www.upkarmarathi.com

रक्षाबंधन निबंध मराठी माहिती | Rakshabandhan essay in Marathi
रक्षाबंधन निबंध मराठी माहिती | Rakshabandhan essay in Marathi



            🙏🏻 रक्षाबंधन 🙏🏻 
    आपला देश असा देश आहे की त्याच्यात खूप सण समारंभ साजरे केले जातात . त्यांच्यातलाच एक असा पवित्र दिवस तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन .या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे मन जिंकून घेते. जगातील सर्व नात्यांमध्ये भावा-बहिणीचं नातं सर्वात पवित्र असतं. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे.

     बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही .तर सर्व स्त्रियांच्या रक्षणाची मनोकामना ठेवते. रक्षाबंधन हा मुख्य हिंदू उत्सवापैकी एक आहे. देशातील विविध भागांमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण भावा-बहिणीचं नातं पक्क करण्यासाठी ओळखला जातो. भाऊ-बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी नवे पोशाख घालतात. हा सण खूप जुन्या काळापासून चालत आला आहे.

                  धन्यवाद.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने