोच म्हणाला

"नाही पप्पा , पुढच्या दाराला कुलूप लावलं तरी हे लोक मागच्या दारातून बाहेर पडतीलच म्हणजे आपला प्लॅन काही कामाचा नाही जाऊद्या"

" मग आता काय करायचं बेटा "

"चला बातम्या बघू आपण"

तो पटकन बोलला मी म्हटलं

"तुला कळतात का बातम्या"

" नाही पण तुम्हाला तर कळतात ना मग तुम्ही ऐका आणि मला समजावून सांगा " असं म्हणून माझ्या आधी तो खुर्चीत जाऊन बसला आणि मला सोप्या कडे हात दाखवत म्हणाला

" बसा इकडे "

 मी बसलो तितक्यात तो म्हणाला

" पप्पा तुमच्या मोबाईलवरून चीनला  फोन लागेल का हो ?"

मी म्हटलं

"लागेल ना पण कोणाला लावू?"

 तो झटक्यात म्हणाला

 "अहो, चीन ला फोन लावा मला बोलायचं आहे त्यांच्याशी"

" काय बोलणार आहेस तू ?"

तो खुर्चीत मागे सरकत बोलला

"त्यांना विचारतो तुमचा कोरोना आमच्या गावात का पाठवला तुमचा कोरोना तुम्हाला परत घेऊन जा नको आम्हाला तो "

मला आश्चर्यच वाटले स्मितहास्य करूनच त्याला म्हटलं

"अरे बापरे !तुला कोणी सांगितलं "

" पप्पा तुम्ही नाही का म्हणत ती आंटी किती छान बोलते तिने सांगितलं मला"

 त्याचं बोलणं ऐकून मला झटकाच बसला पण विजेच्या वेगाने बायको बाहेर येऊन त्याला विचारू लागली.

" काय रे पिल्लू कोणती आंटी छान बोलते "

माझी तर वाचा पार बसून गेली घसा कोरडा पडला मनात म्हटलं

"घेण ना देण उगाच तेल लावून घेण " मुलाने माझ्या हातातला रिमोट मागितला आणि आईकडे देऊन म्हणाला ,

"बातम्या लाव" आणि एका चॅनलवर आल्यावर आईला म्हणाला

"थांब जरा इथे छान बोलणारी आंटी येते ना तिनेच सांगितलं होतं".

" काय "

" कोरोना चीन वरून आला आहे असं"

 मी बायकोकडे बघत बघतच माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेलो आणि कागदपत्रांची लॉफ्ट वर ठेवलेले बॅग उघडून मुलाचा जन्म दाखला शोधू लागलो कारण मला बघायचं होतं हा नेमका पाच वर्षाचा आहे का ?

 तितक्यात मागून बायको दबक्या पावलांनी येऊन मला हळूच म्हणाली "गरम-गरम भजी आणू का? कीऑंटी बघता"

  असं म्हणून बायको हसतच किचनमध्ये गेली

  मी मनातच म्हटलं या ट्याव-न्याव च्या नादात म्याव म्याव करायची वेळ आली होती तितक्यात

"पप्पा चला ना बातम्या बघायला"

 मला हलवत माझा मुलगा म्हणाला मग आम्ही बातम्या बघण्यासाठी निवांत बसलो तितक्यात आली ना ट्याव-न्याव मुलगा लगेच म्हटला '

"चला पप्पा ट्याव-न्याव बघायला."

 मी रिमोट घेतला आणि त्याला छोटा भीम कार्टून लावून दिलं हळूच पुटपुटलो "छोटा भीम बघ नाहीतर तुझ्या नादात घरातला साडीतला भीम माझी वाट लावेल "

 असं म्हणून मी सोप्यावर मागे रेलून बसलो तितक्यात पोरगा कानाजवळ येऊन भुवया उंचावून हळूच म्हणाला "पप्पा साडीतला भीम कोण ,आईच"

 ना आता मात्र मी कपाळावर हात मारून घेतला आणि सरळ झोपूनच घेतल .

ट्याव-न्याव नको ,म्यांव म्यांव नको, आणि तो छोटा भीम ही नको.

    -------–--------------------–-----------------------------------------------------

संवाद कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा


 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.


  1. आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन
  2.  माझी आई, majhi aai marathi nibandh  
  3. कोरोना व्हायरस, corona,covid-19 
  4. मी कोरोना वायरस बोलतोय.
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  7.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  8. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh


       कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

               खूप खूप धन्यवाद


आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने